इतर मागास वर्ग किंवा ओबीसी (इंग्रजी: Other Backward Class / OBC) हा सामाजिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला प्रवर्ग (समाज) आहे. भारतात बहुसंख्य समाज हा मागासलेला (Backward class) असून पुढारलेला समाज (Forward class) अल्पसंख्य आहे. या बहुसंख्य मागास समाजापैकी जो जास्त मागास आहे तो ‘मुख्य मागास’ समजला जातो. त्याला अनुसूचित जाती-जमाती म्हटले जाते. या मुख्य मागासांपेक्षा कमी मागासलेल्या समाजघटकांना ‘इतर मागास’ ठरविण्यात आलेले आहे. भारतातील ४१% ते ५२% लोकसंख्या ओबीसी आहे.[ संदर्भ हवा ]

समाविष्ठ जाती

संपादन

मंडल आयोगाने महाराष्ट्रातील ओबीसी जातींची संख्या ३६०, तर देशात ओबीसी जातींची संख्या ३,७४४ इतकी नोंद केलेली आहे. इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या राष्ट्रीय आयोगाने २,१७१ प्रमुख ओबीसींची यादी जाहीर केलेली आहे. ह्यांतील उपजाती जमेस धरल्यास ही संख्या आणखीही वाढू शकते.

कुणबी, साळी, कोष्टी, तेली, भावसार, वाणी, शिंपी, नाभिक, परीट, गुरव, गवळी, जंगम, पांचाळ, फुलारी, रंगारी, सुतार, कासार, धनगर, भंडारी, तांडेल, तांबट, मोमीन, घडशी, विणकर, आगरी, कुंभार, सोनार, कोळी, लोहार, शिंपी, माळी, बंजारा,मराठअशा अनेक जाती यामध्ये मोडतात.[१]

अ.क्र. जाती अ.क्र. जाती
1) अलितकार 13) बारी  किंवा बारई
2) वगळले (बागडी) 14) बेरीया
3) वगळले (बहुरुपी) 15) बेसदेवा
4) बडीआ 16) भडभुंजा, भूजवा, र्भूजवा, भूर्जी, भरडभूंजा, भूरंजी,भूंज
5) बजानिआ 17) भांटा
6) बाजीगर 18) भट, भाट
7) बुट्टाल 19) चमथा
8) भांड, छप्परभांड, मुस्लिम भांड 20) चांदलगडा
9) भवैया किंवा तारगल 21) चरण किंवा गढवी
10) भाविण 22) चारोडी
11) भिस्ती किंवा पखाली, सक्का 23) चिप्पा, छिपा
12) वगळले (भोई) 24) दास किंवा दांगडीदास
25) दावगर 38) वगळले (गद्री)
26) देपला 39) गढवी
27) देवळी 40) वगळले (गारपगारी)
28) देवदिग, देवाडिगा, शेरीगार व मोईली (शा. नि. दि. 30 जानेवारी, 2014 प्रमाणे समा‍विष्ट) 41) वगळले (धोली)
42) गोचाकी
29) वगळले (ढीवर किंवा ढेबरा) 43) गुरव लिंगायत गुरव ( शा. नि. दि. 4 सप्टेंबर 2014 प्रमाणे)
30) ढोली, हश्मी/डफली
31) वगळले (डोंबारी) 44) वगळले, (गवळी)
32) वगळले (धनगर) 45) गवंडी, गुर्जर-कडीया
33) वगळले (धीमर) 46) हलेपैक
34) वगळले (देवांग) 47) वगळले (हिलव)
35) गंधारप 48) वगळले (हटकर)
36) गुजराथ बोरी 49) जगीयासी
37) वगळले (गदारिया) 50) जजाक

आरक्षण

संपादन

या प्रवर्गास केंद्रात २७% तर महाराष्ट्र राज्यात १९% आरक्षण आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ ओबीसी धर्मांतर - शंका, निरसन, निर्धार (पुस्तक): लेखक - संदीप जावळे कळिकाळ बळीराजा