जंगम ही लिंगायतांच्या गुरूची जात आहे. या जातीची माणसे मुख्यत्वेकरून भिक्षेवर निर्वाह करतात. भिक्षेस जाताना पायांत गुडघ्याखालीं जंग नांवाचा घुंगूर बांधतात, हातात वेताची छडी घेतात व भगवी वस्त्रे अंगावर घेतात. चरंती पोटजातीचे जंगम नेहमीं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरतात आणि मठाच्या खर्चाकरिता गृहस्थाश्रमी लिंगाइतांपासून आणि अन्य जनतेकडून पैसा गोळा करतात. भिक्षा मागताना हे सुरेल आवाजात गाणी गातात.