२०२१-२२ ॲशेस मालिका
इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ दरम्यान ७२व्या ॲशेस मालिकेंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धे अंतर्गत खेळवली गेली. ॲशेस मालिकेपूर्वी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया आणि दोन्ही संघांनी काही सराव सामने खेळले. सदर मालिकेला व्होडाफोन ॲशेस मालिका असे ही संबोधले गेले.
२०२१-२२ ॲशेस मालिका | |||||
ऑस्ट्रेलिया | इंग्लंड | ||||
तारीख | ८ डिसेंबर २०२१ – १८ जानेवारी २०२२ | ||||
संघनायक | पॅट कमिन्स (१ली, ३री-५वी कसोटी) स्टीव्ह स्मिथ (२री कसोटी) |
ज्यो रूट | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ४–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ट्रॅव्हिस हेड (३५७) | ज्यो रूट (३२२) | |||
सर्वाधिक बळी | पॅट कमिन्स (२१) | मार्क वूड (१७) | |||
मालिकावीर | ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया) |
२०१७ मध्ये काही अयोग्य घडल्यामुळे १९ नोव्हेंबर २०२१ रोजी, ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदावरून टिम पेन याने तडकाफडकी राजीनामा दिला. २६ नोव्हेंबर रोजी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सला कर्णधारपदाची जवाबदारी दिली आणि स्टीव्ह स्मिथला उपकर्णधार नेमले गेले. पर्थ येथे होणारी पाचवी कसोटी कोव्हिड-१९ संबंधातील नियमांमुळे अन्यत्र स्थानांतरित करण्यात येणार असल्याची घोषणा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नोव्हेंबर मध्ये केली. सदर स्थानांतरित केलेली पाचवी कसोटीदेखील ॲडलेड कसोटी प्रमाणेच दिवस/रात्र खेळविण्यात येईल. पाचवी कसोटी होबार्टला खेळविण्यात आली.
ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ४-० अशी जिंकत ॲशेस चषक राखला. ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडला प्रतिष्ठित असे कॉम्पटन-मिलर पदक प्रदान करण्यात आले.
सराव सामने
संपादनतीन-दिवसीय सामना:इंग्लंड वि इंग्लंड लायन्स
संपादन२३-२५ नोव्हेंबर २०२१
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- पावसामुळे पहिल्या दिवशी केवळ २९ षटकांचा खेळ झाला. त्यानंतर पावसामुळेच दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी देखील खेळ झाला नाही.
चार-दिवसीय सामना:इंग्लंड वि इंग्लंड लायन्स
संपादन३० नोव्हेंबर - ३ डिसेंबर २०२१
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी खेळ झाला नाही.
तीन-दिवसीय सामना:ऑस्ट्रेलिया I वि ऑस्ट्रेलिया II
संपादनचार-दिवसीय प्रथम-श्रेणी सामना:ऑस्ट्रेलिया अ वि इंग्लंड लायन्स
संपादन
२०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- ॲलेक्स कॅरे (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : ऑस्ट्रेलिया - १२, इंग्लंड - -८[n १].
२री कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- मायकेल नेसर (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : ऑस्ट्रेलिया - १२, इंग्लंड - ०.
३री कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- बॉक्सिंग डे कसोटी.
- स्कॉट बोलंड (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : ऑस्ट्रेलिया - १२, इंग्लंड - ०.
४थी कसोटी
संपादन
५वी कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- सॅम बिलिंग्स (इं) याने कसोटी पदार्पण केले.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : ऑस्ट्रेलिया - १२, इंग्लंड - ०.
नोंदी
संपादन- ^ पहिल्या कसोटीमध्ये धीम्या गोलंदाजीसाठी इंग्लंडचे कसोटी विश्वचषकामधून ८ गुण कापण्यात आले.