आल्फ्रेड हिचकॉक

(अल्फ्रेड हिचकॉक या पानावरून पुनर्निर्देशित)

सर आल्फ्रेड जोसेफ हिचकॉक (ऑगस्ट १३, इ.स. १८९९ - एप्रिल २९, इ.स. १९८०) हा इंग्लिश भाषक चित्रपटांचा ब्रिटिश दिग्दर्शक व निर्माता होता. रहस्यपटांतील व मानसशास्त्रीय भयपटांतील नावीन्यपूर्ण प्रयोगांसाठी तो ओळखला जातो. युनायटेड किंग्डम या त्याच्या मायदेशात मूकपटांमधील व बोलपटांमधील यशस्वी कारकिर्दीनंतर हिचकॉक अमेरिकेतील हॉलिवुड चित्रपटसृष्टीत गेला. ब्रिटिश नागरिकत्व अबाधित राखून इ.स. १९५६ साली तो अमेरिकेचा नागरिक बनला.

सर आल्फ्रेड जोसेफ हिचकॉक

आपल्या ५० वर्षाहून दीर्घ कार्यकालावधीत हिचकॉकने स्वतःची एक वेगळ्या व लक्षणीय दिग्दर्शन शैलीसाठी म्हणून ओळख करून घेतली.[] त्याने कॅमेरा कलाकाराच्या नजरेचा वेध घेईल अशा प्रकारे कॅमेरा वापरण्याची एक नवीन पद्धत अस्तित्वात आणली ज्यामुळे प्रेक्षकांना खाजगीतील दृश्य बघितल्यासारखे वाटेल.[] प्रेक्षकांची उत्कंठा, भीती किंवा जवळीक ताणावी अशी दृश्ये तो निवडी आणि त्यांचे नवनवीन तऱ्हेने संकलन करी.[] त्याच्या गोष्टीत बऱ्याचदा कायद्याच्या कचाट्यातून दूर पळणारा पुरुष एका सुंदर बाईसोबत असे.[]

बालपण

संपादन

आल्फ्रेड हिचकॉक ह्यांचा जन्म इंग्लड देशातील इक्सेस परागण्यात लेस्टॉनस्टोन येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव विल्यम हिचकॉक (१८६२ - १९१४) तर आईचे नाव इमा जेन हिचकॉक (१८६३-१९४२). या दाम्पत्याला तीन मुले होती. अल्फ्रेड हे त्यांचे दुसरे अपत्य. ह्या रोमन कॅथलिक परंपरेतल्या कुटुंबात अल्फ्रेड लहानाचे मोठे झाले. वडिलांचे म्हणजे विल्यम हिचकॉक ह्यांचे फळे आणि कुक्कुटविक्रीचे दुकान होते.[]

शालेय शिक्षण

संपादन

अल्फ्रेड ह्यांनी 'सेल्सेशन विद्यालय, बेटरसी' आणि 'जेस्यूईट ग्रामर स्कूल, सेन्ट लिंग्नॅटीस विद्यालय' येथून आपले शालेय शिक्षण घेतले होते. अल्फ्रेड यांच्या वयाच्या १५ व्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्याच वर्षी अल्फ्रेड ह्यांनी लिंग्नॅटीस विद्यालय सोडून लंडन येथील 'कंर्ट्री काऊन्सि स्कूल ऑफ इंजिनिअरींग ऐण्ड नेव्हिगेशन इन पोलार' येथल्या अभियांत्रिकी शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला व तेथून आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण केला.[]

प्रारंभिक कार्यक्षेत्र

संपादन

आरेखनाचा अभ्याक्रम पूर्ण केल्यावर अल्फ्रेड यांनी 'हेन्ले' नावाच्या कंपनीत 'जाहिरात संकल्पका'ची नोकरी धरली. पहिल्या महायुद्धाच्या काळात त्यांना इंग्रजी सैन्यातही बोलावणे आले होते. मात्र त्यांची उंची, आकारमान आणि अनामिक शारीरिक स्थितीमुळे सवलत मिळाली होती. १९१७ साली ते 'रॉयल इंजिनिअरींग कॅडेट' मध्ये रुजू झाले, पण त्यांची लष्करी कारकीर्द अगदीच अल्प होती.

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Alfred Hitchcock's America". 2007-07-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-08-23 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Film Techniques of Alfred Hitchcock". 2019-10-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-08-23 रोजी पाहिले.
  3. ^ "NOTORIOUS! (Hitchcock and his icy blondes)".
  4. ^ a b https://en.wikipedia.org/wiki/Alfred_Hitchcock