मूकपट किंवा मूक चित्रपट म्हणजे ध्वनिमुद्रित न केलेला किंवा संवाद नसलेला चित्रपट असतो. जरी मूक चित्रपट हे कथानक आणि भावना विविध दृष्यांच्या आधारे व्यक्त करत असले तरी, अशा चित्रपटांत कथानकातील विविध घटक (जसे की सेटिंग किंवा युग) किंवा संवादाच्या प्रमुख ओळी, आवश्यक असेल तेव्हा, शीर्षक कार्ड वापरून व्यक्त केल्या जाऊ शकतात.

१९२१ च्या फोर हॉर्समन ऑफ द एपोकॅलिप्समधील एक छायाचित्र. हा सर्वाधिक कमाई करणाऱ्या मूक चित्रपटांपैकी एक होता.
मूक युगातील सर्वात प्रतिष्ठित अभिनेत्यांपैकी एक असलेला चार्ली चॅप्लिन, c. १९१९

"मूक चित्रपट" हा शब्द काही प्रमाणात चुकीचा आहे, कारण या चित्रपटांमध्ये जवळजवळ नेहमीच थेट ध्वनी असायचे. १८९० च्या दशकाच्या मध्यापासून ते १९२० च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत अस्तित्वात असलेल्या मूक युगात, एक पियानोवादक, थिएटर ऑर्गनिस्ट —किंवा अगदी मोठ्या शहरांमध्ये, एक लहान वाद्यवृंद — अनेकदा चित्रपटांसोबत संगीत वाजवत असे. पियानोवादक आणि ऑर्गनिस्ट एकतर शीट म्युझिक किंवा इम्प्रोव्हायझेशनमधून वाजवत असायचे . कधीकधी एखादी व्यक्ती प्रेक्षकांसाठी आंतर-शीर्षक कार्ड देखील वापरायची. त्या वेळी चित्रपटासोबत ध्वनी सिंक्रोनाइझ करण्याचे तंत्रज्ञान अस्तित्वात नव्हते, तरी संगीत हा चित्रपट पाहण्याच्या अनुभवाचा एक आवश्यक भाग मानला जात असे.

सिंक्रोनाइझ्ड ध्वनीच्या आविष्काराच्या आधीच्या सिनेमाच्या कालखंडाचे वर्णन करण्यासाठी "सायलेंट फिल्म" हा सामान्यतः ऐतिहासिक शब्द म्हणून वापरला जातो. तथापि तो नैसर्गिकरित्या सिटी लाइट्स , सायलेंट मूव्ही आणि द आर्टिस्ट सारख्या ध्वनी-युगातील चित्रपटांना देखील लागू होतो. या चित्रपटांमध्ये संवादाच्या जागी फक्त-संगीत साउंडट्रॅक वापरले गेले आहेत.

मूक चित्रपट हा शब्द एक प्रतिशब्द आहे.ही एक संज्ञा आहे जी नंतरच्या घडामोडींमधून काहीतरी पूर्वलक्षीपणे वेगळे करण्यासाठी तयार केली गेली आहे. १९२७ मध्ये द जॅझ सिंगरपासून सुरू झालेल्या सुरुवातीच्या ध्वनी चित्रपटांना " टॉकीज ", "साउंड फिल्म्स" किंवा "टॉकिंग पिक्चर्स" असे विविध प्रकारे संबोधले जात होते. ध्वनिमुद्रित ध्वनीसह मोशन पिक्चर्स एकत्र करण्याची कल्पना चित्रपटापेक्षा जुनी आहे (१८७७ मध्ये थॉमस एडिसनने फोनोग्राफ सादर केल्यानंतर लगेचच ही कल्पना सुचवण्यात आली होती), आणि काही सुरुवातीच्या प्रयोगांमध्ये प्रोजेक्शनिस्टने आवाज बसविण्यासाठी फ्रेम रेट मॅन्युअली समायोजित केला होता. [१] परंतु तांत्रिक आव्हानांमुळे ते शक्य झाले नाही. ऑडियन अॅम्प्लिफायर ट्यूबची परिपूर्णता झाल्यावर आणि व्हिटाफोन प्रणालीच्या आगमनानंतर १९२० च्या उत्तरार्धात सिंक्रोनाइझ संवादाचा वापर प्रत्यक्ष सुरू झाला. [२] एका दशकातच मनोरंजनासाठी मूक चित्रपटांचे व्यापक उत्पादन बंद झाले आणि चित्रपट उद्योग हा पूर्णपणे ध्वनी युगात गेला; ज्यामध्ये चित्रपटांमध्ये बोललेले संवाद, संगीत आणि ध्वनी प्रभाव यांचे समक्रमित ध्वनी रेकॉर्डिंग होते.

त्या काळात वापरलेली नायट्रेट फिल्म अत्यंत अस्थिर आणि ज्वलनशील असल्यामुळे सुरुवातीची मूक युगातील मोशन पिक्चर्स हरवलेली आहेत, असे मानतात. याव्यतिरिक्त, अनेक चित्रपट जाणूनबुजून नष्ट केले गेले कारण या काळात त्यांचे आर्थिक मूल्य नगण्य होते. असा दावा केला गेला जातो की, अमेरिकेमध्ये तयार केलेल्या सुमारे ७५ टक्के मूक चित्रपट गमावले गेले आहेत, परंतु हा अंदाज संख्यात्मक माहितीच्या कमतरतेमुळे चुकीचा असू शकतो. [३]

संदर्भ संपादन

  1. ^ Torres-Pruñonosa, Jose; Plaza-Navas, Miquel-Angel; Brown, Silas (2022). "Jehovah's Witnesses' adoption of digitally-mediated services during Covid-19 pandemic". Cogent Social Sciences. 8 (1). doi:10.1080/23311886.2022.2071034. 7 May 2022 रोजी पाहिले. synchronised sound in the silent-movie era (accomplished by playing a gramophone while manually adjusting the projector's frame rate for lip synchronisation)
  2. ^ "Silent Films". JSTOR. Archived from the original on May 26, 2019. 2019-10-29 रोजी पाहिले.
  3. ^ Slide 2000, पान. 5.