अमोल कोल्हे

मराठी टीव्ही अभिनेता
(अमोल रामसिंग कोल्हे या पानावरून पुनर्निर्देशित)

डॉ.अमोल रामसिंग कोल्हे हे मराठीतील एक अभिनेते व राजकारणी आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'राजा शिवछत्रपती' या मालिकेपासून ते प्रसिद्ध झाले. तसेच 'स्वराज्यरक्षक संभाजी' या झी मराठी वाहिनीवरील मालिकेमध्ये त्यांनी संभाजी महाराजांची भूमिका केली होती. २०१९ मध्ये ते शिरुर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आलेत.

अमोल कोल्हे
जन्म डॉ.अमोल रामसिंग कोल्हे
१८ सप्टेंबर, १९८० (1980-09-18) (वय: ४४)
नारायणगाव, पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता, डॉक्टर, नेता
कारकीर्दीचा काळ २००७ – आजतागायत
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम अधुरी एक कहाणी
ह्या गोजिरवाण्या घरात
राजा शिवछत्रपती
स्वराज्यरक्षक संभाजी
वडील रामसिंग कोल्हे
पत्नी
डॉ.अश्विनी कोल्हे (ल. २००७)
अपत्ये
धर्म हिंदू

सुरुवातीचे जीवन

संपादन

डॉ. अमोल कोल्हे यांचा जन्म पुण्याजवळील नारायणगाव येथे झाला. आठवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी तेथेच घेतले आणि मग पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. आपटे प्रशालेतून विज्ञान शाखेमधून त्यांनी १२वीपर्यंतचे शिक्षण घेतले. १०वी आणि १२वीच्या निकालांत त्यांचा गुणवत्ता यादीत समावेश होता. पुढे ते एम.बी.बी.एस.ची पदवी घेण्यासाठी मुंबईला गेले आणि त्यांनी सेठ गोवर्धनदास सुंदरदास (जी.एस.) महाविद्यालयातून त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.[]

डॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्‍नी डॉक्टर अाश्विनी या वैद्यकीय महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक आहेत.[] io अमोल कोल्हे आधीपासूनच छत्रपती संभाजी महाराजांना आदर्श मानतात. स्वराज्याचे दूसरे अभिषिक्त छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचावा या साठी त्यांनी स्वतःचे घर विकुन स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेची निर्मिति केली. आणि संभाजी राजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत आणला

चित्रपट

संपादन

[][]

शीर्षक वर्ष
अरे आव्वाज कुणाचा २०१४
आघात २०१०
ऑन ड्युटी २४ तास २०१०
मराठी टायगर्स   २०१६
मुलगा २००९
रंगकर्मी २०१३
राजमाता जिजाऊ २०११
राम माधव २०१४
साहेब २०१२
बोला अलख निरंजन २०१७

दूरचित्रवाणी कार्यक्रम

संपादन
मालिका वाहिनी कार्यक्रम (भूमिका)
अधुरी एक कहाणी झी मराठी मराठी मालिका
आमची शाखा कुठेही नाही मराठी कथाबाह्य कार्यक्रम (निवेदक)
ओळख स्टार प्रवाह मराठी मालिका
मंडळ आभारी आहे स्टार प्रवाह मराठी कथाबाह्य कार्यक्रम (निवेदक)
ह्या गोजिरवाण्या घरात ई टीव्ही मराठी मराठी मालिका (संस्कार पंडित)
राजा शिवछत्रपती स्टार प्रवाह मराठी मालिका (छत्रपती शिवाजी महाराज)
वंडर्स ऑफ महाराष्ट्र मराठी कथाबाह्य कार्यक्रम (निवेदक)
वीकेंड मेजवानी ई टीव्ही मराठी मराठी कथाबाह्य कार्यक्रम (निवेदक)
वीर शिवाजी कलर्स हिंदी मालिका (छत्रपती शिवाजी महाराज)
सांगा उत्तर सांगा मराठी कथाबाह्य कार्यक्रम (निवेदक)
स्वराज्यरक्षक संभाजी झी मराठी मराठी मालिका (छत्रपती संभाजी महाराज)
स्वराज्यजननी जिजामाता सोनी मराठी मराठी मालिका (छत्रपती शिवाजी महाराज)
स्वराज्य सौदामिनी ताराराणी सोनी मराठी मराठी मालिका (छत्रपती शिवाजी महाराज)

राजकीय कारकीर्द

संपादन

डॉ. अमोल कोल्हे हे पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते होते ते (२०१६ साली) पुण्याचे संपर्क प्रमुख होते. ते त्यांच्या आक्रमक भाषणशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत ते शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. त्यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि खासदार पदी निवड झाली.[]

राजकारणात मिळालेली पदे

संपादन
  • २०१४ पासून : उपनेते, शिवसेना[]
  • २०१४ : शिवसेनेचे प्रचारक वक्ते[][]
  • २०१५ : पुणे जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख
  • २०१९ : १.मार्च२०१९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
  • २०१९ : २३ मे२०१९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर शिरूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभूत केेले.

संदर्भ

संपादन
  1. ^ a b http://eci.nic.in/ECI_Main1/AE2014/StarCampMaharashtra_ShivSena.pdf
  2. ^ a b "संग्रहित प्रत". 2015-09-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-05-16 रोजी पाहिले.
  3. ^ A b c d "Amol Kolhe Biography, Wife, Speech, Height, Photos". Marathi.TV. 2015-07-25. Retrieved 2016-07-13.
  4. ^ a b "संग्रहित प्रत". 2015-09-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-05-16 रोजी पाहिले.
  5. ^ "Shiv Sena replaces senior spokespersons Sanjay Raut, Manohar Joshi by five new faces". dna. 21 November 2014.