अँजेलिक कर्बर

जर्मनी टेनिसपटू
(अँजिलिक कर्बर या पानावरून पुनर्निर्देशित)

ॲंजेलिक कर्बर (जर्मन: Angelique Kerber; १८ जानेवारी १९८८) ही एक व्यावसायिक जर्मन टेनिसपटू आहे. २००३ पासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेली कर्बर २०११ साली यू.एस. ओपन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठून प्रसिद्धीझोतात आली. तिने २०१६ साली चारपैकी तीन ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेऱ्या गाठण्याचा पराक्रम केला ज्यापैकी तिने २ ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या. तसेच १२ सप्टेंबर २०१६ रोजी तिने डब्ल्यू.टी.ए. एकेरी क्र्मवारीमध्ये अव्वल स्थान पटकावले. २०१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत कर्बरने एकेरीचे रौप्यपदक देखील पटकावले. २०१६ मध्ये तिने ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पहिल्यांदाच जिंकले. [ संदर्भ हवा ]

अँजेलिक कर्बर
देश जर्मनी ध्वज जर्मनी
वास्तव्य पोलंड
जन्म १८ जानेवारी, १९८८ (1988-01-18) (वय: ३६)
ब्रेमन, पश्चिम जर्मनी
उंची १.७३ मी
सुरुवात २००३
शैली डाव्या हाताने, दोनहाती बॅकहँड
बक्षिस मिळकत $१,४३,१३,३७६
एकेरी
प्रदर्शन 683–378
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १ (१२ सप्टेंबर २०१६)
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. १ (१२ सप्टेंबर २०१६)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (२०१६)
फ्रेंच ओपन उपांत्यपूर्व फेरी (२०१२)
विंबल्डन उपविजयी (२०१६)
यू.एस. ओपन विजयी (२०१६)
दुहेरी
प्रदर्शन 59–63
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १०३
शेवटचा बदल: सप्टेंबर २०१६.


ऑलिंपिक पदक माहिती
जर्मनीजर्मनी या देशासाठी खेळतांंना
ऑलिंपिक
रौप्य २०१६ रियो दि जानेरो एकेरी

ग्रँड स्लॅम अंतिम फेऱ्या

संपादन

एकेरी: ३ (२ - १)

संपादन
निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार प्रतिस्पर्धी स्कोर
विजयी २०१६ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड   सेरेना विल्यम्स 6–4, 3–6, 6–4
उपविजयी २०१६ विंबल्डन गवताळ   सेरेना विल्यम्स 5–7, 3–6
विजयी २०१६ यू.एस. ओपन हार्ड   कॅरोलिना प्लिस्कोव्हा 6–3, 4–6, 6–4

बाह्य दुवे

संपादन