२०१९ ओमान क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग ब ही लिस्ट - अ सामने असलेली लीग स्पर्धा २ ते १२ डिसेंबर २०१९ दरम्यान ओमानमध्ये खेळविण्यात आली. सदर स्पर्धा २०२३ क्रिकेट विश्वचषकाच्या पात्रता स्पर्धेचा एक भाग होती. क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीगच्या ब गटातील ही पहिली फेरी होती.[१][२][३]युगांडाने सर्व पाच सामने जिंकून प्रथम स्थान पटकावले. द्वितीय आणि तृतीय फेरी इसवी सन २०२२ मध्ये झाली.