१९८९-९० नेहरू चषक
१९८९-९० नेहरू चषक (किंवा प्रायोजकांनुसार १९८९-९० एम.आर.एफ विश्व मालिका - जवाहरलाल नेहरू चषक) ही एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली क्रिकेट स्पर्धा १५ ऑक्टोबर - १ नोव्हेंबर १९८९ दरम्यान भारतामध्ये आयोजित केली गेली होती. सर्व सामने हे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने होते. स्वतंत्र भारतीय संघराज्याचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) या भारतात क्रिकेटचे व्यवस्थापन करण्याऱ्या संस्थेने ही स्पर्धा आयोजित केली. सदर स्पर्धा मद्रास रबर फॅक्ट्रीने प्रायोजीत केली होती.
१९८९-९० नेहरू चषक (१९८९-९० एम.आर.एफ विश्व मालिका) | |
---|---|
व्यवस्थापक | भारतीय क्रिकेट नियामक मंडळ |
क्रिकेट प्रकार | आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने |
स्पर्धा प्रकार | साखळी सामने आणि बाद फेरी |
यजमान | भारत |
विजेते | पाकिस्तान |
सहभाग | ६ |
सामने | १८ |
मालिकावीर | इम्रान खान |
सर्वात जास्त धावा | डेसमंड हेन्स (३६६) |
सर्वात जास्त बळी | विन्स्टन बेंजामिन (१३) |
या स्पर्धेत यजमान भारत, पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आणि वेस्ट इंडीज या सहा देशांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांनी भाग घेतला. सर्व देशांना एकाच गटात ठेवण्यात आले. प्रत्येक संघाने इतर संघाशी एक सामना खेळला. गट फेरीतून अव्वल चार संघ बाद फेरीसाठी पात्र ठरले.
पहिल्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडवर ६ गडी राखून मात केली आणि अंतिम सामन्यास पात्र ठरले. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात वेस्ट इंडीजने यजमान भारताला ८ गडी राखून हरवत अंतिम सामना गाठला. अंतिम सामन्यात पाकिस्तानने ८ गडी राखून विजय मिळवत नेहरू चषक जिंकला. पाकिस्तानच्या इम्रान खानला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. वेस्ट इंडीजच्या डेसमंड हेन्स हा स्पर्धेतील सर्वाधिक ३६६ धावा करत आघाडीचा फलंदाज ठरला तर वेस्ट इंडीजचाच विन्स्टन बेंजामिन याने स्पर्धेत सर्वाधिक १३ गडी मिळवत आघाडीचा गोलंदाज ठरला.
गुणफलक
संपादनअंतिम गुणफलक खालीलप्रमाणे[१]
संघ
|
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती | नोट्स |
---|---|---|---|---|---|---|---|---|
भारत | ५ | ३ | २ | ० | ० | १२ | ४.६३० | उपांत्य सामन्यांसाठी पात्र |
इंग्लंड | ५ | ३ | २ | ० | ० | १२ | ४.५२० | |
पाकिस्तान | ५ | ३ | २ | ० | ० | १२ | ४.३०० | |
वेस्ट इंडीज | ५ | ३ | २ | ० | ० | १२ | ४.१३० | |
ऑस्ट्रेलिया | ५ | २ | ३ | ० | ० | ८ | ४.३६० | |
श्रीलंका | ५ | १ | ४ | ० | ० | ४ | ४.०५० |
गट फेरी
संपादन १५ ऑक्टोबर १९८९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- अँगस फ्रेझर आणि ॲलेक स्टुअर्ट (इं) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२३ ऑक्टोबर १९८९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- अक्रम रझा (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकददिवसीय पदार्पण केले.
२५ ऑक्टोबर १९८९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- ललितामाना फर्नांडो (श्री) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२७ ऑक्टोबर १९८९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- या सामन्याच्या निकालामुळे भारत, इंग्लंड आणि वेस्ट इंडीज उपांत्य फेरीसाठी पात्र.
२७ ऑक्टोबर १९८९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- या सामन्याच्या निकालामुळे श्रीलंका स्पर्धेतून बाद.
२८ ऑक्टोबर १९८९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- या सामन्याच्या निकालामुळे पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र आणि ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद.
बाद फेरी
संपादनउपांत्य सामने
संपादन१ला उपांत्य सामना
संपादन ३० ऑक्टोबर १९८९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण
- नासिर हुसेन (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा उपांत्य सामना
संपादन
अंतिम सामना
संपादन
संदर्भ आणि नोंदी
संपादनबाह्यदुवे
संपादन