हेल्मुट कोल
हेल्मुट जोसेफ मायकेल कोल (जर्मन: Helmut Josef Michael Kohl; एप्रिल ३, इ.स. १९३० - १६ जून, इ.स. २०१७) हा १९८२ ते १९८९ ह्या काळादरम्यान पश्चिम जर्मनीचा व जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर १९९७ सालापर्यंत संयुक्त जर्मनी देशाचा चान्सेलर होता. शीतयुद्ध समाप्त करण्यात व जर्मनीच्या एकत्रीकरणात कोलची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका होती. कोलच्या नेतृत्वाखाली १९८९ साली बर्लिनची भिंत पाडून टाकण्यात आली व पश्चिम व पूर्व जर्मनी ह्या देशांचे एकत्रीकरण होऊन जर्मनी पुन्हा एकदा एकसंध राष्ट्र बनले.
हेल्मुट कोल | |
जर्मनीचा चान्सेलर
| |
कार्यकाळ १ ऑक्टोबर १९८२ – २७ ऑक्टोबर १९९८ | |
मागील | हेल्मुट श्मिट |
---|---|
पुढील | गेर्हार्ड श्र्योडर |
ऱ्हाइनलांड-फाल्त्स राज्याचा राज्यपाल
| |
कार्यकाळ १९ मे १९६९ – २ डिसेंबर १९७६ | |
जन्म | ३ एप्रिल, १९३० लुडविगशाफन, वायमार प्रजासत्ताक |
मृत्यू | ३ एप्रिल, १९३० |
राजकीय पक्ष | ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन |
सही |
कोल आणि फ्रांस्वा मित्तरां यांना मास्ट्रिख्ट कराराबद्दल श्रेय देण्यात येते. ह्या करारामुळे युरोपियन संघाच्या स्थापनेला चालना मिळाली. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश व बिल क्लिंटन ह्यांनी विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील सर्वोत्तम युरोपीय नेता ह्या शब्दांत कोलचा गौरव केला आहे.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |