हिझबुल्ला (अरबी: حزب الله‎) ही पश्चिम आशियाच्या लेबेनॉन देशामधील एक ज्यूविरोधी शिया अतिरेकी संघटना व राजकीय पक्ष आहे. १९८२ साली इस्रायलच्या लेबेनॉनवरील हल्ल्यानंतर काही मुस्लिम धर्मगुरूंनी इराणच्या पाठिंब्यावर हिझबुल्लाची स्थापना केली. हिझबुल्लाचे पुढारी इराणचे अयातोल्ला रुहोल्ला खोमेनी ह्यांचे अनुयायी होते. इराणी सैन्याने हिझबुल्लाला लष्करी प्रशिक्षण दिले. १९८२ च्या हल्ल्यानंतर इस्रायलने दक्षिण लेबेनॉनमधील काही भूभाग बळकावला होता. १९८५ ते २००० दरम्यान हिझबुल्लाने इस्रायली सेनेविरूद्ध गनिमी कावा वापरून लढाई केल्यानंतर अखेर मे २००० मध्ये इस्रायलने दक्षिण लेबेनॉनमधून माघार घेतली.

हसन नसरल्ला हा हिझबुल्लाचा प्रमुख आहे.

सध्या हिझबुल्ला लेबेनॉनमधील एक प्रमुख राजकीय पक्ष असून तेथील शिया मुस्लिम जनतेचा हिझबुल्लाला मोठा पाठिंबा आहे. अमेरिका, फ्रान्स, युनायटेड किंग्डम, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स, सौदी अरेबिया, इस्रायल ह्या देशांनी हिझबुल्लाला अतिरेकी संघटना ठरवले असून त्यावर पूर्ण अथवा अंशतः बंदी घातली आहे.

२०११ सालापासून सुरू असलेल्या सीरियन यादवीमध्ये हिझबुल्लाने सीरियन सरकार व बशर अल-अस्सादची बाजू घेतली असून सीरियन विरोधकांसोबत लढा चालवला आहे.

बाह्य दुवे

संपादन