हल्डरिश झ्विंग्ली (जर्मन: Huldrych Zwingli; १ जानेवारी १४८४, ११ ऑक्टोबर १५३१) हा स्वित्झर्लंडमधील धर्मसुधारक होता. याने स्वित्झर्लंडमधील रोमन कॅथलिक धर्मसंस्थेविरूद्ध लढा दिला होता. त्याने धर्मगुरूंच्या दांभिक वर्तनावर टीका केली. आम्ही पोपला प्रमाण मानत नाही, बायबललाच प्रमाण मानतो अशी घोषणा त्याने केली. स्वित्झर्लंडमधील कॅलव्हिन पंथाचा तो संस्थापक होता. धर्मसंस्था एकाच पोपच्या अधिपत्याखाली राहू नये, ख्रिस्तीधर्मीयांचे प्रजासत्ताक बनावे असे त्याचे मत होते. त्याने कॅथॅालिक पंथाचा त्याग केला. त्यामुळे स्वित्झर्लंडमध्ये प्रोटेस्टंट पंथाचा प्रसार झाला. इ.स. १५३१ मध्ये कॅपेल येथे पोप व झ्विंग्लीच्या अनुयायांत झालेल्या लढाईत त्याचा मृत्यू झाला. जर्मनीच्या मार्टिन ल्युथर व फ्रान्सच्या जाॅन कॅल्व्हिन ह्यांच्यासमवेत झ्विंग्लीलाही प्रोटेस्टंट धर्माचा संस्थापक मानले जाते.

हल्डरिश झ्विंग्ली

बाह्य दुवे

संपादन