हनमकोंडा जिल्ह्याचे नकाशावरील स्थान


हनमकोंडा जिल्हा किंवा हनुमकोंडा जिल्हा, (पूर्वीचा वारंगल शहरी जिल्हा) हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे. हनमकोंडा जिल्हा तेलगंणाच्या मध्य भागात स्थित आहे व २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे १०.१३ लाख इतकी होती. हनमकोंडा हे वारंगल महानगरामधील एक शहर हनमकोंडा जिल्ह्याचे मुख्यालय आहे. जिल्ह्याची सीमा जनगाव, करीमनगर, वारंगल, भूपालपल्ली आणि सिद्धीपेट जिल्ह्यांना लागून आहे.

हनमकोंडा जिल्हा
హనుమకొండ జిల్లా (तेलुगु)
तेलंगणा राज्यातील जिल्हा
हनमकोंडा जिल्हा चे स्थान
हनमकोंडा जिल्हा चे स्थान
तेलंगणा मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य तेलंगणा
मुख्यालय हनमकोंडा
मंडळ १४
क्षेत्रफळ
 - एकूण १,३०९ चौरस किमी (५०५ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १०,६९,२६१ (२०११)
-लोकसंख्या घनता ८१७ प्रति चौरस किमी (२,१२० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या ६८.५१%
-साक्षरता दर ७६.१७%
-लिंग गुणोत्तर ९९७ /
संकेतस्थळ

२०१४ सालापूर्वी हनमकोंडा जिल्हा आंध्र प्रदेश राज्याच्या भाग होता. काकतीय साम्राज्यकाळामध्ये हनमकोंडा एक महत्त्वाचे स्थान होते. २०१६ साली वारंगल जिल्याचे विभाजन करून वारंगल शहरी जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. ऑगस्ट २०२१ मध्ये, वारंगल शहरी जिल्ह्याचे नामकरण हणमकोंडा जिल्हा असे करण्यात आले.[]

प्रमुख शहरे

संपादन

भूगोल

संपादन

हनमकोंडा जिल्ह्याचे क्षेत्रफळ १,३०९ चौरस किलोमीटर (५०५ चौरस मैल) आहे.

लोकसंख्या

संपादन

२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या हनमकोंडा जिल्ह्याची लोकसंख्या १०,६९,२६१ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे ९९७ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ७६.१७% आहे. एकूण लोकसंख्येच्या ६८.५१% शहरी भागात राहतात.

हनमकोंडा जिल्ह्या मध्ये १४ मंडळे आहेत:

हनमकोंडा महसूल विभाग:

  1. हनमकोंडा
  2. काझीपेठ
  3. कमलापूर
  4. हसनपर्ति
  5. इनोवालु
  6. वेलिरु
  7. धर्मसागर
  8. एल्कातुर्ति
  9. भिमदेवरपल्लि

पारकल महसूल विभाग:

  1. परकाल
  2. नडि कुडा
  3. दामेरा
  4. आत्मकूरु
  5. श्यामपेठ

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
  1. ^ "Hanumakonda District, Government of Telangana | Welcome to Hanumakonda District | India" (इंग्रजी भाषेत). 2022-01-24 रोजी पाहिले.