स्वीडन क्रिकेट संघाचा फिनलंड दौरा, २०२१

स्वीडन क्रिकेट संघाने चार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑगस्ट २०२१ दरम्यान फिनलंडचा दौरा केला. स्वीडन आणि फिनलंड मधील ही पहिलीच आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय मालिका होती. आठवड्याभरापूर्वीच डेन्मार्कचा दौरा केल्यानंतर लगेचच स्वीडनचा संघ फिनलंड मध्ये दाखल झाला. सर्व सामने केरावा मधील केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान येथे झाले. दौऱ्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेट खेळाडू जाँटी ऱ्होड्स यांना स्वीडन क्रिकेट बोर्डाने स्वीडनचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले.

स्वीडन क्रिकेट संघाचा फिनलंड दौरा, २०२१
फिनलंड
स्वीडन
तारीख २१ – २२ ऑगस्ट २०२१
संघनायक नेथन कॉलिन्स अभिजीत व्यंकटेश
२०-२० मालिका
निकाल ४-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२
सर्वाधिक धावा नेथन कॉलिन्स (११४) अभिजीत व्यंकटेश (११५)
सर्वाधिक बळी अमजद शेर (८) अभिजीत व्यंकटेश (७)

पहिल्या दिवशी दोन्ही सामने जिंकत फिनलंडने मालिकेत २-० ने आघाडी घेतली. परंतु दुसऱ्या दिवशीचे दोन्ही सामने स्वीडनने जिंकले. तथापि चार सामन्यांची आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
२१ ऑगस्ट २०२१
१०:३०
धावफलक
स्वीडन  
१३५/६ (१९ षटके)
वि
  फिनलंड
१३९/६ (१७.५ षटके)
अभिजीत व्यंकटेश ५४ (४१)
अमजद शेर २/१२ (४ षटके)
नेथन कॉलिन्स ६४* (४५)
अभिजीत व्यंकटेश ३/१३ (३ षटके)
फिनलंड ४ गडी राखून विजयी.
केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा
पंच: श्रीनिधी रविंद्र (फि) आणि जरी स्काबेल (फि)
  • नाणेफेक : स्वीडन, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी १९ षटकांचा करण्यात आला.
  • फिनलंड आणि स्वीडन मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • स्वीडनने फिनलंडमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • फिनलंडचा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात स्वीडनवर मिळवलेला पहिला विजय.
  • राझ मोहम्मद, नवीद शहिद आणि महेश तांबे (फि) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा सामना

संपादन
२१ ऑगस्ट २०२१
१३:००
धावफलक
स्वीडन  
१४१/८ (२० षटके)
वि
  फिनलंड
१४२/६ (१८.५ षटके)
दिपांजन दे ७५* (४९)
अमजद शेर ३/१४ (४ षटके)
अमजद शेर ३७* (१५)
कुद्रतुल्लाह मीर अफजैल ३/२८ (३.५ षटके)
फिनलंड ४ गडी राखून विजयी.
केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा
पंच: श्रीनिधी रविंद्र (फि) आणि सुमंता समंता (फि)
सामनावीर: स्वीडन, फलंदाजी.

३रा सामना

संपादन
२२ ऑगस्ट २०२१
१०:३०
धावफलक
फिनलंड  
१४१/७ (२० षटके)
वि
  स्वीडन
११३/७ (१४ षटके)
अनिकेत पुश्ते ५६ (५२)
ओक्ताय घोलामी २/२३ (४ षटके)
खालिद झहिद ४७* (२०)
पीटर घालघेर ३/२९ (३ षटके)
स्वीडन ३ गडी राखून विजयी (ड/लु पद्धत).
केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा
पंच: सुमंता समंता (फि) आणि जरी स्काबेल (फि)
  • नाणेफेक : स्वीडन, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे स्वीडनला १५ षटकांमध्ये ११० धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
  • स्वीडनचा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात फिनलंडवर मिळवलेला पहिला विजय.
  • अदनान सईद (फि) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

४था सामना

संपादन
२२ ऑगस्ट २०२१
१३:००
धावफलक
फिनलंड  
१४५/७ (२० षटके)
वि
  स्वीडन
१४६/४ (१७.१ षटके)
अमजद शेर ३४ (१९‌)
लियाम कार्लसन ३/३८ (४ षटके)
अभिजीत व्यंकटेश ४३ (२४)
अनिकेत पुश्ते १/४ (१ षटक)
स्वीडन ६ गडी राखून विजयी.
केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा
पंच: श्रीनिधी रविंद्र (फि) आणि सुमंता समंता (फि)
  • नाणेफेक : स्वीडन, क्षेत्ररक्षण.