स्वीडन क्रिकेट संघाचा डेन्मार्क दौरा, २०२१

स्वीडन क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑगस्ट २०२१ दरम्यान डेन्मार्कचा दौरा केला. या दौऱ्यात स्वीडनने आपले पहिले अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळले. डेन्मार्कने या मालिकेद्वारे २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता स्पर्धेसाठी सराव केला. सर्व सामने ब्रोंडबाय मधील सॅवहोल्म पार्क येथे झाले. दौऱ्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेट खेळाडू जाँटी ऱ्होड्स यांना स्वीडन क्रिकेट बोर्डाने स्वीडनचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले.

स्वीडन क्रिकेट संघाचा डेन्मार्क दौरा, २०२१
डेन्मार्क
स्वीडन
तारीख १४ – १५ ऑगस्ट २०२१
संघनायक फ्रेडेरिक क्लोकर अभिजीत व्यंकटेश
२०-२० मालिका
निकाल डेन्मार्क संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा तरणजीत भरज (११८) अभिजीत व्यंकटेश ५९
सर्वाधिक बळी लकी अली (५)
देलावर खान (५)
हस्सन महमूद (१०)

डेन्मार्कने मालिका २-१ ने जिंकली.

डेन्मार्कविरुद्धची मालिका संपताच स्वीडन चार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी फिनलंडला रवाना झाला.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
१४ ऑगस्ट २०२१
१०:३०
धावफलक
डेन्मार्क  
१११ (१९.५ षटके)
वि
  स्वीडन
१०३/६ (२० षटके)
हामिद शाह २५ (२१)
हस्सन महमूद ५/१४ (३.५ षटके)
अभिजीत व्यंकटेश २७ (३१)
देलावर खान ३/१७ (४ षटके)
डेन्मार्क ८ धावांनी विजयी.
सॅवहोल्म पार्क, ब्रोंडबाय
पंच: ॲलन फ्रॉम-हॅन्सेन (डे) आणि जेस्पर डेन्सन (डे)
सामनावीर: हस्सन महमूद (स्वीडन)
  • नाणेफेक : स्वीडन, क्षेत्ररक्षण.
  • स्वीडनचा पहिला वहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • डेन्मार्क आणि स्वीडन मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • स्वीडनने डेन्मार्कमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये डेन्मार्कने स्वीडनला प्रथमच पराभूत केले.
  • फ्रेडेरिक क्लोकर (डे), वायनंद बोशॉफ, दिपांजन डे, ओक्ताय घोलामी, हुमायू कबीर, लियाम कार्लसन, राहेल खान, हस्सन महमूद, लेमार मेमंद, अभिजीत व्यंकटेश, खालिद झहिद आणि इमाल झुवाक (स्वी) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा सामना

संपादन
१४ ऑगस्ट २०२१
१४:३०
धावफलक
डेन्मार्क  
१३५/४ (२० षटके)
वि
  स्वीडन
१३७/७ (२० षटके)
हामिद शाह ६६ (५६)
हस्सन महमूद २/१४ (३ षटके)
वायनंद बोशॉफ ३२ (३०)
लकी अली ३/१५ (४ षटके)
स्वीडन ३ गडी राखून विजयी.
सॅवहोल्म पार्क, ब्रोंडबाय
पंच: ॲलन फ्रॉम-हॅन्सेन (डे) आणि जेस्पर डेन्सन (डे)
सामनावीर: हामिद शाह (डेन्मार्क)
  • नाणेफेक : स्वीडन, क्षेत्ररक्षण.
  • स्वीडनचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० विजय.
  • आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये स्वीडनने डेन्मार्कला प्रथमच पराभूत केले.
  • सूर्या आनंद (डे), कुद्रतुल्लाह मीर अफझैल आणि राहुल गौथमन (स्वी) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

३रा सामना

संपादन
१५ ऑगस्ट २०२१
१३:००
धावफलक
स्वीडन  
१२२/९ (२० षटके)
वि
  डेन्मार्क
१२७/४ (१९.१ षटके)
राहेल खान ३५ (२७)
ओमर हयात ३/२३ (४ षटके)
तरणजीत भरज ६३* (४६)
हस्सन महमूद ३/२५ (३.१ षटके)
डेन्मार्क ६ गडी राखून विजयी.
सॅवहोल्म पार्क, ब्रोंडबाय
पंच: ॲलन फ्रॉम-हॅन्सेन (डे) आणि मुनीब हक (डे)
सामनावीर: तरणजीत भरज (डेन्मार्क)
  • नाणेफेक : डेन्मार्क, क्षेत्ररक्षण.
  • बझ अयुबी (स्वी) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.