पोलंडचा पहिला स्तानिस्लॉस

(स्तानिस्लॉस पहिला या पानावरून पुनर्निर्देशित)

स्तानिस्लॉस पहिला (ऑक्टोबर २०, इ.स. १६७७:ल्वोव - फेब्रुवारी २३, इ.स. १७६६) हा सप्टेंबर २४, इ.स. १७०५ ते इ.स. १७०९सप्टेंबर इ.स. १७३३ ते जानेवारी २६, इ.स. १७३६ या कालात पोलंडचा राजा होता.

रफाल लेझिझिन्स्कि व ऍन कॅथरिन याब्लोनोव्स्काच्या या मुलाला राजा होण्यासाठी राजकीय आधार नव्हता परंतु एक छोटे सैन्य व लाच देण्यासाठी भरपूर पैसे, याच्या बळावर त्याने स्वतःला राजा ठरवून घेतले. स्वीडनच्या चार्ल्स बाराव्याने त्याला मान्यता दिल्यावर स्तानिस्लॉसचे स्थान बळकट झाले.

पदच्युत झालेल्या ऑगस्ट दुसऱ्याने १७०९मध्ये स्तानिस्लॉसला पदच्युत केले. १७०९ ते इ.स. १७२५पर्यंत स्तानिस्लॉस लॉरेन प्रांतात राहिला. १७२५ ते १७३३ पर्यंत तो आपल्या मुलीकडे (जी फ्रांसच्या लुई पंधराव्याची राणी झाली होती) राहिला. १७३३मध्ये ऑगस्ट दुसऱ्याचा मृत्यु झाल्यावर आपल्या जावयाची (पंधराव्या लुईची) मान्यता मिळवुन गुप्तवेशात तो वॉर्सोला पोचला. तेथे त्याला पुन्हा एकदा राजा घोषित करण्यात आले. हे पाहून रशियाने आपले सैन्य पाठवले. एक वर्षाच्या युद्धानंतर जानेवारी २६, १७३६ला स्तानिस्लॉसने पोलंडच्या राज्यपदाला अखेरचा रामराम ठोकला. जसा आला तसा गुप्तवेशात त्याने पुन्हा फ्रांसला पळ काढला.

तेथे ९० वर्षे वयाचा असताना त्याचा अंत झाला.