फ्रान्सचा सोळावा लुई

१७७४ ते १७९२ पर्यंत फ्रान्सचा राजा
(सोळावा लुई, फ्रान्स या पानावरून पुनर्निर्देशित)

सोळावा लुई (२३ ऑगस्ट १७५४ - २१ जानेवारी १७९३) हा इ.स. १७७४ ते इ.स. १७९२ दरम्यान फ्रान्सनाबाराचा राजा होता. पंधराव्या लुईचा नातू असलेल्या सोळाव्या लुईला त्याच्या आजोबांच्या अनेक चुकांचे परिणाम भोगावे लागले. फ्रान्समध्ये स्वातंत्र्यचळवळ सुरू झाली व फ्रेंच राज्यक्रांतीनंतर फ्रान्समधील संपूर्ण एकाधिकारशाही बंद करून संविधानिक एकाधिकारशाही सुरू झाली. ह्या दरम्यान सोळाव्या लुईला अटक करून त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवला गेला. २१ जानेवारी १७९३ रोजी त्याला शिरच्छेद करून मारून टाकण्यात आले.

सोळावा लुई लुई XVI
Louis XVI

कार्यकाळ
१० मे १७७४ – २१ सप्टेंबर १७९२
मागील पंधरावा लुई
पुढील राजेशाही बरखास्त
पहिले फ्रेंच प्रजासत्ताक

जन्म २३ ऑगस्ट १७५४ (1754-08-23)
व्हर्सायचा राजवाडा
मृत्यू २१ जानेवारी, १७९३ (वय ३८)
पॅरिस
पत्नी मरी आंत्वानेत
सही फ्रान्सचा सोळावा लुईयांची सही

सोळावा लुई अमेरिकेचा मोठा समर्थक होता व अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याच्या आदरार्थ केंटकीमधील लुईव्हिल ह्या शहरास त्याचे नाव दिले गेले आहे.

हे सुद्धा पहा

संपादन