सातकोर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील एक गाव आहे.

  ?सातकोर

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ०.४३५२१ चौ. किमी
जवळचे शहर विक्रमगड
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
१,४६४ (२०११)
• ३,३६४/किमी
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा वारली
कोड
आरटीओ कोड

• एमएच/४८ /०४

भौगोलिक स्थान

संपादन

हवामान

संपादन

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन

संपादन

हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २७८ कुटुंबे राहतात. एकूण १४६४ लोकसंख्येपैकी ७०९ पुरुष तर ७५५ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.

नागरी सुविधा

संपादन

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस विक्रमगड बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा विक्रमगडवरून उपलब्ध असतात.

जवळपासची गावे

संपादन

आपटी बुद्रुक, उपराळे, गडधे, डोल्हारी खुर्द, सावडे,नागझरी, यशवंतनगर, संगमनगर,करसुड, घाणोडे, चारीबुद्रुक ही जवळपासची गावे आहेत.डोल्हारी खुर्द ग्रामपंचायतीमध्ये डोल्हारी खुर्द,गडधे,आणि सातकोर ही गावे येतात.

संदर्भ

संपादन

१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

४. http://tourism.gov.in/

५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036

६. https://palghar.gov.in/

७. https://palghar.gov.in/tourism/