करसुड
करसुड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील एक गाव आहे.
?करसुड महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | ०.७३७ चौ. किमी |
जवळचे शहर | विक्रमगड |
जिल्हा | पालघर जिल्हा |
लोकसंख्या • घनता |
२,५६२ (२०११) • ३,४७६/किमी२ |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | वारली |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/४८ /०४ |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. येथील हवामानात हल्ली काही शेतकरी गवार लागवड करीत आहेत. नीलम ६१,मिलन ५१,स्वाती ह्या अडीच महिन्यात उत्पन्न देणाऱ्या गवार जातीची लागवड केली जाते. येथील लोक रोजगारासाठी दिवाळीनंतर स्थलांतर करीत असतात ते काही प्रमाणात आता थांबण्याची शक्यता आहे. काही शेतकरी कमी पाण्यावर पिकणारा भाजीपाला व फुलशेती करायला लागले आहेत.[१]
लोकजीवन
संपादनहे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ४७९ कुटुंबे राहतात. एकूण २५६२ लोकसंख्येपैकी १२९९ पुरुष तर १२६३ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.
नागरी सुविधा
संपादनगावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस विक्रमगड बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा विक्रमगडवरून उपलब्ध असतात.
जवळपासची गावे
संपादनविळशेत, कोंडगाव, तळवली तर्फे सातकोर, वेढे, घाणोडे,चारीबुद्रुक, आपटी बुद्रुक, उपराळे, सातकोर, डोल्हारी खुर्द,चंद्रनगर ही जवळपासची गावे आहेत.करसुड ग्रामपंचायतीमध्ये घाणोडे,आणि करसुड ही गावे येतात.
संदर्भ
संपादन१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036
७. https://palghar.gov.in/tourism/
- ^ महाराष्ट्र टाईम्स, बुधवार, दिनांक २२ जानेवारी २०२५