Yog2104
स्वागत | Yog2104, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | Yog2104, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,५३४ लेख आहे व १४६ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
प्राचीन काळातील आत्मचरित्रे
संपादनप्राचीन काळातील आत्मचरित्रे
मराठी भाषेत आत्मचरित्रांचे दालन अतिशय समृद्ध स्वरूपाचे आहे. १९७५ नंतरच्या काळात त्यात झपाट्याने वाढ होत गेली. आधुनिक काळातील विविध क्षेत्रात कार्यरत असणार्या विविध मान्यवर लोकांनी मोठ्या प्रमाणात आत्मचरित्र लेखन केले आहे. नवीन पिढीला आदर्शवत वाट दाखवणारी ही आत्मचरित्रे मराठी साहित्यातील एक अनमोल ठेवा आहे. रंजकता, कुतुहलपूर्ण, जीवन दृष्टी विकसीत करणारी ही आत्मचरित्रे जीवन अनुभव समृद्ध करणारी आहे.
आत्मचरित्रांची ही परंपरा अगदी जुन्या काळापासून प्रचलित आहे. निरंजन माधव लिखीत ‘ संप्रदाय परिमल ’ हा ग्रंथ पती पत्नी यांच्या संवाद रूपात आहे. पेशवाईचे आधारस्तंभ नाना फडणवीस यांनी देखील आत्मचरित्रात्मक लेखन केले आहे. ओघवती भाषा आणि प्रांजळपणा हे गुण या लेखनात दिसून येतात. गंगाधरशास्त्री पटवर्धन यांनी त्रोटक स्वरूपात आत्मचरित्राचे लेखन केले आहे. आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे आत्मचरित्र १८७९ मध्ये ‘ ज्ञानप्रकाश ‘ मधून प्रकाशित झाले. गोविंद बाबाजी जोशी याचे माझे प्रवासाची हकिकत हे आत्मचरित्र अत्यंत रोचक असून सुमारे ७०० पानांचे आहे.
विष्णुभट यांचे ‘ माझा प्रवास ‘ हा ग्रंथ आत्मवृत्तपर आहे. १८५७ च्या बंडाची कथा यात आहे. तसेच झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रत्यक्ष भेटीचे वर्णन यात केले आहे. प्रार्थना समाजाचे प्रमुख दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्या आत्मचरित्रात १८१४ ते १८४७ या दरम्यानच्या काळातले चित्रण आहे. बाबा पद्मनजी यांनी आपल्या ‘ अरूणोद्य ‘ या आत्मकथनात तत्कालीन समाजाचे चित्रण केले आहे.
प्राचीन काळातील या आत्मचरित्रांचे अवलोकन करता असे दिसून येते की लेखकाची जीवनविषयक कृतज्ञता, समाधानी वृत्ती यात आढळते.
Yog2104 (चर्चा) ०९:२८, १३ एप्रिल २०१९ (IST) yogesh khalkar
रामानुजाचार्य
संपादनरामानुजाचार्य : एक थोर भारतीय तत्त्वज्ञ
भारत ही एक संताची भुमी आहे. या भुमीत अनेक संत महात्मे आणि थोर तत्त्वज्ञ होवून गेले आहेत. या प्रत्येकाने जीवनाचा आपल्या पद्धतीने अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला. सामान्य माणासाला यथार्थ उपदेश करून जीवन जगण्याचा एक मार्ग दर्शवला. अशा व्यक्तिमत्त्वाचा भारताला लाभलेला हा ठेवा म्हणजे भारत देशाच्या समृद्ध सांस्कृतिक ऐश्वर्याचा भाग मानावा लागेल. या सर्व लोकांनी हे विश्वची माझे घर ही संकल्पना मान्य केली. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म / भेदाभेद भ्रम अमंगळ // असा निर्वाळा सर्वच भारतीय महापुरूषांच्या शिकवणुकीत दिसून येतो.
रामानुजाचार्य यांनी वैष्णव संप्रदायास आपल्या ब्रह्मसुत्रावरील भाष्याने अध्यात्मिक प्रतिष्ठा मिळवून दिली. भक्तीपरंपरेचे ते प्रवर्तक म्हणुन देखील ते नावाजले गेले. भक्ती एक सर्वश्रेष्ठ शक्ती असून ज्ञान आणि कर्म याहून ती भिन्न आहे अशी वैष्णव संप्रदायाची धारणा होती. रामानुजाचार्य यांना प्राचीन अशा अलवार आणि आचार्य परंपरेविषयी अभिमान वाटायचा. सर्वार्थाने त्यांचे हे व्यक्तिमत्तव म्हणजे एक नवल होते असे मानले तर वावगे ठरणार नाही.
रामानुजांच्या वडिलांचे नाव आसुरी केशवाचार्य तर आईचे नाव कांतिमती होते. इ. स. १०१७ ते इ.स. ११३७ असा सुमारे सव्वाशे वर्षाचा काळ त्यांच्या वाट्याला आला. जन्मसमयी त्यांच्या अंगावर लक्ष्मणाशी संबधित काही लक्षणे दिसल्याने त्यांचे ‘ राम – अनुज ‘! रामानुज असे नामकरण करण्यात आले. प्रथेप्रमाणे त्यांना गुरूगृही जावे लागले. पण तेथे त्यांना मानवले नाही. तात्त्विक वादांमुळे त्यांचे गुरूंशी खटके उडू लागले. यातच त्यांना ठार माऋण्याचा प्रयत्न केला गेला, पण त्याची चाहूल लागल्याने रामानुज या संकटातून बाहेर पडले.
याच सुमारास एक श्रेष्ठ वैष्णवाचार्य आपल्या उत्तराधिकार्याच्या शोधात होते. त्यांनी आपल्या एका शिष्याला रामानुज यांच्याकडे पाठवले. त्यांना ब्रह्मसुत्रावर भाष्यलेखन करणारा एक समर्थ शिष्य हवा होता. रामानुज त्यांना भेटायला गेले पण त्यापुर्वीच गुरूंचे निधन झाले. वैष्णव परंपरेचे मंडन, ब्रह्मसुत्रावर भाष्य आणि द्राविड वेदांचा शोध घेवून संकलन करणे हे रामानुज यांच्या जीवनाचे ध्येय बनले. त्यांनी अथक प्रयत्नातून आपले ध्येय पूर्ण केले. आपल्या प्रदीर्घ अशा जीवन काळात त्यांनी वैष्णव संप्रदाचा पाया भक्कम केला.
आद्य शंकराचार्य व रामानुजय हे भारतीय संस्कृतीचे एक मार्गदर्शक तत्तवज्ञ होते. वैषाख शुक्ल पंचमीस जन्माला आलेले हे दोन तपस्वी तत्तवज्ञ एकाच शाश्वत तत्तवाचे दोन बाजुचे प्रतिपादक होते. ब्र्ह्म चिंतन हा दोचांच्या जीवनाचा समान आधार होता. जीवमात्राची ब्रह्ममयता, ब्रह्मरूपता हेच दोघांनी परम श्रेष्ठ जीवन आहे असे प्रतिपादन केले.