सदस्य चर्चा:V.narsikar/जुनी चर्चा ९
नमस्कार
संपादनआपला अंदाज अगदी बरोबर आहे. मी मूळचा नागपूरचा आहे. उच्च-शिक्षणासाठी नागपूर बाहेर पडावे लागले. तथापि नागपूर बद्दल नितांत आस्था आहे. मी इंग्रजी विकिपीडियावर देखील नागपूर विषयक लेखांवर काम करतो आहे. येथेही संपादनात जमेल तेवढे सहकार्य करण्याचा प्रयास राहील. धन्यवाद. Pranav.sakulkar (चर्चा) २२:४०, १० एप्रिल २०१३ (IST)
दिनविशेष
संपादननरसीकर,
दिनविशेष घालण्याची कल्पना चांगली आहे. दोन सूचना (सुझाव) --
- या दिवशी साजरे केले जाणारे सण व उत्सव हा उपविभाग असावा.
- दुसरा दिनविशेष हा उपविभाग असावा. यात जयंत्या, पुण्यतिथ्यांची नोंद असावी. असे करताना उल्लेखनीयतेबद्दल दक्षता घ्यावी. तसेच, ज्या जयंत्या, इ. इंग्लिश तारखेनुसार पाळल्या जातात त्यांचा सहसा उल्लेख करू नये, उदा. लो.बा.गं.टि.पु. - १ ऑगस्ट. अर्थात, याला अपवादही आहेत, उदा. शिवाजी महाराजांची जयंती.
अभय नातू १४:००, ३० जुलै २०११ (UTC)
- नार्सिकारजी नमस्कार,
दिनविशेष हे फार मोठे काम आहे असे मला वाटते. जर ह्यावर मेहनत घायचीच असेल तर थोडा विचार पूर्वक योजना आखायला हवी जेणे करून हि मेहेनत बहुआयामी स्वरुपात वापरता यावी म्हणून मनात होते.
- कारणे
- दिनविशेष अनेक ठिकाणी वापरता येऊ शकते
- लेखात टाकल्यास सारी मेहनत अटकून पडणार
- दिनविशेष डायन्यामिक असल्याने (म्हणजे काळानरूप बदलत/वाढत असल्याने) त्याचे सवर्धन, संगोपन एकाच ठिकाणाहून करणे सोपे पडेल. लेखां मध्ये जाऊन ते करणे कटकटीचे होईल.
- बनवण्यास पण सोपे पडेल आणि वापरण्यास हि सोपे होईल
- माहितीचा वापर वाढेल/ अनेक ठिकाणी उपयोगात आणता येईल
सध्या माझ्या कडील हाती घेतलेली कामे सरली नसल्याने मी आपणाशी बोललो नाही पण मानत होते. कारण आपले काम थांबून ठेवायचे मला येग्य वाटले नाही. आसो पण आता तुम्ही विषय सुरु केलाच आहेत तर मला काही माहिती त्वरित सांगता येईल का.
- साचा किवा तत्सम कल्पना योग्य वाटते का
- दिनविशेष मध्ये तुम्हाला काय द्यावे असे अपेक्षित आहे (अभय चे निर्देश धरून )
- सर्व साधारण माहिती किती असणार आहे (३६० दिवस/ १२ महिने / ??)
- जर आपणास थांबवले तर आपण किती दिवस वाट पाहू शकाल
- (वेळेच्या नियोजनाच्या दृष्टीने )
- आपण पण साचे बनवता का? साच्या बरोबर आपली जवळीकता !
- ह्या कमी अजून कोणी सोबत आहे का?
- आणि वेळो वेळी त्रास द्यायला आपण उपलब्ध असाल का !!!!
साचा बनवणे लवकर होईल, पण मला संपूर्ण विदा एकाच ठिकाणावरून नियंत्रित करण्याची प्रणाली विकसित करायची होती त्या साठी लागणारे DPL ला मिडियाविकी सपोर्ट करते पण अजून विकिपीडियाने ते स्वीकारले नाही. तरी काहीतरी वेगळी शक्कल लढवावी आणि काही प्रमाणात तरी सामान्य करण करता येते का ते पाहावेसे वाटते. कधीतरी हे करावेच लागे मग ते आताच का नाही. पण हा अट्टहास मुळीच नाही. राहुल देशमुख ०८:०६, ३१ जुलै २०११ (UTC)
स्वागत
संपादननरसीकर, अनेक दिवसांनी आपल्याला येथे पाहून खुप आनंद झाला. आपले योगदान चालू राहील हीच आशा. - अभिजीत साठे (चर्चा) २२:५४, ५ मार्च २०१३ (IST)
- अभिजीत म्हणला तेच!
- अभय नातू (चर्चा) ०५:४१, ६ मार्च २०१३ (IST)
नमस्कार
संपादनआपले पुनश्च स्वागत.
आपला नम्र
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:४७, ११ मार्च २०१३ (IST)
सांगकाम्या
संपादननरसीकर, मी प्रथम एक सांगकाम्या खाते तयार केले. ऑटोविकिब्राउझर डाउनलोड करून हे प्लगिन इन्स्टॉल केले. ह्या प्लगिनद्वारे टेक्स्ट फाइल वापरून नवे लेख तयार करता येतात. ऑटोविकिब्राउझरमधील बॉट टॅब वापरून लेख आपोआप तयार होतात. मात्र काही चूक झाली तर मॅन्यूअली दुरूस्त करावी लागते. - अभिजीत साठे (चर्चा) १०:५६, १७ एप्रिल २०१३ (IST)
वर्गीकरण
संपादनलेख लिहिताना इतरही मजकूर डोक्यात असतो, म्हणून वर्गीकरण करायचे राहून जाते. आणि, वर्गीकरण मीच करायला पाहिजे असे नाही, इतरांनी कुणीही केले तरी ते मला मान्यच असेल. फार तर जेव्हा मी ते पाहीन तेव्हा मला आवश्यकता वाटल्यास त्या लेखाला मी आणखी एका वर्गात टाकीन....J (चर्चा) २३:१२, २१ एप्रिल २०१३ (IST)
- नमस्कार, तुमच्या परस्परांच्या चर्चेत येतो आहे या बद्दल क्षमस्व.आपली चर्चा वाचून एक कल्पना सूचली त्या अनुषंगान ॲटोमॅटीक कॅटेगरी सजेशन सॉफ्टवेर मधून मिळावी असा बग बग क्र.47492 अन्वये नोंदवला.
- बगचे काय होईल माहित नाही, पण वर्गवृक्षातील सर्वात वरची पातळी साधारणत: दहा एक मुख्य वर्ग, नवीन लेख निर्मितीच्या वेळी संपादन गाळणी सूचनेतून सुद्धा सूचवता येऊ शकेल. ह्या विषयात नरसिकरजीसोबतच संकल्प आणि क्षितीज ना सुद्धा रस असावा असे दिसते आपापसात चर्चा करून विकिपीडिया:संपादन गाळणी/विनंत्या इथे नविन संपादन गाळणी नोंदवावयाची वाटल्यास स्वागत आहे.
- दुसरा पर्याय दहा वर्गां मध्ये वर्गीकरण करता येतील असे दहा शब्द निवडून पाच-दहा वेगवेगळ्या गाळण्या कराव्यात आणि गाळणीने सूचवल्या प्रमाणे अर्ध स्वयंचलित सांगकाम्यांनी लेखांचे वर्गीकरण पार पाडावे.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:३८, २२ एप्रिल २०१३ (IST)
Typoच्या चुका
संपादनमाझ्यातल्या मु(नि)द्राराक्षसाच्या चुका दुरूस्त करण्या बद्दल खूप खूप धन्यवाद.
सहकार्य हवे
संपादननमस्कार,
विकिपीडियावरील माहिती तर्कसंगत असावी असा संकेत आहे.त्या दृष्टीने मराठी विकिपीडियावर काही सजगता साचे अद्ययावत करण्यासाठी logical fallacy(तर्कदोष) या संदर्भाने इंटरनेटवर इंग्रजीत बरीच उदाहरणे उपलब्ध आहेत. तसेच मराठी महाविद्यालयीन तर्कशास्त्र अभ्यासक्रमा करिता मराठीतून पुस्तके देखील उपलब्ध आहेत. आपल्या सवडीनूसार तार्कीक उणीवा हा लेख विवीध प्रकारच्या लॉजीकल फॉलसीच्या उदाहरणांनी अद्ययावत करण्यात सहकार्य लाभावे अशी नम्र विनंती आहे.
धन्यवाद
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:१०, २६ जून २०१३ (IST)
- >>इंग्रजीस काही मराठी शब्द दिले आहेत. तसेच कमेंट मधील भाषांतरही तपासुन ते प्रगट करावे<<
- आपण या विषयाकरता सवड काढल्या बद्दल खूप खूप धन्यवाद. आपण केलेला अनुवादीत परिच्छेद, सूचवल्या प्रमाणे प्रगट केला.आणि आपण सूचवलेले मराठी शब्दही सयूक्तीकच आहेत.'स्मोकस्क्रीन' ह्या शब्दास 'धुम्रावरण' हा शासकीय शब्द नवीन पिढीला जड जाइल किंवा कसे त्या पेक्षा धुक्याचा किंवा धुराचा पडदा समजण्यास अधिक सोपे असे वाटते.
- 'कारस्थानी सिद्धांतवादी', कारस्थान एवजी कारस्थानी शब्द वापरण्याने अर्थ अपेक्षे पेक्षा अधिक बदलतो आहे किंवा कसे.'कारस्थान संशयवादी' याच टर्मीन्लॉजीला समजण्यास अजून सोपे काही सुटसुटीत सुचले बरे पडेल.
- इन एनी केस आपला अनुवाद. महाविद्यालयीन तर्कशास्त्रातील पुस्तकापेक्षा समजण्यास निश्चितपणे सोपा आहे असे वाटते त्या बद्दल आपले अभिनंदन आणि धन्यवाद.
- 'क्रिटिकल थिंकींग' या युट्यूब सादरीकरणातील मजकुर विकिपीडिया:धूळपाटी येथे टंकला आहे.
- मनाचा खुलेपणा युट्यूब सादरीकरण मजकुर b:Wikibooks:धूळपाटी येथे टंकला आहे.
- त्यातील मजकुर मराठी विकिपीडिया,विकिबुक्स आणि विकिक्वोट या बंधूप्रकल्पातील संबंधीत पानांवर उपयोगात आणण्याचा मानस आहे.या मजकुरात सुयोग्य सुधारणाकरून हवा आहे.जमल्यास युट्यूब सादरीकरणावरून तपासण्याचेही स्वागत आहे.
- या विषयात आपल्या सध्या मिळत असलेल्या सहकार्या बद्दल अभारी आहे.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:२०, ६ जुलै २०१३ (IST)
आभार
संपादनहिंदीसाठी वापरली जाणारी देवनागरी आणि मराठी लिपी यांत काही मूलभूत फरक आहेत, हे मी अनेकांना सांगायचा प्रयत्न केला, पण कुणी त्यावर विचारच केला नाही. अनेक वर्षे हिंदी मुलखात काढल्यामुळे मला हा फरक लगेच जाणवतो. हाताने हिंदी अक्षर लिहिताना आधी शिरोरेषा काढतात, आणि ती जिथे संपते तिथून खाली अक्षर सुरू करतात. उदा० ’र’ काढायचा असेल तर आधी शिरोरेषा, तिला जोडूनच खालच्या बाजूला सरळ लंबरेषा, हात न उचलता त्या लंब रेषेला आतल्या बाजूने गाठ देऊन बाहेर पडतात आणि शेवटी एक तिरपी रेघ काढून ’र’ संपवतात. हिंदी लिहिण्यासाठी जे विशिष्ट निब किंवा जो ब्रश वापरतात त्यामुळे ’रस्ता रोको’ ही अक्षरे लांबून पाहिल्यास ’ग्ग्ता गेको’ अशी दिसतात. पुणे, खडकी, घोरपडी, कुलाबा किंवा देवळाली या लष्कराच्या अखत्यारीतील भागात हिंडले तर अशी एखादी तरी पाटी दिसेल.
याउलट, मराठी ’र’काढताना आधी ’ग’ची सोंड काढतात, तीच गाठ हात न उचलता तिरपी खाली ओढतात, आणि मग शिरोरेषा काढतात. ही शिरोरेषा अक्षराच्या किंचित आधी सुरू होऊन किंचित पुढे जाऊन थांबते. हिंदी अक्षर संपते तिथे शिरोरेषा आधीच संपलेली असते. म्हणून ती अक्षरे डोळ्यांना सुखावह वाटत नाहीत. थोडक्यात काय तर हिंदी र आतल्या गाठीचा असतो आणि मराठी बाहेरच्या गाठीचा. हिंदी अक्षरे काढताना शक्यतो हात उचलत नाहीत, त्यामुळे हिंदी ’श’ टकलू असतो, आणि’ल’ एका पायाने लंगडा आणि कुबडी घेतलेला. ही अक्षरे मराठीत काढताना हात उचलावाच लागतो. हिंदी’ख’ काढताना आधी शिरोरेषा, मग ’र’, आणि तोच खालच्या बाजूने उचलून ’व’साठी गाठ मारून परत शिरोरेषा गाठतात. असला ’र’ संस्कृत लिखाणासाठी अजिबात चालणार नाही.
हिंदी ’भ’,’ध’, ’छ’, ’थ’ला गाठ नसते, तर असते फक्त शिरोरेषेतली एक गॅप. या गॅपवरून अक्षर ओळखतात. ही हस्तलिखित अक्षरे मराठी अक्षरांपेक्षा वेगळी दिसतात. ’भ’ काढताना आधी शिरोरेषा, हात न उचलता’म’ आणि मग वर जाऊन तुटकी शिरोरेषा काढली की ’भ’ झाला. अशीच उरलेली गाठवाली अक्षरे.
देवनागरी फॉन्ट्स बनवताना फक्त हिंदीचाच विचार केल्यामुळे ’मराठी’ फॉन्ट्स अजून बनलेच नाहीत असे वाटते. महाराष्ट्रातले छापखाने म्हणूनच युनिकोड फॉन्ट्सवर अवलंबून नसतात. गरज पडली की आस्कीवर उतरतात..
मी अभय नातूंसाठी लिहिलेल्या मजकुरात तथ्य वाटले हे वाचून आनंद झाला. आणि तसे कळविल्याबद्दल आभार....J (चर्चा) ११:१३, १३ जुलै २०१३ (IST)
टेम्प्लेट ट्रान्सक्लुजन
संपादनटेम्प्लेट ट्रान्सक्लुजन चा अनुवाद ट्रांसलेट विकिवर
- भाषांतर्भावित साचे असा झाला आहे.तो कदाचित न्यासांतर अथवा आंतरन्यास असावयास हवा असे वाटते. हा विकिपीडिया:चावडी/जुनी_चर्चा_६#transclusion_या शब्दा करिता मराठी पारिभाषिक शब्द हवा आहे. जुन्या चर्चेचा संदर्भ पण मला वाटते न्यासांतर अथवा आंतरन्यास हे शब्द सामान्य वाचकास अजुनही सहज लक्षात येण्या सारखे नाहीत आपल्यास अजून काही शब्द सुचल्यास कळवावे.
धन्यवाद
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:४४, २८ जुलै २०१३ (IST)
- >>मी विकिवर सदस्य बनण्याच्या आधीची ही चर्चा आहे, अर्थात, ती मला लागु नाही असे नाही.फक्त ती माझ्या लक्षात आली नाही किंवा मी ती बघितली नाही.<< नाही यात गिल्टी फिलिंग वाटण्या सारख काहीच नाही आणि न्यासांतर अथवा आंतरन्यास या शब्दांबद्दल मी अजूनही आग्रही नाही कारण त्यातील न्यास हा शब्द सामान्य वाचकास समजण्यास किती सुलभ आहे या बद्दल मी साशंक आहे.
visual-editor ला यथादृश्य-संपादक पेक्षा चक्क जसेदृश्य-संपादक असा शब्द सामान्य वाचकास अधिक सोपा आहे का, या बद्दल मी काल रात्री विचार करत होतो.
- सध्या आपण जे एडीटींग करतो त्या प्रकारात साचांची प्रक्रीया transclusion ने होते किंवा कशी आणि त्याला मराठीत काय म्हणावे याचा सामान्य वाचकाला बोध होतो आहे का याची फारशी काळजी करावी लागली नव्हती. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस येऊ घातलेल्या visuala-editor उर्फ यथादृश्य-संपादक उर्फ 'जसेदृश्यसंपादक', यात विकि-वाक्यविन्यास न समजणाऱ्या सदस्याचे काम बरेच सोपे होणार आहे, पण त्याला साचांची प्रक्रीया सहज लक्षात यावी अशा शब्द योजनेची गरज पडण्याची शक्यता आहे, आणि तो शब्द, प्रक्रीया समजण्यास शक्य तेवढा सुलभ असावा.
- दैनंदीन जीवनातून आलेले शब्द बऱ्याचदा समजण्यास सुलभ असू शकतात.ना'ते' सारखा शब्द पहा किती साधा आणि सुलभपणे तयार झाला आहे , म्हणून असा काही शब्द आपल्याला आणि इतर कुणालाही सुचला तर हवा आहे म्हणून आपणाशी चर्चा पुन्हा केली आहे.जुनी चर्चा लादण्याचा उद्देश नाही नवे अधीक सुलभ काही सुचावे असे वाटते.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:४८, २९ जुलै २०१३ (IST)
---
टॅग
संपादनटॅगसाठी खूणपताका हा अगदी चपखल अर्थाचा शब्द आहे. शब्दकोशांत ’टंगणी’ दिला असतो, त्यापेक्षा ’खूणपताका’ अधिक अनुरूप वाटतो....J (चर्चा) १४:०७, ४ ऑगस्ट २०१३ (IST)
चपखल सुंदर अनुवाद
संपादननमस्कार,
आपल्या सदस्य पानावर "Woods are lovly,dark and deep ,..... चा मराठी अनुवाद वाचण्याचा लाभ झाला.अनुवाद मुळ काव्याचे सौंदर्य आणि भावार्थ चपखलपणे नेमके पणे टिपणारा झाला आहे. अभिनंदन आणि धन्यवाद !
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:५३, ७ ऑगस्ट २०१३ (IST)
टर्मस ऑफ यूजचा अनुवाद
संपादनआपण अनुवास सुरवात केल्या बद्दल स्वागत आहे. या WMFनितींचे कायदेविषयक अर्थ निघत असल्यामुळे त्या खाली इंग्रजी शब्दांना आपण वापरलेल्या मराठी शब्दांची सारणी करून जोडल्यास बरे पडेल असे वाटते.म्हणजे काही प्रयूक्त शब्दांचे अर्थ लक्षात घेणे आवश्यकता पडल्यास बदलणे सोपे जाईल.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:३६, २५ ऑगस्ट २०१३ (IST)
माझ्या पानांवरील टर्मस ऑफ यूजचा अनुवाद
संपादननरसीकर,
माफी कसली? तुम्ही तेथे येउन धुडगूस घातल्यासारखी माफी मागत आहात! यासाठी माफी मागायची दूरान्वयानेही गरज नाही. किंबहुना, अनेक महिने रेंगाळलेले हे काम हाती घेतल्याबद्दल धन्यवाद!
वात्रटिका
संपादन>>वात्रटिकात बराच रस घेताय !<<
- :) मागच्या वेळी प्रणय हा लेख लिहितानाही आपण असाच काही प्रश्न विचारल्याचे आठवते.त्या वेळी प्रणय या विषयाची भारतीय छटा मांडत होतो. या वेळी वात्रटिका लेखात वेगळ्या कारणाने हात घातला. या लेख चर्चा पानावर एका नवागत सदस्य महोदयांनी "मी स्वतःबद्दल लिहिलेली माहिती कुणा दुसऱ्याकडून सुद्धा लिहू शकलो असतो किंवा फेक अकाउंट तयार करून सुद्धा लिहू शकलो असतो." असा डायलॉग मारला, त्यास उदाहरण म्हणून विकिपीडिया जाणत्यांच्या संपादने पकडण्याचे कसब दाखवण्याची आयती संधी वात्रटिका लेखात दाखवता येते म्हणून हात घातला.
- पण हातात वात्रटिकाकारांच्या *त्रटपणाचे(/की उ*लेगिरीचे) कसब पाहवयास मिळाले त्याने चक्क दंग झालो. मराठी विश्वकोशातील लेख पहा आणि या ब्लॉग वरील लेख पहा.
- ........वात्रटिका हा आता संशोधनाचा विषय झाला असून "श्री.अबकड" त्याविषयी संशोधनाचे काम करीत आहेत.....
- ....अलीकडे.... ,"श्री.अबकड" ,........... इ. कवींनी वात्रटिका हा प्रकार विशेषत्वाने हाताळला आहे. त्यातही रामदार फुटाणे आणि "श्री.अबकड" यांचे राजकीय-सामाजिक व्यंग्यपर वात्रटिका –वाचनाचे जाहीर प्रयोग खूपच लोकप्रिय ठरले आहेत.
..........."श्री.अबकड" यांनी .......विक्रमच ठरवा......"श्री.अबकड" यांचा ...........स्तंभ तर संपूर्ण महाराष्ट्रा लोकप्रिय ठरला आहे....."श्री.अबकड" .....चळवळ जोपासण्याचे ऐतिहासिक काम करीत आहे.आज "श्री.अबकड" यांनी ........ला एक नवे परीमाण देण्याचे कौतुकास्पद काम केलेले आहे.
- किती बेमालूम अशी सरमिसळ आहे. मराठी विश्वकोशाचा संदर्भ देताना स्वत:चे नाव लिहिताना टापरे, पंडित. या मराठी विश्वकोशातील मुळ लेखकाचे नामोल्लेख पार गूल केला आहे.वात्रटिका विषयावरच्या विश्वकोशीय लेखाचच वात्रटिकेतल रूपांतरण करण्याची कामगिरी लाजवाब कौतूकास्पद आहे.कॉपीराईट कायद्यांबद्दल आणि प्लॅगरीझम बद्दलच्या सजगतेचा अभाव असा सार्वत्रिक आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:५३, ९ सप्टेंबर २०१३ (IST)
नमस्कार
संपादननरसीकर, आपल्या मागील संदेशाला उत्तर देण्यास विलंब झाला. आपल्या येथे सर्व आलबेल असेल अशी आशा बाळगतो.
विमानतळ कोड बद्दल माझे बदल पहावेत.
त्रूटी दूर केली
संपादनगाळणी सहा मध्ये संबंधीत अपवाद मागेच दिला गेला होता त्या अपवादात जोडाक्षर विषयक त्रुटी राहून गेली होती.ती त्रुटी आता दूर केली आहे. अधिक माहिती प्रचालक नात्याने आपल्या माहिती करीता गाळणी सहाच्या नोंदीत नोंदविली आहे.
आपणास झालेल्या तसदी बद्दल मन:पुर्वक क्षमाप्रार्थी आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:५२, १९ सप्टेंबर २०१३ (IST)
- :) माझ्या मराठीच्या कोणत्याही शिक्षकांना जमले नसेल एवढे मराठी भाषेतील बारकाव्यांचे शिक्षण मला या मशिनी संपादन गाळण्या देत आहेत.गाळण्यांमध्ये बऱ्यापैकी सटीकता येत चालली असली तरी क्वचीत अडचणी अजून येतात. सहा महिन्यात गाळण्यांच्या पहिल्या लॉट मध्ये बऱ्यापैकी परीपूर्णता आलेली असेल अशी आशा आहे.
- मी सध्या येथे आणि येथे अधिक व्यस्त आहे.त्यातून वेळ मिळेल तसे गाळण्यांकडे बघतो आहे.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:२३, २० सप्टेंबर २०१३ (IST)
जीवचौकटीत लागणाऱ्या संज्ञा चर्चेचे सारांशीकरण
संपादननमस्कार, २००९ मध्ये मनोगत संकेतस्थळावर जीवचौकटीत लागणाऱ्या संज्ञाकरीता मराठी शब्द सुचवा चर्चा लावली होती. जीवचौकटी संदर्भात आलेल्या सुचवणींचे सारांश काढण्यास वेळ मिळालेला नाही. आपण वेळ देऊ शकल्यास पहावे. सोबतच येथे सरकारी कोशात सुचवलेल्या संज्ञा चा तुलनात्मक चार्ट बनवून हवा आहे म्हणजे वैज्ञानिक संज्ञा उपयोजनात घोटाळा होणे टळेल असे वाटते.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:२८, २१ सप्टेंबर २०१३ (IST)
प्रसिद्ध लेखात योगदानाची विनंती
संपादननमस्कार,
मराठी विक्शनरीवर लिहिलेल्या wikt:प्रसिद्ध लेखात, आपल्या सवडीनुसार सुधारणा करण्याबाबत साहाय्य विनंती आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:२२, २९ सप्टेंबर २०१३ (IST)
मराठी आकडे
संपादनअरबी आकडे मराठीमध्ये करण्यासाठी ऑटोविकिब्राउझर वापरत आहात की manually करत आहात? - अभिजीत साठे (चर्चा) १५:००, ३० सप्टेंबर २०१३ (IST)
नमस्कार
संपादननमस्कार नरसीकर! हो, काही दिवसांनी इकडे आलो. :)
बाकी काय म्हणता ? सर्व क्षेमकुशल आहे ना ?
--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १३:२२, २ ऑक्टोबर २०१३ (IST)
विकिस्रोतावर मजकुर पडताळणीत साहाय्य हवे
संपादननमस्कार,
'माहितगार वेगवेगळ्या विषयात फिरतात आणि आम्हालाही फिरवतात' असे कदाचित आपणास म्हणावेसे वाटेल .आपण तेवढ्याच उमेदीने साहाय्य करत असता त्या बद्दल आणि विक्शनरीवरील साहाय्या करिता धन्यवाद. प्रस्तावनेच कारण म्हणजे (नित्याप्रमाणे) मी आणखी एक विनंती घेऊन आलो आहे. विकिस्रोत बंधुप्रकल्पात येथे लोकमान्यांचा एक इंग्रजी अग्रलेख मराठीत अनुवादण्यास घेतला आहे .मराठी विकिस्रोतावरील मूळ इंग्रजी उतारा, मुळ लेखाचा पुस्तकाच्या उपलब्ध केलेल्या दुव्यावरील मूळ उताऱ्याबर-हुकूम असल्याची पडताळणी-खात्री करण्यात आपल्या सवडी नुसार साहाय्याचे स्वागत असेल.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:२१, २ ऑक्टोबर २०१३ (IST)
- बापरे, तुम्ही लगोलग मनावर घेऊन हाता वेगळ पण केल. झाले ची खूण पाहुन मला या मुळे हुश्श वाटलं की तुम्हाला विकिसुट्टी द्यावी लागणार नाही :)) . लांब पल्लेदार वाक्ये हे लोकमान्यांच वैशीष्ट्य. त्या काळातले त्यांचे इंग्रजी भाषेचे गुरू कोण होते माहीत नाही पण आज गाठीशी अनेक व्याकरणे आणि डिक्शनऱ्या असून सुद्धा ती सर येत नाही. आणि त्यांच्या परिच्छेदाच्या अनुवादाच काम अल्प काळात हातावेगळ केल या बद्द्ल आपल अभिनंदन.
- धन्यवाद आणि शुभेच्छा.
पंतप्रधान
संपादनधन्यवाद, नरसीकर! ह्या लेखात आणखी काही घालता येईल का? - अभिजीत साठे (चर्चा) १७:३५, २ ऑक्टोबर २०१३ (IST)
धन्यवाद.
संपादनमला मराठी विकिपीडियाविषयी अजून जास्त तांत्रिक माहिती कुठे मिळेल ? तुषार भांबरे (चर्चा) २१:२९, ६ ऑक्टोबर २०१३ (IST)
मला साचे शिकण्यास जास्त आवडेल. त्याविषयी सुलभरीत्या अधिकाधिक माहिती कुठे उपलब्ध आहे ?
सवडीअंती वाचून काढा
संपादननमस्कार,
संवडीअंती जमलेच तर हे वाचून काढा. आणि आवडले तर (कळवा?) एखाद्या पानासाठी वापरता आले तर पाहा. -- संतोष दहिवळ (चर्चा) २१:२८, १५ ऑक्टोबर २०१३ (IST)
सत्यकथा (मासिक)
संपादननमस्कार,
- सत्यकथा (मासिक) मराठी साहित्यातील महत्वाचा टप्पा आहे. अनंत अंतरकर श्री.पु.भागवत राम पटवर्धन आणि इतरही संबंधीत नाव आहेत.मी इतरही सदस्यांना या संदर्भाने मराठी विकिपीडियावर लेखनाची विनंती करणार आहे.आपल्या सवडी प्रमाणे आपण वेळ देऊ शकल्यास स्वागत आहे.
- आपल्या आवडीचे ज्ञानकोशीय वाचन आणि लेखन घडत राहो ही शुभेच्छा.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:२०, ६ नोव्हेंबर २०१३ (IST)
धन्यवाद!
संपादननमस्कार वि. नरसीकर साहेब, आपले दुवे महत्त्वपूर्ण आहेत. तेथे दिल्याबद्दल धन्यवाद. जमेल तसे चाळत राहीन आणि लेखात भर घालत राहीन. (पण लगेच करेनच याची काही खात्री नाही :) कारण विकिवरचा माझा वावर हा संपूर्णपणे स्वांतःसुखाय असा असतो. आवडले, पटले, वाटले तर टाकायचे नाही तर पडू द्यायचे. जेव्हा कधी नंतर वाटेल तेव्हा टाकायचे. शिवाय वेळ हा महत्त्वाचा प्रश्न कायम असतोच.) आपुलकीने संदेश दिल्याबद्दल धन्यवाद. आपल्याला शक्य असेल तर इमेल आणि फोनवर संपर्कात राहायला आवडेल. कळावे लोभ असावा. आपला विनित निनाद ०३:५८, १४ नोव्हेंबर २०१३ (IST)
संदर्भ
संपादनसंदर्भ या विषयावर विश्वकोशीय लेखन भारतीय परिपेक्षातील समस्यांची विश्वकोशीय दखल घेता येऊ शकेल होऊ शकेल असे काही चांगले संदर्भ स्रोत लेख (खाली नमूद केलेले) मिळाल्यामुळे संदर्भ या लेखाची सुरवात केली आहे. लेख वाढवण्यास आपलेही सहकार्य सवडीनुसार मिळावे हि विनंती.
- http://www.rcuk.ac.uk/Documents/india/Indiaessaycomp.pdf
- http://quod.lib.umich.edu/j/jep/3336451.0011.206?rgn=main;view=fulltext
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:११, २० नोव्हेंबर २०१३ (IST)
>>"मार्केटींगकडे झुकलेला"<< मीही पूर्ण वाचला नाही लेखाची सुरवात माहितीपूर्ण दिसली.त्यांच्या लेखात इतर संदर्भ दुवे आले आहेत,सुयोग्य असल्यास कदाचित तेही वापरता येतील.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:२१, २० नोव्हेंबर २०१३ (IST)
मिडियाविकी:Gadgets-definition
संपादनFor a while I will be reversing your changes to मिडियाविकी:Gadgets-definition,for ULS testing purposes .Because Marathi and other typing and display facilities of Universal Language Selector have stopped functioning on Marathi Wikipedia , and I am unable to type in Marathi.
Rgds
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:२४, २८ नोव्हेंबर २०१३ (IST)
नमस्कार,
(@अभय नातू आणि संतोष दहिवळ: आपल्याही माहितीस्तव).
मिडियाविकी:Gadgets-definitionमधील कालचे बदल परतवल्या नंतर Universal Language Selector मराठी टायपींग लगेच चालू झाले.कालच्या बदलांमध्ये काही तांत्रीक उणीवा शील्लक असण्याची शक्यता वाटते. शक्यतो थोडी थोडीकरून गॅजेट जोडावीत म्हणजे तांत्रीक उणीव कुठे येते आहे हे लक्षात येईल.
- ULS team कडून तांत्रिक मार्गदर्शनाची एक विनंती येथे लावली-केवळ आपल्या माहितीस्तव. टप्प्या टप्प्याने गॅजेट बद्दलचे काम आपण चालू ठेऊ शकता.
धन्यवाद माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:३३, २८ नोव्हेंबर २०१३ (IST)
काळजी नसावी
संपादन@V.narsikar: काळजी नसावी. आपण मिडियाविकी:Gadgets-definition मध्ये बदल केल्यामुळे ULS मध्ये problem निर्माण होणे याची शक्यता अत्यंत नगण्य आहे. नगण्य यामुळे की Gadgets-definition मध्ये गॅजेटची नुसती नावेच तुम्ही टाकली होतीत पण ती गॅजेट्स enable केल्यानंतर त्या गॅजेटसाठी आवश्यक असणार्या कोणत्याही resourse loader script मिडियाविकित नव्हत्या. त्यामुळे मिडियाविकी:Gadgets-definition पानातील बदलामुळे काही तांत्रिक अडचण निर्माण होण्याची शक्यताच नाही आणि शक्यता गृहीत धरली तरी अगदी नगण्य प्रमाणात धरावी.
ULS team कडून तांत्रिक मार्गदर्शन घेतानाही ही वस्तुस्थितिदर्शक माहिती तिथे मांडावयास हवी होती.
uls ला अडचण येण्याच्या इतरही अनेक शक्यता असू शकतात.
तांत्रिक अडचणी कुठुनही येऊ शकतात याचे उदाहरण देण्यासाठी मी तीन screenshot capture क़ेले आहेत. मुद्दामच screenshot capture करताना खाली उजव्या कोपर्यात संगणकाची तारीख आणि वेळही screenshot मध्ये घेतलेली आहे.
आता विश्लेषण १) पहीले चित्र घेताना बीटा तोंडवळ्यातील काहीही निवडलेले नव्हते.
२) दुसरे चित्र घेताना बीटा तोंडवळ्यातील Near this page निवडून जतन केले.
३) तिसरे चित्र बीटा तोंडवळ्यातील Near this page निवडल्यानंतरचे.
आता बीटा तोंडवळा निवडल्यामुळे झालेली तांत्रिक त्रूटी लक्षात आली? सांगतो. बीटा निवडले नव्हते तेव्हा संदर्भात संदर्भाशेजारी जो बारीकसा up arrow आहे ज्याच्यावर टिचकवल्यावर आपण लेखातील संदर्भित वाक्यापर्यंत जातो तो पहील्या चित्रात दिसतो आहे. पण बीटा निवडल्यानंतर संदर्भाशेजारचे सगळे up arrow गायब झाल्याचे तिसर्या चित्रात दिसतात.
असो uls ला अडचणीत आणण्याचे असेच काहीसे कारण असू शकते त्यामुळे काळजी नसावी. -- संतोष दहिवळ (चर्चा) २०:४१, ३० नोव्हेंबर २०१३ (IST)
- Hi, after reading your comment, I have brought back मिडियाविकी:Gadgets-definition to same stage as of Mr.Narsikarji's changes.
- Till I was in the same seesion I was able to type Marathi using ULS.
- I logged out, cleared browser cache.closed brower window
- Reopened browser(Firefox).Came to mr wikipedia site
- Checked without log in for ULS, I did not see any ULS icons was unable to type using ULS.
- Went to log in screen at log in screen only ULS icon is available. For not taking a chance there also I enabled Marathi.
- Checked in search windows ULS icon is not available.
- Selected random page for typing marathi ULS icon is not coming so I am unable to type Marathi
- Tried control M to toggle if that enables ULS ;Result :no success.
- Opened google chrome since old cache was still present so could see the icons,But when went to edit window Result - no success ULS not availeble .Unable to type in Marathi.
- What I am experincing certainly does not match with your statement but is exactly opposite "त्यामुळे मिडियाविकी:Gadgets-definition पानातील बदलामुळे काही तांत्रिक अडचण निर्माण होण्याची शक्यताच नाही आणि शक्यता गृहीत धरली तरी अगदी नगण्य प्रमाणात धरावी."
- May be I am still making mistake and rest of the people are able to use ULS then you all can now try it for yourself.
- >> "त्या गॅजेटसाठी आवश्यक असणार्या कोणत्याही resourse loader script मिडियाविकित नव्हत्या." << On the other hand probablly Gadets names are there but resourse loader scripts are absent in मिडियाविकि may be the reason.
- So with help from Mr.Narsikarji and other admins you may try putting in resourse loader scripts, I have no issues.
- My previous actions were immidiate taking in to consideration for priority to Marathi typing tool ULS. Even if I did not inform about "resourse loader scripts" not available in मिडियाविकि MediaWiki software developers must have been experienced enough to check what is going on.
- ( I type usually with Marathi typing tools ULS translteration method aksharantaran to know myself any problems are not there for those users are unable to use inscript). I can type with inscript also.So non availability is not necessarily issue for me. If all Marathi people can type Marathi without ULS support then also I have no issues.
- Thanks and Regards
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:५७, १ डिसेंबर २०१३ (IST)
- Please do see the uploaded picture
- ULS sign is gone missing
- Even behaviour of show and hide templates also is changed for me some places word "Show" दाखवा is not apearing some places templates are showing all the content instead of hiding the same.
- For me ULS is working only at log in screen
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:१८, १ डिसेंबर २०१३ (IST)
- @Mahitgar आणि V.narsikar: सदर चर्चेच्या अनुषंगाने लक्ष ठेवणे वा आढावा घेणे माझ्याच्याने आज शक्य होणार नाही. आपण लक्ष ठेवावे. सकाळी माझ्यासाठी uls शोधा खिडकीत काम करीत होते. -संतोष दहिवळ (चर्चा) १२:३३, १ डिसेंबर २०१३ (IST)
- माझ्या शिवाय किमान एका सदस्य निनाद यांना मराठी लिहिण्यात अडचण आल्याची त्यांची प्रतिक्रीया आहे. आणि हे पुन्हा पुन्हाही सिद्ध करता येईल.नरसिकरजी आणि इतरांची न्याहालकाची cache क्लिअर न केल्या मुळे प्रॉब्लेम लगेच नेहमी सदस्यांना प्रॉब्लेम लगेच जाणवत नसावा.तरी सुद्धा विश्वास न बसल्यास आपण हे पुन्हाही करून पाहण्यास स्वतंत्र आहात.
- केवळ निनाद यांनी म्हटले तसे केवळ धूपाटीवर परीक्षण शक्य नाही.टेस्ट विकिवर किंवा सध्या कमी वापरल्या जाणाऱ्या मराठी विकिबुक्स प्रकल्पाची तात्पुरती प्रचालक पद मेटा वरून घेऊन संतोषजी प्रयोग करून पाहू शकतात.आधी म्हणल्या प्रमाणे मराठी विकिपीडियावरही प्रयोग चालू ठेवायचा असल्यास माझी हरकत नाही.
अर्र्=
संपादननको त्या वेळी एडिटर चालत नसल्याबद्दल नोंद केली असे आता मला वाटते आहे. मात्र ही तक्रार नव्हती फक्त नोंद होती. असे केल्याबद्दल मी आपला दिलगीर आहे. परंतु मला कल्पना नव्हती की तुम्ही काय करत आहात. कृपया आपले कार्य जरूर पुढे न्यावे या साठी मी आपल्याला आवश्यक ती मदत करण्यास तयार आहे. आशा आहे नव-नवीन साधनांच्या सहाय्याने आपल्याला विकिचे काम जलद रितीने करण्यास मदतच मिळेल. तेव्हा प्रयोग चालू राहू देत इतकेच सांगायचे आहे. तसे नसल्यास आपण कोणती गॅझेटस आणत आहात आणि ती आणण्याची पद्धती कदशी आहे हे कळवावे. मी पण ती जोडण्याचा प्रयत्न करेन. कलोअ निनाद ०३:२६, २ डिसेंबर २०१३ (IST)
शिक्षा?
संपादनआपण सर्वांनी मला दिलेली कोणतीही शिक्षा मला मान्य आहे.
हे वाचून धक्का बसला! प्रगतीचे प्रयोग करण्यासाठी विकिवर शिक्षा कधी पासून अस्तित्त्वात आली? माझा तरी अशा कोणत्याही शिक्षेला विरोध आहे. तुम्ही करा हो प्रयोग. चांगल्यासाठीच करता आहात यावर माझा विश्वास आहे. त्यात या प्रयोगात काही भयंकर घडलेले नाही. मी एकच तर होतो ज्याने एडिटर चालत नाही अशी नोंद केली! इथे संतोष शिवाय कुणी गॅझेटस् आणत नाही. तुम्ही आणायचा प्रयत्न करत आहात तर त्यात हा घोळ झाला! माझ्या मते प्रयत्न सुरू ठेवावेत आणि तृटी/चुकातून पुढे मार्ग काढावा. संतोष ला दिला आहे तसाच मी तुम्हाला गॅझेटस् आणण्यासाठी जाहीर पाठिंबा देत आहे. निनाद ०७:००, २ डिसेंबर २०१३ (IST)
- तुम्ही करा हो प्रयोग. चांगल्यासाठीच करता आहात यावर माझा विश्वास आहे. त्यात या प्रयोगात काही भयंकर घडलेले नाही. मी एकच तर होतो ज्याने एडिटर चालत नाही अशी नोंद केली! इथे संतोष शिवाय कुणी गॅझेटस् आणत नाही. तुम्ही आणायचा प्रयत्न करत आहात तर त्यात हा घोळ झाला! माझ्या मते प्रयत्न सुरू ठेवावेत आणि तृटी/चुकातून पुढे मार्ग काढावा. संतोष ला दिला आहे तसाच मी तुम्हाला गॅझेटस् आणण्यासाठी जाहीर पाठिंबा देत आहे.
- +१
- अभय नातू (चर्चा) ०९:३१, २ डिसेंबर २०१३ (IST)
- नमस्कार,
- मी निनादजींशी पूर्ण सहमत आहे. मीही तांत्रिक सुधारणा करण्याच नेहमीच समर्थन करतो.तंत्रज्ञानात सुधारणा करण्यात भारत मागे पडला तेव्हा परकीयांचा अंकीत झाला.त्यामुळे उलटपक्षी जेवढे करावयास हवे त्यापेक्षा आपण कमी करतो असे माझे व्यक्तीगत मत आहे. काही वेळा अडचणीही सहन कराव्या लागतात आणि त्या करावयास हव्यात असेच माझेही मत आहे.आणि आपण जो काही पुढाकार घेतला त्याचेही स्वागतच आहे.गॅजेट्स चालू करताना "जावा" किंवा इतर तांत्रिक भाषा आल्याच पाहीजेत असाही अट्टाहास नाही.
- कुठे काही मतांतरे आली तर ती निव्वळ तांत्रीक विषयांसंबधीत पद्धती बाबत आहेत,आणि एकुण मराठी विकिपीडियाच्या प्रगतीच्या दृष्टीने गौण आहेत.त्यास व्यक्तीगत रित्या घेऊ नये अशी नम्र विनंती आहे.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:४९, २ डिसेंबर २०१३ (IST)
नमस्कार, अहो इतके काय मनाला लाऊन घेता? चालायचेच! तुम्ही काही चूक केलेली नाही. लोकांनी काय वाटेल ते गोंधळ घातलेत हो! ते ही सुधरवले आहेत. तुम्ही तर काही चांगले करू पाहता आहात. अक्खा मराठी विकेपिडिया ढासळला तरी उलटवता येतो हे मला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही बिंधास्त प्रयोग करा! :) तुम्ही प्रचालक पदावर राहा तुमच्यासारखी व्यक्ती हे काम करण्यास पूर्ण योग्य आहे हे मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो. तुम्ही इथे प्लिज रहाच! तुमचे काम झकास चालले आहे. अजिबात काळजी नको. आणि आम्ही काही नोंदी केल्या तर 'असे का होते आहे आणि काय केले म्हणजे होणार नाही' इतकीच त्याची नोंद घ्या. या नोंदी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे प्रकल्प बरोबर चालला आहे की नाही याची कल्पना येत राहते. नोंद करण्याचा उद्देश काय घडते आहे याची माहिते देणे इतकाच होता... तेव्हा मस्त नव्या जोमाने कामाला लागा. तुमची येथे फार गरज आहे! तुमच्याकडून नवीन गॅझेटस ची आतूरतेने वाट पाहत आहे! कळावे लोभ असावा आपला निनाद
केडगाव
संपादनदौंड तालुका या लेखात, एक नकाशा सोडला तर दौंड तालुक्याविषयी कोणतीही माहिती नव्हती. जी माहिती होती ती केडगावची. अशा परिस्थितीत लेखाचे नाव दौंड तालुका असे ठेवण्याचे काहीच प्रयोजन नव्हते.(एक शक्य होते, लेखातली नकाशा सोडून सर्व माहिती पुसून टाकायची आणि केडगाव(दौंड)चे नवीन पान उघडून त्यात टाकायची. मात्र त्यावेळी हे मला सुचले नव्हते. पण मुळात दौंड तालुक्यासाठी उघडलेल्या पानावर तालुक्याची माहिती का नव्हती, हा प्रश्न उरतोच!)...J (चर्चा) १२:२६, ८ डिसेंबर २०१३ (IST)
विकिस्पेशीज
संपादनमला वाटते विकिस्पेशीज बरोबर उच्चार आहे. आज रात्रीपर्यंत खातरजमा करून बदल करतो. गैरसमजास कारणच नाही!
Gadget-UTCLiveClock.js
संपादननमस्कार
आपण तयार केलेले मिडियाविकि:Gadget-UTCLiveClock.js पान ऱ्हस्व दीर्घ च्या फरकामुळे मुख्य नामविश्वात तयार झाल्याने काम करत नव्हते.पान .js मुख्य नामविश्वात असल्याने तांत्रिकद्र्ष्ट्या मिडियाविकी नामविश्वात स्थानांतरीत करणे शक्य झाले नाही.
संबंधीत पानांचे इंग्रजी फ्रेंच आणि तमीळ विकिपीडियावरील स्रोत तपासल्या नंतर काही (फिचर्समध्ये) फरकही असावेत किंवा कसे अशी शंका आली आणि मिडियाविकी:Gadget-UTCLiveClock.js येथे नेमके काय कॉपीपेस्टकरून हवे ते कल्पना नसल्याने मिडियाविकी चर्चा:Gadget-UTCLiveClock.js येथे चर्चा लावली आहे.चर्चेत आपणास अभिप्रेत संकेतनाची माहिती उपलब्ध केल्यास ते कॉपी पेस्ट करता येईल.
धन्यवाद.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:५४, ९ डिसेंबर २०१३ (IST)