सईबाई भोसले

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी व छत्रपती संभाजी महाराज यांच्या मातोश्री


सईबाई भोसले (२९ ऑक्टोबर १६३३ – ५ सप्टेंबर १६५९) या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या आई होत्या.

महाराणी सईबाई भोसले
महाराणी
महाराणी सईबाई यांचे अस्सल चित्र
मराठा साम्राज्य
राजधानी राजगड
पूर्ण नाव सईबाई शिवाजीराजे भोसले
पदव्या महाराणी
जन्म २९ ऑक्टोबर १६३३
फलटण, महाराष्ट्र
मृत्यू ५ सप्टेंबर १६५९ (२६ वर्ष)
राजगड, महाराष्ट्र
पूर्वाधिकारी पद निर्माण
उत्तराधिकारी महाराणी सोयराबाई
वडील मुधोजीराव निंबाळकर
आई रेऊबाई निंबाळकर
पती छत्रपती शिवाजी महाराज
संतती सखूबाई निंबाळकर ,
राणुबाई जाधव ,
अंबिकाबाई महाडिक ,
छत्रपती संभाजी महाराज
राजघराणे भोसले
चलन होन

सईबाई या फलटणच्या निंबाळकर घराण्यातील मुधोजीराव नाईक निंबाळकर यांच्या पुत्री होत. निंबाळकर तंजावरच्या पवार कुळातील घराणे आहे. सईबाई यांना तलवार बाजीची आवड होती.[ संदर्भ हवा ] सईबाई यांचा विवाह शिवाजीमहाराजांशी लालमहाल येथे १६ मे १६४० रोजी झाला. त्यावेळी शिवाजी महाराजांचे वय ११ वर्षे तर सईबाईंचे वय ७ वर्षे होते. त्या शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी होत्या. त्यांनी वयाच्या २४व्या वर्षी १४ मे १६५७ रोजी संभाजी महाराजांना जन्म दिला. त्यानंतर सईबाईंची तब्येत बाळांतव्याधी मुळे खालावली. संभाजी महाराज दोन वर्षांचे असताना ५ सप्टेंबर १६५९ रोजी महाराणी सईबाईंचा मृत्यू झाला.[ संदर्भ हवा ]