संगीत नाटक
(संगीतनाटक या पानावरून पुनर्निर्देशित)
संगीत नाटक हा नाट्यप्रकार संगीत ह्या कलाप्रकाराच्या आणि नाटक ह्या साहित्यप्रकाराच्या संकरातून निर्माण झाला आहे. संगीत नाटक हा नाट्यप्रकार मराठी रंगभूमीचे खास वैशिष्ट्य आहे.
आकृतीबंध
संपादन- नांदी - संगीत नाटकाची सुरुवात नांदी ह्या गीतप्रकाराने होते. नांदीमध्ये ईशस्तवन आणि/किंवा नटेश्वर अर्थात नाट्यदेवतीची स्तुती केली जाते. उदाहरणार्थ संगीत शाकुंतल ह्या अण्णासाहेब किर्लोस्करलिखित नाटकाची सुरुवात पंचतुंड नररुंडमालधर ह्या नांदीने होते.
- सूचकगीत - नांदीनंतर सूचकगीत प्रस्तुत केले जाते. सूचकगीतामध्ये नाटकाची रूपरेषा सांगितली जाते.
- कथानक - संगीत नाटकातील हा गद्यप्रकार.
- पद - नाटकातील पद्य अगर काव्य प्रकार आणि संगीत नाटकांचे व्यवच्छेदक लक्षण. ह्यातूनच मराठी नाट्यसंगीत ह्या गानप्रकाराचा जन्म झाला. संगीत नाटक लिहिणारे नाटककार काव्य आणि नाट्याखेरीज संगीतकलेत देखील प्रवीण होते. शास्त्रीय संगीताची योग्य बैठक असल्याने कुठले पद कुठल्या छंदात आहे आणि ते कुठल्या रागामध्ये व तालामध्ये गायले जावे, ह्या संबंधीच्या सूचना पदाच्या सुरुवातीला आढळतात. उदाहरणार्थ संगीत भावबंधन ह्या गडकरीलिखित संगीत नाटकातील लतिकेच्या तोंडचे पद पुढीलप्रमाणे लिहिले गेले आहे.
(राग-यमनकल्याण; ताल-दादरा) कठिण कठिण कठिण किती पुरुषहृदय बाई । स्त्री-जातीप्रति झटता अंत कळत नाही ॥ध्रु॥
हिंदी अनुवाद
संपादनवेदकुमार वेदालंकार यांनी ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत शारदा’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ या तीन नाटकांच्या संहितांचा अनुवाद आणि त्यातील १८० पद्यांचा पद्यानुवाद केला आहे. त्यांच्या ‘तीन संगीत नाटकं’ या अनुवादित पुस्तकास महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.
संगीत नाटककार
संपादनसंगीत नाटके
संपादनसंगीतकार
संपादन- भास्करबुवा बखले
- रामकृष्णबुवा वझे
- मास्टर कृष्णराव
- पं. जितेंद्र अभिषेकी
- वसंतराव देशपांडे
- आनंद ओक
- जगदेव वैरागकर
संगीत नट व नटी
संपादन- बालगंधर्व
- केशवराव भोसले
- मास्टर दीनानाथ
- गणपतराव बोडस
- मास्टर कृष्णराव
- वसंतराव देशपांडे
- जयमाला शिलेदार
- कीर्ती शिलेदार
- अजित कडकडे
- फैय्याज
- चारुदत्त आफळे
- अस्मिता चिंचाळकर
- चिन्मय जोगळेकर
- मानसी जोशी
- शुभांगी सदावर्ते
संदर्भ
संपादन- मराठी नाट्यसंगीत: स्वरूप आणि समीक्षा ह्या पुस्तकाची ओळख Archived 2015-09-16 at the Wayback Machine.
- मायबोली ह्या संकेतस्थळावरील लेख
- मराठी पुस्तके-संकेतस्थळ Archived 2011-08-17 at the Wayback Machine.