भारतीय संस्कृतीतील संख्या संकेत

(संख्यावाची विशिष्ट गूढ़ार्थक शब्द या पानावरून पुनर्निर्देशित)

भारतीय संस्कृतीत काही नावांचे समूह हे त्यांच्या संख्येने ओळखतात.

एक : ईश्वर, सूर्य, पृथ्वी, गणपतीचा दात, ब्रह्म

दोन आद्य शाहीर- लव आणि कुश

दोन अयने- उत्तरायण, दक्षिणायन

दोन उपासना पद्धती - सगुण, निर्गुण

दोन गोलार्ध- उत्तर, दक्षिण; तसेच पूर्व, पश्चिम

दोन चैतन्ये- जीवचैतन्य आणि ब्रह्मचैतन्य

दोन जगे- ऐहिक आणि पारमार्थिक

दोन मार्ग- प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग

दोन पक्ष- शुक्लपक्ष, कृष्णपक्ष

दोन प्रकारचे विनोद- शब्दनिष्ठ आणि प्रसंगनिष्ठ

दोन प्रयत्‍न(व्याकरणशास्त्र)- आभ्यंतर, बाह्य

दोन भारतीय महाकवी- व्यास आणि वाल्मीकी

तीन अंगे (प्राणायामाची)- पूरक, कुंभक, रेचक

तीन अवस्था (देहाच्या)- बाल्य, तारुण्य, वार्धक्य; तीन अवस्था (धार्मिक)- जागृती, स्वप्न, सुषुप्ती

तीन ऋतू - उन्हाळा, पावसाळा, हिवाळा

तीन काळ - सकाळ, दुपार, संध्याकाळ; भूतकाळ वर्तमानकाळ, भविष्यकाळ

तीन गण- देवगण, मनुष्यगण, राक्षसगण

तीन देव- ब्रह्मा, विष्णू, महेश (यांना त्रिमूर्ती किंवा त्रिदेव सुद्धा म्हणतात.)

तीन लोक - स्वर्ग, मृत्यू, पाताळ

तीन गुण - सत्त्वगुण, रजोगुण, तमोगुण

तीन गुण(काव्याचे)- उपमा, अर्थगौरव, पदलालित्य

तीन गुण वाङ्मयातले- माधुर्य, ओज, प्रसाद

तीन गोष्टी, परत न येणाऱ्या- सुटलेला बाण, बोललेला शब्द, गेलेली अब्रू

तीन दुःख - दैहिक दुःख, दैवी दुःख, भौतिक दुःख

त्रिफळा - बेहडा, हिरडा आणि आवळकाठी (यांचे एकत्रित चूर्ण)


चार वेद- ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद

चार वर्ण- ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र

चार आश्रम- ब्रह्नचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास

चार धाम - रामेश्वर, बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी

चार कुंभमेळा स्थाने - उज्जैन, नाशिक, हरिद्वार, प्रयाग

चार पुरुषार्थ- धर्म, अर्थ, काम, मोक्ष

चार उपाय - साम, दाम, दंड, भेद

पंचगव्य - (गाईचे) दूध, दही, तूप, शेण, मूत्र यांचे मिश्रण

पंच तत्त्व- पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश

पंच देव- शिव, गणेश, विष्णू, सूर्य, दुर्गा

पंच ज्ञानेंद्रिये- नाक, कान(कर्ण), डोळा, जीभ(रसना), त्वचा

पंचामृत- दूध, दही, तूप, साखर, मध

पंच कन्या- अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी

पंच प्राण- प्राण, अपान, समान, व्यान, उदान

पंच पुष्पबाण- कमल, अशोक, आम्र, नवमल्लिका, नीलोत्पल

पंच नद- झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास

पंच रत्न- सोने, हिरा, नीलम, माणिक, मोती

पंच पीर- जाहर, नरसिंह, भज्जू ग्वारपहरिया, घोड़ा बालाभंजी, रुहरदलेले

पंच "ग"कार(वैष्णवांचे)- गंगा, गीता, गाय, गोविंद, गायत्री

पंच "म"कार(शाक्तांचे)- मद्य, मांस, मत्स्य, मुद्रा, मैथुन

सहा ऋतू- वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर

षड्रिपु- काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर

सहा रस- कडू, तिखट, आंबट, गोड, खारट, तुरट

सहा अकाल- अतिवृष्टी, अनावृष्टी, उंदरांचे वाढलेले प्रमाण, परकीय आक्रमण, टोळधाड, पक्ष्यांचे वाढलेले प्रमाण

सहा शास्त्रे- मीमांसा, न्याय, वैशेषिक, योग, सांख्य, वेदान्त

सहा हास्ये- स्मित, हसित, विहसित, अवहसित, अपहसित, अतिहसित

सात पर्वत - महेंद्र, मलय, सह्याद्री, शुक्तिमान, ऋक्षमान, विंध्य, पारियात्र...(महेन्द्रो मलयः सह्यः शुक्तिमानृक्षपर्वत:। विन्ध्यश्च पारियात्रश्च सप्तैते कुलपर्वता:।। विष्णूपुराण २.३.३)

सात चिरंजीव - बली राजा, व्यास ऋषी, हनुमान, बिभीषण, अश्वत्थामा, कृपाचार्य, परशुराम

सात ऋषी( सप्तर्षी) : सध्या सुरू असलेल्या वैवस्वत मन्वंतरात हे ऋषी आहेत : अत्रि, कश्यप, गौतम, जमदग्नी, भारद्वाज, वसिष्ठ, विश्वामित्र.

अष्टविनायक

नवग्रह: सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, बृहस्पती (गुरू), शुक्र, शनी, राहू, केतू

दहा दिशा- उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, वायव्य, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, अधर, उर्ध्व

बारा ज्योतिर्लिंग

बारा राशी