शेंदरी बोंडअळी
शेंदरी बोंडअळी तथा गुलाबी बोंड अळी ही प्रामुख्याने कापूस या पीकावर आढळणारी एक कीड आहे.
प्रादुर्भाव होण्याची कारणे
संपादन- ही कीड मुख्यत्वेकरून कपाशीवर आढळून येते.देशी प्रतिच्या कापसाच्या तुलनेत, विदेशी/अमेरिकन अथवा बी.टी./संकरीत बियाणे वापरल्या जाणाऱ्या शेतात याचा जास्त प्रादुर्भाव होतो.
- कापसासोबतच भेंडी,अंबाडी, जास्वंद, ताग आदी नगदी पीके शेतात असल्यावर या अळ्यांना पर्यायी खाद्य उपलब्ध होते.त्यामुळे यांची वाढ होते.
- एखाद्या क्षेत्रातील विविध शेतात वापरण्यात आलेल्या संकरीत वाणांचा, फुले येणे व फळधारणेचा कालावधी वेगवेगळा असल्याने, या कीडींना इकडे अथवा तिकडे, सतत खाद्य उपलब्ध होते व त्यांचा जीवनक्रमास पोषक वातावरण निर्मिती होते.तसेच जास्त उत्पादन घेण्यापोटी, औषधयोजना करून, कापसाच्या हंगामाचा कालावधी वाढविल्यामुळे या कीडींना फावते.
अळ्यांचा जीवनक्रम
संपादनया अळ्यांची अंडी चपटी व सुमारे १ मिमी लांब असतात. ती मोत्यासारखी चकाकणारी पांढऱ्या रंगाची असतात.या कीडीची मादी झाडाची फुले,बोंड, देठ व कोवळ्या पानाच्या खालचे बाजूस आपली अंडी देते.ती पक्व झाल्यावर, या अंड्यांतून, पांढऱ्या रंगाची अळी उत्पन्न होते.या अळीचे डोके तपकिरी रंगाचे असते.या अळीचा काल सुमारे ७ ते २१ दिवस इतका असतो. या पूर्ण वाढ झालेल्या अळीची लांबी सुमारे १० ते १४ मिमी. इतकी राहते.या अळीच्या शरीरावर वलये असतात. त्या वलयांवर एक गुलाबी रंगाचा पट्टा असतो जो, अळीच्या वाढीनुसार तिचे पूर्ण शरीरावर पसरतो.नंतर ही अळी कोषावस्थेत जाते.
पतंग
संपादनकोषावस्थेत आलेली अळी ही लालसर तपकिरी अथवा क्वचित शेंदरी रंगाची दिसते.ती सुमारे ८ ते १० मिमी लांबीची असते.नंतर कोष तयार करून ती कोषावस्थेत जाते.ही कोषावस्था एक आठवडा ते ३ आठवडा इतकी राहू शकते. मग त्यातुन पतंग बाहेर येतात.यांची पतंगावस्था ही एक आठवडा ते एक महिना इतकी राहू शकते.
नुकसान
संपादनवर नमूद केल्याप्रमाणे, अंड्यातून निघालेली अळी ही खाद्य प्राप्त करण्यासाठी कापसाचे बोंडात शिरते.नंतर ती आपल्या विष्ठेने व बोंड कुरतडून प्राप्त झालेल्या बारीक कणांचे आधाराने आत शिरण्याचे छिद्र बंद करते.असे छिद्र साधारणपणे नजर टाकल्यावर दिसून येत नाही.म्हणून या कीडीचा प्रादुर्भाव झाला हे सहजपणे समजून येते नाही.अशी कापसाची बोंडे परिपक्व न होताच गळून पडतात व फुटतात.तसेच ही कीड/अळी बोंडाचे आत असलेल्या सरकीचेही नुकसान करते. किडलेल्या सरकीमुळे भविष्यात त्याची उगवणशक्ति कमी होते.याचे प्रादुर्भावाने कापसाच्या धाग्याची लांबी व मजबूती कमी होते.
शोध
संपादन- या कीडीचा शोध घेण्याचा सोपा प्रकार म्हणजे फेरोमेन सापळा लावणे.अशा सापळ्याचे निरिक्षण केले असता, त्यात सतत २-३ दिवस लागोपाठ ८-१० अथवा जास्त नर पतंग आढळून आल्यास, या अळीचा प्रादुर्भाव झाला असे समजावे.
- एकूण पेरलेल्या पीकापैकी सुमारे १०% प्रादुर्भाव झालेली कापसाची गळलेली फुले व बोंडे आढळून येणे.
कीडीचे व्यवस्थापन
संपादनयजमान पीके
संपादनया अळीची यजमान पीके ही भेंडी व अंबाडी, जास्वंद, ताग ही आहेत.ती कापसासोबत घेऊ नये.यामुळे या कीडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
सापळा पीके
संपादन- अळ्या खाणाऱ्या पक्षांना शेतात आकर्षित करण्यासाठी भगर हे सापळा पीक लावावे.त्याद्वारे नैसर्गिक रितीने यावर काही प्रमाणात मात करता येते.भगरीच्या बियांचे प्रमाण हेक्टरी २५० ग्राम इतके असावे.
- मका, चवळी, झेंडू व एरंडी, मूग, उडीद ही मिश्रपिके कापसाच्या सोबत घ्यावीत जेणेकरून कीड त्याकडे आकर्षित होईल व कापसाचे होणारे नुकसान टळू शकेल.
इतर नियोजन
संपादन- शेतात पीके घेण्यापूर्वी स्वच्छता मोहिम राबवावी.तसेच मार्च-एप्रिल महिन्यात जमिनीची खोल नांगरणी केल्याने उन्हाळ्यातील उन्हामुळे यांची अंडी व असल्यास या कीडी नष्ट होतात.
- जास्त नत्रयुक्त खाताचा वापर टाळावा.माती परीक्षणाचे आधारावर खतयोजना करावी.
- शेतात पक्षीथांबे उभारावेत.त्यायोगे पक्षी येऊन या अळ्या खातील.
- प्रादुभाव झालेली बोंडे/कळ्या नष्ट कराव्यात.
- फेरोमेन सापळे लावावेत. त्यात अडकलेले पतंग नष्ट करावेत.
किटकनाशक फवारणी
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
बाह्य दुवे
संपादन- महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाचे संकेतस्थळावरील कापसाविषयी सर्व माहिती देणारे पान
- महाराष्ट्र शासनातर्फे प्रसिद्ध होणारे शेतकरी मासिक-विविध पीडीएफ आवृत्त्या Archived 2017-11-28 at the Wayback Machine.
- महाराष्ट्र शासनाची शेतकरी मित्र पुस्तिका- पीडीएफ आवृत्ती
- विकासपीडिया हे संकेतस्थळ
- कपाशीवरील कीडींच्या व्यवस्थापनाबद्दल एक संकेतस्थळ-कॉटनबग्ज (इंग्रजी मजकूर)