कामगंध सापळा
कामगंध सापळा हा पिकांवरील कीड नियंत्रणासाठी प्रभावी उपाय आहे. यास इंग्रजीत 'फेरोमोन ट्रॅप किंवा 'फनेल ट्रॅप' असेही म्हणतात.हा कमी खर्चाचा व रासायनिक प्रदुषणविरहीत उपाय आहे.
वर्णन
संपादनहा नरसाळ्याच्या आकाराचा असून प्लॅस्टिकचा बनविलेला असतो.त्याची खालची बाजू मोकळी असून त्यास एक प्लॅस्टिकची पिशवी लावण्यात येते.वरची बाजू एका झाकणाने झाकली असते.त्यास आतील बाजूस 'आमिष' लावण्याची सोय असते.त्यास मादीचा वास असणारे एक रसायन लावण्यात येते.
कार्य
संपादननर कीटक हा मादीच्या मिलनासाठी त्या वासाने या सापळ्याकडे आकर्षित होतो,फनेलमध्ये येतो ,घसरून खाली पिशवित पडतो व काही दिवसांनी मरतो.त्यांचे मिलन होत नाही,अंडी देण्याची प्रक्रिया थांबते. याद्वारे किडींच्या उत्पादनाचे नियंत्रण होते.
घ्यावयाची काळजी
संपादन- वाऱ्याने पडण्याजोगा नसावा.
- आमिष लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावे,हातास कोणताही उग्र वास असू नये.
- पाऊस आल्यास त्यातील पाणी काढून टाकावे.
- पाळीव जनावरांपासून याचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.
हा सापळा,ज्या किडीचे पतंग असतात, त्यासाठी परिणामकारक आहे.वेगवेगण्या किडींसाठी वेगवेगळे आमिष(ल्युर) वापरण्यात येते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |