शाहिस्तेखान

(शाइस्तेखान या पानावरून पुनर्निर्देशित)

शाइस्ताखान, शाहिस्तेखान, शाइस्तेखान तथा मिर्झा अबू तालिब हा तुर्कस्तानचा नवाब होता. तो मुघल सम्राट औरंगजेबाचा मामा होता. याचे पदव्यांसकट पूर्ण नाव मिर्झा अमीर उल् उमरा हैबतजंग नबाब शाहिस्तेखान अबू तालिब असे होते.


शाइस्तेखान दख्खनचा सुभेदार असताना छत्रपति शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर स्वारी करून पुण्यात आला होता. त्यापू्र्वी त्याच्या बलाढ्य फौजेने ५६ दिवस लढून चाकणचा किल्ला घेतला होता. पुण्यात आल्यावर शाहिस्तेखान जनतेवर अन्याय करून अत्याचार व लुटालूट करत होता. शिवाजी महाराजांनी धाडसाने इस १६६३मध्ये मध्यरात्री लाल किल्ल्यात घुसून त्याच्यावर हल्ला केला. तो हल्ल्यातून बचावला, पण भीतीने गाळण उडालेल्या शाहिस्तेखानाची तीन बोटे छाटली गेली आणि पूर्ण मोगल राजवटीची अब्रू गेली. पुढे हाच शाइस्तेखान मरेपर्यंत बंगालचा सुभेदार होता. त्याचे थडगे बांगलादेशमधील ढाका शहरात आहे. शिवरायांची कीर्ती आणि पराक्रम आग्ऱ्यापासून ते तंजावर-जिंजीपर्यंत आणि गुजरातपासून ते बंगालपर्यंत होती, याचा बंगालचा सुभेदार शाहिस्तेखान हा भक्कम पुरावा आहे.


शाहिस्तेखानावरील पुस्तके

संपादन