शंकर नगरकट्टे उर्फ शंकर नाग (९ नोव्हेंबर, १९५४ - ३० सप्टेंबर, १९९०) हे एक भारतीय अभिनेता, पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता होते. ते विशेषतः कन्नड भाषेतील चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील त्यांच्या कामासाठी ओळखले जातात.[१][२] कादंबरीकार आर.के. नारायण यांच्या लघुकथांवर आधारित मालगुडी डेज या टेलिसिरियलमध्ये त्यांनी दिग्दर्शन आणि अभिनय केला.

शंकर नाग
चित्र:Shankar-Nag-pic.jpg
शंकर नाग
जन्म शंकर सदानंद नगरकट्टे
९ नोव्हेंबर १९५४ (1954-11-09)
होनावर, मुंबई राज्य (आताचे कर्नाटक)
मृत्यू ३० सप्टेंबर, १९९० (वय ३५)
दावणगेरे जिल्हा कर्नाटक
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट निर्माता, अभिनेता, दूरचित्रवाणी कलाकार
कारकीर्दीचा काळ १९७७ - १९९०
भाषा कन्नड, कोंकणी
प्रमुख चित्रपट २२ जून १८९७
प्रमुख टीव्ही कार्यक्रम मालगुडी डेज
वडील सदानंद नगरकट्टे
आई आनंदी नगरकट्टे
पत्नी
अरुंधती नाग
(ल. १९८०; वि. १९९०)
धर्म हिंदू

नाग यांना पहिलाच (इफ्फी) सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार (वर्ग-पुरुष), भारतातील 7 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सिल्व्हर पीकॉक अवॉर्ड त्यांच्या 'ओंडानोंडू कलादल्ली' या चित्रपटातील त्यांच्या कामासाठी मिळाला..[३] २२ जून १८९७ या आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता मराठी चित्रपटाचे ते सहलेखक होते. भारतीय अभिनेता अनंत नाग हे त्यांचे वडील बंधू आहेत.[४][५]

अभिनयाची कारकीर्द संपादन

शंकर नगरकट्टे यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९५४ रोजी तत्कालीन मुंबई राज्यातील (आता कर्नाटकात) उत्तर कॅनरा मधील होनावर येथे झाला.[६] त्यांच्या आई आणि वडिलांचे नाव आनंदी आणि सदानंद नगरकट्टे असे आहे. नगरकट्टे हे कोकणी भाषिक ब्राह्मण कुटुंब असून त्यावेळेस कर्नाटक राज्यातील उत्तरा कन्नडमधील भटकळ जवळील शिराली या गावात स्थायिक झाले.[७] नाग यांना एक मोठी बहीण, 'श्यामला' आणि एक मोठा भाऊ,अभिनेता अनंत नाग हे होते. औपचारिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर नाग मुंबईला स्थलांतरित झाले. तिथेच ते मराठी रंगभूमीकडे आकर्षित झाले आणि नाट्यकृतींमध्ये रमले. योगायोगाने, त्यांची आणि अरुंधती नाग यांची भेट नाटकाच्या तालमी दरम्यान झाली. इस १९८० मध्ये हे दोघे विवाहबद्ध झाले.

त्यानंतर नाग यांनी कर्नाटकात तळ हलवला. त्यांचा मोठा भाऊ अनंत नाग यांनी आधीच एक अभिनेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती आणि नागला चित्रपटात काम करण्याचा आग्रह केला होता. १९७८ मध्ये नागने गिरीश कर्नाड यांच्या 'ओंदानोंदू कलादल्ली' या कन्नड चित्रपटातुन भाडोत्री सैनिकाच्या भूमिकेत पदार्पण केले.

संदर्भ संपादन

  1. ^ "A cyber memorial for Shankar Nag". The Times of India. Archived from the original on 9 November 2013. 9 November 2013 रोजी पाहिले.
  2. ^ "Celebrating Shankar Nag as Auto Raja". The Times of India. Archived from the original on 9 November 2013. 9 November 2013 रोजी पाहिले.
  3. ^ RAY, BIBEKANANDA (5 April 2017). Conscience of The Race. Publications Division Ministry of Information & Broadcasting. ISBN 9788123026619. Archived from the original on 11 October 2020. 16 August 2019 रोजी पाहिले – Google Books द्वारे.
  4. ^ "This one's for Shankar Nag". The Times of India. Archived from the original on 9 November 2013. 9 November 2013 रोजी पाहिले.
  5. ^ Anand Chandrashekar (7 November 2009). "Shankar Nag Last Interview - Part 2". Archived from the original on 28 June 2014. 9 November 2013 रोजी पाहिले – YouTube द्वारे.
  6. ^ "Shankar Nag: An intense, amazing life and career". 9 November 2019. Archived from the original on 3 July 2020. 3 July 2020 रोजी पाहिले.
  7. ^ "An Actor and Visionary - Shankar Nag". Karnataka.com (इंग्रजी भाषेत). 2011-10-24. 2022-01-02 रोजी पाहिले.