भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
वार्षिक चित्रपट महोत्सव
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा आशियातील जुना आणि भारतामधील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणून गणला जातो. या चित्रपट महोत्सवाची सुरुवात इ.स. १९५२ पासून प्रारंभ झालेली आहे.[१]
स्थान | गोवा, भारत |
---|---|
यजमान | गोवा सरकार, चित्रपट महोत्सव संचालनालय |
संकेतस्थळ | https://iffigoa.org/ |
इतिहास
संपादनजगभरातली वेगवेगळ्या भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट कला सादर करण्यासाठी व चित्रपटाना सामायिक मंच पुरवण्याचा या चित्रपट महोत्सवाचा उद्देश आहे. सामाजिक व सांस्कृतिक वैशिष्ट्याच्या संदर्भातून विविध देशातली वेगवेगळ्या भाषेतील चित्रपट संस्कृती जाणून त्यासाठी योगदान देण्यासाठी व जगभरातल्या लोकांमध्ये मैत्री आणि सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाते. माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत अंतर्गत चित्रपट महोत्सव संचालनालय आणि गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने महोत्सव आयोजित केला जातो.
संदर्भ
संपादन- ^ "International Film Festival of India". iffigoa.org. 2021-03-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०२२-०४-०२ रोजी पाहिले.