व्हाले दाओस्ता (इटालियन: Valle d'Aosta, फ्रेंच: Vallée d'Aoste) हा इटली देशाच्या वायव्य कोपऱ्यातील आल्प्स पर्वतरांगेमध्ये वसलेला एक अर्ध-स्वायत्त प्रदेश आहे. व्हाले दाओस्ताच्या पश्चिमेस फ्रान्सचा रोन-आल्प प्रदेश, उत्तरेस स्वित्झर्लंडचे व्हाले हे राज्य तर इतर दिशांना इटलीचा प्यिमाँत प्रदेश आहेत. व्हाले दाओस्ता हा इटलीमधील आकाराने व लोकसंख्येने सर्वात लहान प्रदेश आहे.

व्हाले दाओस्ता
Valle d'Aosta
इटलीचा स्वायत्त प्रदेश
ध्वज
चिन्ह

व्हाले दाओस्ताचे इटली देशाच्या नकाशातील स्थान
व्हाले दाओस्ताचे इटली देशामधील स्थान
देश इटली ध्वज इटली
राजधानी आओस्ता
क्षेत्रफळ ३,२६३ चौ. किमी (१,२६० चौ. मैल)
लोकसंख्या १,२६,९९३
घनता ३९.१ /चौ. किमी (१०१ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ IT-23
संकेतस्थळ http://www.regione.vda.it/

आल्प्समधील माँट ब्लँक हा सर्वात उंच पर्वत येथेच स्थित आहे.

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: