"चेतासंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५१:
 
सीनो-हॅब्डायटिस एलेगॅन्स नावाच्या एका लहान सूत्रकृमीच्या चेतासंस्थेचा अनुबंध पातळीपर्यंत अभ्यास झालेला आहे. याच्या चेतासंस्थेमधील प्रत्येक चेतापेशी कशी आणि कोठे जोडली आहे हे आता समजले आहे. चेतासंस्थेमधील बहुतेक पेशी कशा प्रकारे परस्पराशी संपर्क ठेवतात हे त्यामुळे समजले. नर आणि मादी सीनो‌-हॅबडायटिस सूत्रकृमी मधील चेतसंस्थेमध्ये बदल आहे. याला लिंगप्रभेदन म्हणतात. लिंग संबंधी कार्य करण्यासाठी हा बदल असावा. नरामध्ये 283 चेतापेशी, तर उभयलिंगी सीनो-हॅबडायटिस मध्ये 302 चेतापेशी आहेत.
 
संधिपाद प्राणी चेतासंस्था
संधिपाद प्राणी :
कीटक आणि कवचधारी संधिपाद प्राण्यांची चेतासंस्था शरीराच्या खंडाप्रमाणे क्रमवार गुच्छिकानी बनलेली असते. अधर बाजूस असलेला मज्जारज्जू परस्पराशी आडव्या बंधानी जोडलेले असतात. प्रत्येक खंडासाठी एक गुच्छिका जोडी असते. काहीं गुच्छिका संलग्न झालेल्या असतात. मेंदू आणि अधोग्रसित गुच्छिका ही त्याची उदाहरणे. कीटकांच्या चेतासंस्थेमध्ये मेंदू पूर्वमस्तिष्क, मध्य मस्तिष्क आणि पश्च मस्तिष्क अशा तीन भागामध्ये असते. मेंदूच्या अधर बाजूस अधोग्रसित गुच्छिका असते . अधोग्रसित गुच्छिका तीन संलग्न गुच्छिकेनी बनलेली असते. मुखांगे, लाळ ग्रंथी आणि उरोभागातील काहीं स्नायू अधोग्रसित गुच्छिकेनी नियंत्रित होतात. बहुतेक संधिपाद प्राण्यामध्ये ज्ञानेंद्रिये असतात. संयुक्त नेत्र दृष्टिसाठी , शृंगिका स्पर्श, ग्राणेंद्रियाचे आणि कामगंध ओळखण्याचे कार्य करतात. ज्ञानेंद्रियानी आणलेले संवेद मेंदू ग्रहण करतो आणि त्याप्रमाणे वर्तन निश्चिती होते.
कीटकचेतासंस्थेतील मेंदूमध्येच्या बाह्य भागावर असलेल्या चेतापेशी विद्युत आवेग निर्माण करीत नाहीत. या मेंदूमधील अंतर्गत पेशीना पोषण पुरवण्याचे कार्य बाह्य पेशींचे असते. मेंदूच्या अंतर्गत चेतापेशीपासून अनेक अक्ष निघतात. या अक्षामुळे संवेद आणि विद्युत आवेग इतर चेतापेशीमध्ये पोहोचविले जातात. थोडक्यात कीटकांमधील मेंदूच्या बाह्य भागावरील चेतापेशी संवेद आणि आवेग ग्रहणाचे कार्य करीत नाहीत. मेंदूमधील चेतापेशीपासून निघालेले पेशीद्र्वाचे अक्ष आवेग आणि संवेद ग्रहण आणि वितरणाचे कार्य करतात. या पेशीद्रव अक्षाना ‘न्यूरोपिल’ असे म्हणतात.
 
 
== प्रतिक्षिप्त क्रिया ==