मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक दुसरा - (फेब्रुवारी २०१२ ) संपादन

चांदणे शिंपित जा ...!
 
 
मराठी विकिपीडिया गौरव समितीची
मराठी विकिपीडियावर अनेक मंडळी अहोरात्र काम करत आहेत. काही नवीन आहेत तर काही जुनी झाली, काम करणार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच कामाची कदर करण्यासाठी गौरवासारखे दुसरे साधन नाही. कामाच्या वाढत्या व्यापाबरोबरच त्याची योग्य रीतीने कदर पण करण्याच्या उद्देशाने एक आधारभूत संरचना मराठी विकिपीडियावर असावी ह्या उद्देशाने "मराठी विकिपीडिया गौरव समिती" ची स्थापना करण्यात येत आहे.

सदर समिती तर्फे दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपादन योगदानाचे गौरव जसे - १००० संपादने, २००० , ५००० संपादने आणि काही इतर गौरव (सदस्यांचे काम तपासून) प्रदान करण्यात येतील तसेच इतरांनी शिफारस केलेले अथवा समितीस योग्य वाटलेले/सुचलेले विशेष गौरवही प्रदान करण्यात येतील. अर्थात व्यक्तिगत बार्नस्टार देण्याच्या जुन्या पद्धतीला पूरक म्हणून ही समिती कार्य करेल.

 

"मराठी विकिपीडिया गौरव समितीची " सुरुवात होत असतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही आशा करतो की भविष्यात सदर समिती ही मराठी विकिपीडियाच्या उज्ज्वल भविष्यात मोलाचा वाट उचलण्यात उपयोगी ठरेल. आपणही ह्या उपक्रमात भरीव सहभाग द्यालच ही अपेक्षा.


 
जानेवारी २०१२ मधील सक्रिय सदस्यांचा आलेख
 
२०१२ जानेवारी महिन्यात जवळ जवळ एक हजार नवीन सदस्य नोंदणीकृत झाले त्याचा आलेख
 
जानेवारी २०१२ मध्ये मराठी विकिपीडियाने एक लाख पानांचा टप्पा गाठला त्याचा आलेख
पाने सांख्यिकी
लेख ३४,५४४
पाने

(चर्चा पाने, पुनर्निर्देशने, साचे, इ. सह एकूण पाने)

१,०९,५३४
चढवलेल्या संचिका ३,१९२
संपादन सांख्यिकी
एकूण संपादने ९,६८,६९३
प्रतिपान संपादने ८.८४
सदस्य सांख्यिकी
नोंदणीकृत सदस्य २२,०८४
कार्यरत सदस्य

(गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य)

१९०
सांगकामे ६०
प्रचालक १२
स्वीकृती अधिकारी
१८:३८ १ फेब्रुवारी २०१२ ची आकडेवारी


कार्यक्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यक्रम
 • टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई येथे ६ ते ८ जानेवारी दरम्यान मराठी विकिपीडियाचे स्टॉल लावण्यात आले होते, त्यास उत्तम प्रतिसाद लाभला. 'टेक फेस्ट २०१२' ला एक लाखाहून जास्त लोकांनी भेट दिली.
 • १५ जानेवारी २०१२ ला W - 11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि टेक्याथॉन, मुंबई आय. आय. टी बॉम्बे येथे आयोजित करण्यात आली होती.
 
टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई

त्या दरम्यान मराठी विकिपीडिया मोबाइल तसेच टॅबलेट वरून वापरण्यासाठी 'अँड्रॉईड अ‍ॅप' निर्माण करण्यात आल्या.

 • * ८ जानेवारी २०१२ - मराठी विकिपीडिया (एडिट ट्रेनिंग/ प्रशिक्षण/ मार्गदर्शन) शिबिर टेक मराठी महामेळावा, पुणे. १०० प्रशिक्षणार्थीनी ह्यात भाग घेतला.
 • * १५ जानेवारी २०१२ - W11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि विकी शिकवणी, ज्ञान प्रबोधिनी, पुणे येथे आयोजित करण्यात आली.
 • * १३ जानेवारी २०१२ - आबासाहेब अत्रे शाळा, रास्ता पेठ, पुणे येथे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विकी शिकवणी आयोजित करण्यात आली होती. ५० शाळकरी विद्यार्थ्यांनी ह्यात हिरीरीने भाग घेतला.
 • * २९ जानेवारी २०१२ - शाहीर अमर शेख सभागृह, चर्चगेट मुंबई, मराठी अभ्यास केंद्राच्या विद्यार्थी आणि शिक्षक महामेळाव्यात "मराठी विकिपीडिया आणि मराठी भाषेकरिता उपलब्ध होत असलेल्या तंत्रज्ञानाचा परिचय" यावर व्याख्यान तसेच विकिपीडियावर संपादन कसे केले जाते याचे सोदाहरण प्रात्यक्षिक दिले गेले. कार्यक्रमास १२५ मराठीप्रेमींची उपस्थिती होती.

  २०१२ फेब्रुवारी महिन्यातील आयोजित कार्यक्रम

 • ३ फेब्रुवारी - "माहिती तंत्रज्ञान, विकिपीडिया आणि मराठी भाषा" चर्चासत्र, मराठी विभाग पुणे विद्दापीठ.
 • १० फेब्रुवारी २०१२ - विकी शिकवणी, L&T इनस्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी, साकीनाका मुंबई.
 • १० ते १२ फेब्रुवारी - हॅक्याथॉन, (Gnunify) SICSR पुणे आणि मराठी विकिपीडिया - परिचय,
 • १७ फेब्रुवारी - मराठी विकिपीडिया - परिचय, COE, Pune
 • १८ फेब्रुवारी - विकी कार्यशाळा, आय आय टी मुंबई.
 • २० ते २७ फेब्रुवारी - फोटोथॉन, मुंबई.
 • २५ फेब्रुवारी - मराठी भाषा दिवस कार्यक्रम, रानडे इन्स्टिट्यूट, पुणे.
.
ठळक घडामोडी आणि आढावा
 • मराठी विकिस्रोतला प्रशासकीय मान्यता

मराठी विकिस्रोत हा बंधू प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव विकी मीडियाकडे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता. विकी संमेलन २०११, मुंबईच्या जाहीरनाम्यात ह्या प्रकल्पास सुरुउ करण्याच्या घोषणेनंतर प्रस्तावाचा पाठपुरावा आणि इतर अनिवार्य गोष्टींची पूर्तता मराठी विकिपीडिया समाजाने केल्याने,. लॅंग्वेज कमिटीने मराठी विकिस्रोत ह्या बंधू प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होईल.

विकिस्रोत म्हणजे विकी समुदायाने उभारलेले व देखभाल केले जाणारे, प्रताधिकारमुक्त दस्तऐवजांचे इंटरनेटवरील खुले ग्रंथालय आहे. ऐतिहासिक काळापासूनचे ललितेतर व ललित साहित्य, चित्रे/कलाकॄती यांच्या अस्सल प्रकाशनाबरहुकूम विश्वासार्ह विकिआवॄत्त्या सर्वांसाठी गोळा करून देणे हे विकिस्रोताचे उद्दिष्ट आहे. नवीन पिढीस जुने प्रताधिकारमुक्त मराठी ग्रंथ वाचण्यास इंटरनेटवर युनिकोड फॉर्ममध्ये सहज उपलब्ध करून देणे तसेच संदर्भ देणे आणि पडताळणे सोपे करण्यासाठी सदर प्रकल्प उपयोगात येईल.

मराठी विकिस्रोत' हे एक आंतरजालावर असलेले मुक्त पुस्तकालय आहे. यामध्ये वाचकांसाठी मोफत वाचनाची सोय आहे. आपल्याला या प्रकल्पात भर घालण्यासाठी निमंत्रण आहे. येथे प्राचीन तसेच प्रताधिकार नसलेले लेख आपण आणू शकता. मराठी विकिपेडियावर त्या लेखांची चर्चा होऊ शकते.

 

परंतु ते लेख मूळ स्वरूपात मराठी विकिस्रोत येथे साठवले जातात. उदा० ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी. तसेच ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने येथे संग्रहित करता येतील.


 • नवीन नियुक्ती
 
माहितगार - विकिसंमेलन भारत २०११, मुंबई

मराठी विकिपीडिया वरील दैनंदिन कामे, नवीन प्रस्ताव, तांत्रिक जबाबदाऱ्या, सुरक्षा, ध्येय धोरणे, प्रगती आदी अनेक आघाड्या अभय नातू हे एकटेच प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळत होते. वाढत्या व्यापाबरोबरच खांदे वाढवावे जेणे करून कामाचा वैयक्तिक दबाव कमी होईल आणि सेवाही सुरळीत मिळतील या उद्देशाने प्रशासक (ज्याला आता स्वीकृती अधिकारी असे संबोधण्यात येते) या पदासाठी मराठी विकिपीडिया समाजाने एकमताने 'माहितगार' यांना ही जबाबदारी दिली आहे.

माहितगार हे कुशल संघटक आहेत, मराठी विकिपीडियावर ‎प्रचालक म्हणून ७ जून २००६ पासून ते कार्यरत आहेत. तांत्रिक तसेच धोरणात्मक विषयांवर त्यांनी नेहमीच त्याच्या व्यक्तिमत्त्वातील परिपक्वतेचा परिचय दिलेला आहे. प्रेमळ व्यक्तिमत्त्व, प्रत्यक्ष क्षेत्रातील त्यांचे काम आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संपर्क हे वाखाणण्याजोगे आहे. तेंव्हा माहितगारांना 'स्वीकृती अधिकारी' (प्रशासक) पदाची जबाबदारी दिल्याने प्रशासकीय पातळीला अधिक बळकटी येईल.

'माहितगार' यांच्या पुढील कार्यास 'विकीपत्रिका' वाचकांतर्फे हार्दिक शुभेच्छा ...!!!

* विकिप्रकल्पांकरीता प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत..!

  वाचकांच्या प्रतिक्रिया

 • राहुल जी, सादर नमस्कार, मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचा आपल्या उत्कृष्ट संपादनाकरीता आपणांस व संपादक टीमचे हार्दिक अभिनंदन. या पत्रिकेमुळे मराठी विकिपीडिया विकास कार्याकरीता अनेक स्वयंसेवक जोडता येतील.--विजय नगरकर
 • नमस्कार राहुल, विकीचा अंक मस्त झाला आहे. आवडला. त्यात सांख्यिकी देण्याची कल्पना फार आवडली. हा अंक इतर संकेतस्थळांवर सादर केला तर चालेल का? निनाद
 • Superb effort ... Is there any away I can read in English -- Naveenpf
 • मला विकिपत्रिका नको आहे, त्यासंबंधीच्या लिंक किंवा मजकूर माझ्या सदस्य किंवा चर्चापानावर कृपया टाकू नये. धन्यवाद. मनोज
 • नमस्कार राहुल ! विकिपत्रिकेचा पहिला अंक प्रकाशित झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे, आणि अधिककरून तुमचे, अभिनंदन ! अंक नेटका आणि देखणा (याबद्दल विशेष शाबासकी :) ) झाला आहे. संकल्प द्रविड
विकिपत्रिका प्रकाशक...
 
  मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा...! * विकिपत्रिका संपादन मंडळात सहभागी व्हा !मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक पहिला - (जानेवारी २०१२ ) संपादन

२०१२ नववर्ष अभिष्टचिंतन ...!
 
सर्व मराठी विकिपिडीयंसना नवीन वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा. आम्ही आपल्यासाठी नवीन वर्षाची आगळी वेगळी भेट घेऊन आलो आहोत. हो विकीपात्रिका ...! मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय राहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्‍या कामांची सर्वाना माहिती व्हावी ह्या प्रमुख उद्देशाने हा नवीन उपक्रम सुरु करीत आहोत. जेणेकरून, सदस्यांना आपल्या आवडीच्या कामात भाग घेऊन योगदान करता येईल, तसेच कार्यरत सदस्याचे योगदान पण समोर आणता येईल. सांख्यिकी, लक्ष, ध्येय आणि ऑफ लाईन कामे त्यासाठी लागणारा जनाधार आणि नेटवर्क ह्यात सुसंवाद साधण्यात ह्याचा उपयोग होईल.

नववर्षाच्या मुहूर्तावर विकीपात्रिका ह्या मासिकाच्या प्रकाशनाची सुरुवात होत असतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही आशा करतो कि भविष्यात सदर मासिक हे मराठी विकिपीडियाच्या उज्वल भविष्यात मोलाचा वाट उचलण्यात उपयोगी ठरेल. आपणही ह्या उपक्रमात भरीव सहभाग द्यालच ही अपेक्षा.

 
विकिपत्रिका मराठी विकिपीडिया
 
२०११ मधील गुगल वरील मराठी विकिपीडियाबाबतचा लोकांनी घेतलेल्या शोधाचा लेखाजोखा (ट्रेंड)
पाने सांख्यिकी
लेख ३४,७९७
पाने

(चर्चा पाने, पुनर्निर्देशने, साचे, इ. सह एकूण पाने)

९६,२४०
चढवलेल्या संचिका ३,१६८
संपादन सांख्यिकी
एकूण संपादने ९,३२,७५०
प्रतिपान संपादने ९.६९
सदस्य सांख्यिकी
नोंदणीकृत सदस्य २१,१५१
कार्यरत सदस्य

(गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य)

१९०
सांगकामे ६०
प्रचालक १२
स्विकृती अधिकारी


प्रत्यक्ष क्षेत्रातील कार्यक्रम
 • विकिपीडिया व त्याचे बंधू-प्रकल्प- विकिस्रोत, विक्शनरी इत्यादी यात वापरल्या जाणार्‍या मिडियाविकी सॉफ्टवेअरच्या मिडियाविकी आणि मिडियाविकि विस्ताराच्या संदेशांचे स्थानिकीकरण, अनुवाद, अनुवादांचे प्रमाणिकरण
   
  CMDA IT expo. १५ ते १८ डिसेंबर २०११, पुणे. मराठी विकिपीडिया स्टॉल.

व सर्वसामान्य मराठी माणसास समजण्यास सुलभ भाषेचा उपयोग करण्याच्या उद्देशाने 'ट्रान्सलेशन स्प्रिंट (अनुवाद दौड/भाषांतर कार्यशाळा)' 'शनिवार,दिनांक २६ नोव्हेंबर २०११ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. ह्या उपक्रमाद्वारे ३२० संदेशांचे स्थानिकीकरण (लोकलायझेशन) पूर्ण करण्यात आले.

 • "CMDA IT Expo 2011, पुणे येथे १५ ते १८ डिसेंबर दरम्यान मराठी विकिपीडियाचे स्टॉल लावण्यात आले होते, त्यास पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद लाभला. स्टॉलला सुमारे ३००० लोकांनी भेट दिली तर २५० पेक्षा जास्त लोकांनी सक्रीय सहभागासाठी नावे नोंदविली.
 • शनिवार दिनांक २४ डिसेंबरला 'मामासाहेब मोहोळ महाविद्यालय पुणे' येथे विद्यार्थांसाठी विकी शिकवणीचे आयोजन करण्यात आहे होते. शिकवणीत ५० विद्यार्थांनी भाग घेतला ज्यात ४०% विद्यार्थिनी होत्या.

  २०१२ जानेवारी महिन्यातील आयोजित कार्यक्रम

 • ६ ते ८ जानेवारी - टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई
 • ७ - ८ जानेवारी - विकी शिकवणी टेक मराठी मेळावा, पुणे
 • १५ जानेवारी - W -11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि विकी शिकवणी, पुणे
 • १५ जानेवारी - W - 11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि टेक्याथॉन, मुंबई
 • २९ जानेवारी - विद्यार्थी मेळावा विकीशिकवणी , मराठी अभ्यास केंद्र, दादर मुंबई
विकिसंमेलन भारत २०११, मुंबई आढावा
 
मराठी ट्रॅक - विकिसंमेलन भारत २०११, मुंबई

मुंबईमध्ये भरलेल्या विकीसंमेलन २०११ च्या निमित्याने अनेक मराठी भाषाप्रेमी मंडळीना चर्चा करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले. उपस्थितांमध्ये मराठी विकिपीडिया संपादक, मराठी साहित्यिक, राज्य मराठी विकास संथेचे अधिकारी, उच्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र शासनाचे माहिती अधिकारी, आय आय टी मुंबईचे संशोधक, पत्रकार, आणि मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी-माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या परिषदेत, इंग्रजी भाषेचे ‘विकिपीडिया’तील वाढते महत्त्व जितके अभ्यासू वृत्तीने मांडण्यात आले तितकेच मराठी भाषा या नव्या ज्ञानकोशात कशा पद्धतीने समाविष्ट होऊ शकते याचाही तज्ज्ञांनी चांगलाच ऊहापोह केला. मराठी माणसाचा तंत्रज्ञानाविषयीचा न्यूनगंड, त्याच्यामध्ये माहिती आणि आत्मविश्वासाचा असलेला आभाव, मराठी युनिकोडची माहिती नसणे किंवा टायपिंग न येणे, मजकूर संपादनाचे कौशल्य नसणे, इंटरनेटच्या सोयींचा आभाव, अगदी मराठी विकिपीडिया अस्तित्वात आहे याची माहिती नसणे, अशा अनेक अडचणींमुळे मराठी समाजाने या तंत्रज्ञानाकडे पाठ फिरवली आहे, असे प्रमुख तज्ज्ञांचे मत होते. मराठी भाषेला ज्ञानभाषेच्या पातळीवर आणून ठेवायचे असेल तर हाताशी असलेल्या तंत्रज्ञानाचा जोरकस वापर करण्याची गरज आली आहे, असेही काहींचे मत होते. सध्याच्या जमान्यात सोशल नेटवर्किंग साइटचा प्रभाव वाढत असताना लोकांमध्ये संवाद वाढत आहे. पण यामध्ये ज्ञानाची देवाणघेवाण कितपत होते हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या दृष्टीने सोशल नेटवर्किंग साइटवर जास्त वेळ बसणाऱ्या मंडळींनी आपला १० टक्के वेळ वाचवून ‘विकिपीडिया’त योगदान दिले तर त्याने भाषाव्यवहारात भर पडेल, शिवाय ज्ञानशाखेची ओळखही अनेकांना होईल असा विचार मांडण्यात आला, तर काही उपस्थितांनी भाषाशास्त्र, भाषासंवर्धन, मराठीतील नव्या शब्दांचा उपयोग, जुन्या शब्दांना पुनर्जन्म, इंग्रजी शब्दांसाठी नेमका प्रतिशब्द, भाषांतर, मजकुराचे उत्तमरीत्या संपादन अशा विविध पैलूंनाही स्पर्श केला. मराठी फाँट हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. त्यावर अनेक पर्याय सुचवण्यात आले. संमेलनादरम्यान आय आय टी मुंबईच्या संशोधकांनी 'ह्याक्याथॉन' ह्या तांत्रिक मार्गीकेतून 'नारायम' या फाँटचे मराठीकरण आणि सुलभीकरण पूर्ण केले.

या समस्यांच्या खोलाशी जाताना महाराष्ट्रातील प्रमुख ७ शहरांतील निवडक शाळांमध्ये मराठी ‘विकिअकादमी’ स्थापन करण्याचीही घोषणा मराठी विकिपीडियाने केली आहे. जेणेकरून, शिक्षक आणि विद्यार्थी या चळवळीशी जोडून घेतला तर दोघांच्याही ज्ञानकक्षा अधिक रुंदावत जातील. ‘विकिस्रोत’ ह्या बंधुप्रकल्पाची घोषणा, संस्कृत विकिपीडियाशी सहयोग, इतर माहिती आणि संपर्क माध्यमांचा वापर इत्यादी गोष्टींद्वारे मराठी विकिपीडिया चळवळ अधिक व्यापक करण्याचा उदेश जाहीर करण्यात आला. प्रसिद्धी माध्यमांनी मराठी विकिपीडियास मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिल्याचे संमेलनादरम्यान जाणवले.

* विकिप्रकल्पांकरीता प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत..!

मराठी विकिपीडिया विकिसंमेलन भारत २०११ जाहीरनामा

 • महाराष्ट्रातील ७ प्रमुख शहरामधील निवडक शाळांमध्ये मराठी विकी अकादमीची आखणी करणे आणि तेथील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या पर्यंत मराठी विकिपीडियाचे रीतसर प्रशिक्षण पोहोचवणे आणि मराठी विकिपीडियामध्ये भर घालणे.
 • संस्कृत विकिपीडियाशी सहयोग करून त्यांना प्रशिक्षण/ विकी शिकवणी आणि तांत्रिक गोष्टी या मध्ये मदत करणे.
 • मराठी विकिपिडीयावर "विकी स्रोत" ह्या बंधू प्रकल्पास सुरवात करणे.
 • मराठी विकिपीडिया इतर संपर्क माध्यमांद्वारे उपलब्ध करणे जसे मोबाईल, टॅब, सी डी आदी.
 • मराठी विकिपीडिया समविचारी मंडळींनी एकत्र येऊन माहितीचे आदान प्रदान करणे.
विकिपत्रिका प्रकाशक...
 
  मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा...! * विकीपत्रिका संपादन मंडळात सहभागी व्हा !


     स्वागत Mohan Madwanna, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
  आवश्यक मार्गदर्शन Mohan Madwanna, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९४,०९६ लेख आहे व १७३ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
 
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
 • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

 

 • दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : शेवटची पायरी लेखात आपण केलेले बदल जतन करणे आपण लेखपान जतन (सेव्ह) करता तेव्हा ते साठवले जाते आणि/अथवा प्रकाशित होते. मराठी विकिपीडिया 'जतन करा' हे शब्द वापरते कारण 'जतन करा' या शब्दाच्या अर्थछटांमध्ये conservation: परिरक्षण, जपणूक वाचवणे, राखणे ; preservation: परिरक्षण , संस्करण,देखभाल keep: ठेवणे जतन करणे, जपून ठेवणे, परिरक्षण करणे, सांभाळून ठेवणे, पालन करणे; राखून ठेवणे, राखणे ;maintenance:निगा (स्त्री.), जतन (न.), सुस्थितीत ठेवणे ४ राखणे (न.), ठेवणे (न.) इत्यादीं अर्थछटांचा समावेश होतो


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

  Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
  नेहमीचे प्रश्न
  सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
  धोरण
  दालने
  सहप्रकल्प

नागराज संपादन

किंग कोब्रा किंवा नागराज हा जगातील आकाराने सर्वात मोठा विषारी सर्प आहे. याचे शास्त्रीय नाव ऑफिओफॅगस हॅना (ग्रीक ऑफिऑस- साप ; फॅगी- खाणे) असे आहे. (नागराज इलेपिडी कुलात असून या कुलातील इतर साप म्हणजे नाग, अॅाडलर , आणि आफ्रिकेमधील ब्लॅक मांबा.) नागराज फक्त साप खाऊन राहतो. त्याची लांबी सु. 5.6 मीटर असते. भारतातील जंगलातून त्याचे प्रामुख्याने वास्तव्य आहे. महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमा भागामध्ये बंडीपूर, कोइमतूर, निलगिरी केरळ राज्यामध्ये आणि आसाममधील अरण्यात नागराजाचे आस्तित्व आहे. दक्षिण आशिया मधील फिलिपाइन्स आणि इंडोनेशियामध्ये तो आढळतो.पूर्व चीनमध्ये तो तुरळकपणे आढळतो. त्याच्या नावात ‘नाग’ हे विशेषण असले तरी खर्या नागप्रजातिमध्ये त्याची गणना होत नाही. त्याचे प्रजातिनाम वेगळे आहे. नागराज हा हल्लेखोर आणि चपळ साप आहे. एका चाव्यात मोठ्या प्रमाणात जहाल विष तो भक्ष्याच्या शरीरात सोडतो.

नाग राजाच्या त्वचेचा रंग ऑलिव्ह फळाप्रमाणे हिरवा, काळसर तपकिरी किंवा काळा असतो. शरीरावर फिकट पिवळ्या रंगाचे आडवे पट्टे असतात. पोट फिकट पिवळे पांढरे , खवले मऊ एकसारखे असतात. लहान नागराजाच्या काळ्या शरीरावर असलेल्या पिवळ्या पट्ट्यामुळे तो पटेरी मण्यार असावा असे वाटते. त्याला ओळखण्याची खरी खूण त्याचा फणा. पूर्ण वाढ झालेल्या नागराजाचे डोके मोठे वजनदार भासते. इतर सापाप्रमाणे नागराजाचे दोन्ही जबडे परस्पराना जोडलेले नसल्याने मोठे भक्ष्य सहजपणे त्याना गिळता येते. वरील जबड्याच्या पुढील भागामध्ये दोन अचल पोकळ विषदंत असतात. यामधून विष अंतक्षेपण भक्ष्याच्या शरीरात करता येते. नर मादीहून आकाराने मोठा आणी मादीहून जाडीला अधिक असतो. नागराजाचे सर्वसाधारण आयुष्य वीस वर्षांचे असते.

ऑफिओफॅगस प्रजातिमधील नागराज हा एकमेव साप आहे. इतर नाग “नाजा” प्रजातिमधील आहेत. इतर नागापासून फण्यावरील खूण आणि फण्याच्या आकारावरून नागराज सहज ओळखता येतो. त्याच्या मानेवरील “^” आकाराची खूण इतर नागाच्या फण्यावर नसते. नागराज ओळखण्याची खूण म्हणजे सहज दिसणारे डोक्यावरील दोन पश्चकपाल (ऑक्सिपिटल) खवले. डोक्याच्या वरील मागील बाजूस हे खवले असतात.

इतर सापाप्रमाणे नागराजाची जीभ दुभंगलेली असते. साप नेहमी जीभ बाहेर काढतो. जिभेच्या टोकावर आलेल्या गंध कणांचे ज्ञान सापाला टाळूवर असलेल्या जॅकोबसन अवयवामुळे होते. भक्ष्याचे नेमके स्थान आणि मीलनाकाळात मादीचा मीलन गंध ओळखण्यासाठी याचा उपयोग होतो. दुभंगलेल्या जिभेच्या सहाय्याने गंधकणांचे त्रिमिति ज्ञान होण्यास मदत होते. नागराजाचे डोळे तीक्ष्ण असतात. हालचाल करणारी वस्तू शंभर मीटर वरून त्याला ओळखता येते. मोठ्या आकारामुळे जमिनीमधील कंपनांचे उत्तम ज्ञान त्यास होते. या कंपनावरून आणि गंधज्ञानावरून त्याला भक्ष्याचा अचूक पाठलाग करता येतो. एकदा भक्ष्य जबड्यामध्ये पकडले म्हणजे अर्धवट धडपड करणारे भक्ष्य तो जबड्याने गिळण्यास प्रारंभ करतो. त्याने विषदंतामधून सोडलेल्या विषामुळे भक्ष्याचे पचन होत असताना नागराज भक्ष्य गिळतो. दिवसभरात कोणत्याही वेळी नागराज भक्ष्य पकडतो. त्यामुळे सर्पतज्ञांच्या म्हणण्यानुसार नागराज दिनसंचारी आहे.

मानवी संपर्क नागराज सहसा टाळतो. पण डिवचल्यावर तो सहज हल्ला करतो. शरीराचा पुढील भाग वर उचलून मान सरळ करून विषाचे दात दाखवून फुस्कारा सोडणे हा त्याचा स्वभाव. नागराजाचा फूत्कार इतर सापांच्या तुलनेने मोठा आहे (2500 हर्ट्झ) . जवळ आलेल्या कोणत्याही हालचाल करणार्या सजीवमुळे नागराज चिडतो. नागराज दोन मीटर परिघामध्ये हल्ला करू शकतो. त्यामुळे साप लांब आहे या समजुतीने जवळ गेलेल्या व्यक्तीचा अंदाज चुकतो. आणि आपसूखच माणूस नागराजाच्या तडाख्यात सापडतो. एका वेळा तो अनेक चावे घेतो. प्रौढ नागराज दंश करताना विषाचे दात शरीरात घुसविल्यानंतर दात थोडा वेळ स्थिर ठेवतो. एवढ्या वेळेत भरपूर विष भक्ष्याच्या शरीरात गेलेले असते. त्याचा स्वभाव आपणहून हल्ला करण्याचा नाही. डिवचल्यानंतर किंवा अडचणीत सापडल्यानंतर तो स्वसंरक्षणासाठी हल्ला करतो.


सापाचा नैसर्गिक शत्रू मुंगूस पण नागराज मुंगूस अंगावर आलेच तर त्याचा यशस्वी प्रतिकार करते. नागराजाच्या मानाने मुंगूस आकाराने अगदी लहान असल्याने हे शक्य होते. या झटापटीत मुंगसाचा बहुधा जीव जातो. नागराजाची प्रजाति ऑफिओफॅगस म्हणजे साप खाणारा असे असल्याने नागराजाच्या खाण्यात धामण, लहान अजगर, सर्व विषारी साप असतात. साप अगदीच दुर्मीळ असतील तर सरडे, पक्षी आणि लहान कुरतड्णारे प्राणी तो खातो. दक्षिण भारतात चहाच्या मळ्यात नागराजामुळे अनेक मृत्यू झाले आहेत. एरवी नागराज मानवी वस्तीजवळ जात नाही.

नागराजाचे विष मज्जासंस्थेवर आणि हृदयावर परिणाम करते. विष मुख्यत्वे प्रथिने आणि बहुपेप्टाइड्ने बनलेले असते. चावा घेताना विषाचे दात शरीरात 1.25 ते 1.50 सेमी. घुसतात. विषाचा त्वरित मज्जासंस्थेवर परिणाम होतो. तीव्र, वेदना, चक्कर येणे, पक्षाघात, शक्तिपात ही लक्षणे ताबडतोब दिसतात. हृदयक्रिया बंद होणे , कोमा आणि श्वसनसंस्थेचा पक्षाघात यामुळे मानवाचा मृत्यू होतो. नागराजाच्या विषाची मृत्यू मात्रा 1.6 मिग्रॅम प्रतिकिलो वजन मोजण्यात आली आहे. एका अभ्यासात चिनी नागराजाच्या 0.34 मि ग्रॅम प्रति किलो मात्रेमुळे मृत्यू ओढवल्याचे आढळले आहे. नागराज एका वेळी 380- 600 मि ग्रॅम विष अंतक्षेपित करत असल्याने नागराजाने दंश केलेली व्यक्ती पंधरा मिनिटात मरण पावते. सरासरी 30-45 मिनिटामध्ये मृत्यू ओढवतो. नागराजाने दंश केलेल्या 75% व्यक्ती मरण पावतात. सध्या नागराजाच्या विषावर दोन प्रतिविषे उपलब्ध आहेत. थायलंड रेड क्रॉस आणि हैद्राबाद मधील सेंट्रल रीसर्च इन्सटिट्यूट या दोन्ही संस्थेने बनविलेली प्रतिविषांची उपलब्धता कमी आहे.


नागराजाची मादी हा एकमेव साप अंड्यांचे रक्षण करतो. जंगलातील वाळलेली पाने आणि गवताचा उंचवटा करून त्यामध्ये मादी 20-40 अंडी घालते. अंड्यामधून पिले बाहेर पडेपर्यंत मादी या पानांच्या घरट्यावर वेटोळे घालून बसते. जवळ आलेल्या प्रत्येक प्राण्यास मादी भेसडावते. पानांच्या घरात तापमान 28 अंश सें ठेवलेले असते. अंड्यातून पिले बाहेर येण्याच्या वेळी मादी घरट्यापासून दूर जाऊन एखादे भक्ष्य खाते. आपली पिले खाण्याचा नागराजाच्या मादीचा स्वभाव नाही. अंड्यातून बाहेर पडलेली पिले 45-55 सेमी लांबीची असतात. त्यांचे विष प्रौढाइतकेच प्रभावी असते. पिले जन्मापासून थोडी चिडखोर असतात. Mohan Madwanna १७:१८, १ सप्टेंबर २०११ (UTC)मोहन मद्वाण्णा

एक विनंती संपादन

आपण रक्त या लेखात बरीच मोलाची भर घालीत आहात. त्याबद्दल आपले अभिनंदन.आपले विकीवर योगदान असेच सुरू ठेवावे अशीपण अपेक्षा आहे.दुसरे असे कि, आपण टाकत असलेल्या मजकूरातील आकडे हे मराठीत टाकावेत तसेच, परिच्छेद(पॅराग्राफ)सुरू करतांना,टॅब मारु नये. समास(मार्जिन) न सोडता लेखन करावे.दोन परिच्छेदात अंतर ठेवण्यासाठी कळफलकाची 'एंटर' कळ दाबुन अंतर ठेवता येते.

आपल्यास काही मदत लागल्यास,कोणाही जुन्या सदस्यास त्याचे चर्चा पानावर संदेश दिल्यास तो खचितच निराकरण करेल.पुन्हा शुभेच्छा. वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०९:०१, १० सप्टेंबर २०११ (UTC)

देवनागरी आकडे संपादन

नमस्कार मोहन.

मराठी विकिपीडियावर माहिती भरताना मजकुरात देवनागरी मराठी लिपी व देवनागरी मराठी अंक वापरावेत. मधमाशी या लेखात तुम्ही केलेल्या आधीच्या संपादनात रोमन आकडे दिसत आहेत. ते कृपया दुरुस्त करावेत. तसेच परिच्छेद आरंभतअना टॅब/स्पेसबार मारू नये. त्यामुळे त्याचे विकिफॉरमॅटिंग नीट होत नाही, व मजकुराभोवती विचित्र अशी तुटक रेषांची चौकट दिसते. सिंटॅक्सविषयक साह्य मिळवण्यासाठी डावीकडील साइडबारात (समासपट्टीत) वरच्या भागात "सहाय्य" नावाचा दुवा आहे; त्यावर क्लिक करून संबंधित साह्यपर लेख न्याहाळावेत.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ००:३५, ९ नोव्हेंबर २०११ (UTC)

स्वागत संपादन

मोहन, आपले मराठी विकिपिडीयावर स्वागत आहे. आपणास लेखनाचाआणिसंपादनाचा अनुभवआहे हि अतिशय आनंदाचीबाब आहे. मराठी विकिपीडियास भाषांतर करणार्यांची त्यातही वैज्ञानिक विषयात काम करणार्यांची असलेली गरज आपल्या योगदानामुळे काही प्रमाणात पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

 1. आपण आपल्या आवडीच्या विषयावर सद्या विपी वर असलेली माहिती शोध यंत्र द्वारे तपासावी आणि उपलब्ध नसलेली माहिती वाढवावी.
 2. आपण नवीन विषयावरही माहिती लेख लिहू शकता.
 3. काही काळ आपणास मिडिया विकी वर लिहण्याचा थोडा सराव झाला कि आपणास काही अधिक सुविधा बाबत माहिती देतो जसे वर्ग, साचे, आदी. ज्यामुळे लेखन अधिक सोपे आणि दर्शनीय करता येते.
 4. एकदा आपल्या आवडीच्या विषयाचा अंदाज आला कि आपणास त्या अनुरूप प्रकल्पास अथवा दालनास जोडता येईल.

आपल्या हातून उत्तम मराठी सेवा घडो हीच अपेक्षा. कोणत्याही अडचणीसाठी तत्काळ संपर्क करावा.

धन्यवाद

राहुल देशमुख ०८:१०, १४ सप्टेंबर २०११ (UTC)

परिच्छेदाच्या पहिल्या ओळीतील पहिला शब्दाच्या अलीकडे समास/रिकामी जागा(स्पेस) संपादन

परिच्छेदातील पहिल्या ओळीत, एक किंवा अधिक अक्षरांची जागा ठेवून पहिला शब्द लिहिण्यास चालू केल्यास तो खालीलप्रमाणे वेगळा दिसतो.

परिच्छेदातील पहिल्या ओळीतील पहिला शब्द, एक किंवा अधिक अक्षरांची जागा ठेवून चालू केल्यास तो येथे दर्शविल्याप्रमाणे प्रमाणे वेगळा दिसतो.

एक तर पहिल्या शब्दाच्या अलीकडे जागा(स्पेस) न सोडता लेखन चालू करू नये अथवा स्पेस हवीच असल्यास ; आपल्याला हे लेखन एक किंवा जेवढी अक्षरे सोडून करावयाचे असेल तेवढे शब्दाच्या अलीकडे हवे तेवढी विसर्ग चिन्हे : ओळीतील पहिल्या शब्दाच्या अलीकडे लिहावीत म्हणजे अशी त्रुटी उद्भवणार नाही.

::परिच्छेदातील पहिल्या ओळीत एक किंवा अधिक अक्षरांची जागा ठेवून पहिला शब्द लिहायला सुरुवात केल्यास तो खालीलप्रमाणे वेगळा दिसतो.

हे खालीलप्रमाणे दिसेल.

परिच्छेदातील पहिल्या ओळीत एक किंवा अधिक अक्षरांची जागा ठेवून पहिला शब्द लिहायला सुरुवात केल्यास तो खालीलप्रमाणे वेगळा दिसतो.
 • उदाहरणाकरिता हे आणि हे चित्र पहावे.

आपल्या मार्गदर्श्नाबद्द्ल आभार. मी मराठी इंडिक इन्पुट ही आज्ञावली वापरीत आहे. यामध्ये आकडे मराठीतयेत नाहीत. कृपया मार्गदर्शन करावे

About photos from English Wikipedia संपादन

Do you still need help about adding photos from English Wikipedia to this Wikipedia? गणेश धामोडकर १०:२९, १६ डिसेंबर २०११ (UTC)

About Jaundice and Hepatitis संपादन

Dear Sir, thanks for your excellent contributions to the article for कावीळ. I would like to make a note that the article should be moved to a new title यकृतदाह. यकृतदाह is a standard Marathi name for hepatitis, whereas कावीळ (jaundice) is yellowness of the skin, urine, excreta, and sclera that is a symptom of hepatitis. Also, it goes with hepatitis A, B, and C (we can't say कावीळ A, B, C) Let me know your opinion. गणेश धामोडकर १०:४८, १६ डिसेंबर २०११ (UTC)

 

.  

  विकीपत्रिका सभासद नोंदणी ....!  
नमस्कार, Mohan Madwanna

मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय रहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्‍या कामांची सर्वाना माहिती व्हावी आणि सद्द घटनांबद्दल आढावा ह्या उद्देशाने मराठी विकिपीडिया विकीपत्रिका दि. १ जानेवारी २०१२ पासून सुरू करीत आहोत.

पत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चापानावर पोहचविण्यात येईल.

मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपल्या माहिती आणि पुढील योग्य कार्यवाहीसाठी सादर.

कळावे - खबर्या (विकीपत्रिका)


येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी संपादन

नमस्कार ! चावडीवर येथे येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी काही प्रस्ताव मांडले आहेत. त्याविषयी कृपया आपली मते/कल्पना मांडावीत, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:१०, १ जानेवारी २०१२ (UTC)

Some useful tips for typing in new Input method (transliteration mode) संपादन

Keyboard input Converted to
rya र्य
rrya ऱ्य
rha र्ह
rrha ऱ्ह
nja
nga
a^
shU/// शूऽऽ
Ll
Lll
hra ह्र
hR हृ
R
RR
ka` क़
k`a क़
\.
\.\

१०० पेक्षा जास्त संपादने - अभिनंदन संपादन

नमस्कार Mohan Madwanna,

मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून आपण मराठी भाषेचे भवितव्य उज्वल करण्यात अमूल्य योगदान केले आहे. मराठी विकिपीडियावर १०० पेक्षा अधिक संपादने पार पाडल्याबद्दल आपले अभिनंदन. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. मराठी विकिपीडियावरील आपला संपादन कालावधी अधिक सहज आणि भरीव ठरण्यात आपणास सहयोग मिळावा यासाठी खालील पानांकडे आपल्या सवडीने दृष्टीक्षेप टाकावा ही नम्र विनंती.

उपयोगी पाने
विकिपीडीया एक सहयोगाने पुढे जाणारे संकेत स्थळ आहे. विकिपीडियात हवे असलेले लेख माहिती तसेच करावयाच्या गोष्टीं नोंदवल्यात आणि संबधीत प्रकल्पात समन्वय आणि मराठी विकिपीडियावर संपादने करण्याबद्दल आपल्या परिचितांनाही सांगून प्रवृत्त केल्यस, तुमच्या एकट्यावर येणारा संपादनांचा भार हलका होईल आणि कामही कसे फत्ते होईल हे पहाता येईल काय, या बद्दल अवश्य विचार करा.
मराठी विकिपीडियावरील उपलब्ध सहाय्य पानांबद्दलचा आपला अभिप्राय चावडीवर आवर्जून नमूद करावा.
आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन!
विकिपीडिया मदतचमू
~~~~

मोलाची भर संपादन

मधमाशी यालेखात मोलाची भर घातल्या बद्दल धन्यवाद. (उशीर झाला असला तरी धन्यवाद द्यावेतच असे वाटले. :) निनाद ०६:२८, १८ डिसेंबर २०१३ (IST)Reply[reply]

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ संपादन

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.