"रिचर्ड निक्सन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १:
[[चित्र:Richard_M._Nixon,_ca._1935_-_1982_-_NARA_-_530679.jpg|thumb|right|{{लेखनाव}}]]
'''रिचर्ड निक्सन''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Richard Milhous Nixon'') (९ जानेवारी, इ.स. १९१३ - २२ एप्रिल, इ.स. १९९४) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] ३७वा राष्ट्राध्यक्ष होता. याने २० जानेवारी, इ.स. १९६९ ते ९ ऑगस्ट, इ.स. १९७४ या कालखंडादरम्यान राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. अध्यक्षीय कारकिर्दीअगोदरकारकीर्दीअगोदर हा इ.स. १९५३ ते इ.स. १९६१ या कालखंडात [[ड्वाइट डी. आयझेनहॉवर]] याच्या अध्यक्षीय राजवटीत अमेरिकेचा ३६वा उपराष्ट्राध्यक्ष होता, तर तत्पूर्वी [[अमेरिकन]] संसदेत [[कॅलिफोर्निया]]चा प्रतिनिधी (इ.स. १९४७ ते इ.स. १९५०) व सेनेटसदस्य (इ.स. १९५० ते इ.स. १९५३) होता. [[वॉटरगेट प्रकरण|वॉटरगेट प्रकरणात]] याच्याविरोधात [[महाभियोग]] चालवला जाण्याची चिन्हे दिसल्यावर याने ९ ऑगस्ट, इ.स. १९७४ रोजी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पदाचा राजीनामा देणारा हा अमेरिकी इतिहासातला एकमेव राष्ट्राध्यक्ष आहे.
 
कायद्याचा पदवीधर असलेल्या निक्सनाने आरंभी काही काळ वकिली केली. पुढे तो [[अमेरिकी नौदल|अमेरिकी नौदलात]] रुजू झाला व [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍यादुसऱ्या महायुद्धात]] [[प्रशांत महासागर|प्रशांत महासागराच्या]] आघाडीवर लढला.
 
आपल्या पहिल्या अध्यक्षीय राजवटीत निक्सनाने [[व्हियेतनाम युद्ध|व्हियेतनाम युद्धास]] वाढणारा वाढता देशांतर्गत विरोध लक्षात घेऊन [[व्हियेतनाम|व्हियेतनामातून]] अमेरिकन सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला, इ.स. १९७२ साली [[चीनचे जनता-प्रजासत्ताक|चीनच्या जनता-प्रजासत्ताकास]] अधिकॄत भेट देऊन अमेरिका-चीन राजनैतिक संबंध पुन्हा स्थापण्यात पुढाकार घेतला, तसेच त्याच वर्षी [[सोव्हियेत संघ|सोव्हियेत संघाशी]] क्षेपणास्त्रविरोधी क्षेपणास्त्रांवर मर्यादा घालून घेण्याचा तह केला. [[चंद्र|चंद्रावर]] मानव पाठवण्याच्या अमेरिकी प्रयत्नांना [[अपोलो ११]]च्या रूपाने निक्सन प्रशासनाच्या कार्यकाळातच यश लाभले; तरीही एकंदरीत दॄष्टिकोनातून पाहता निक्सन प्रशासनाने समानव अंतराळ मोहिमा सीमित करण्याचेच धोरण अनुसरले. इ.स. १९७२ सालातल्या अध्यक्षीय निवडणुकींत निक्सन मोठ्या मताधिक्याने अध्यक्षपदाच्या दुसऱ्या मुदतीसाठी निवडून आला.