विकिपीडिया:हॉटकॅट

(विकिपीडिया:HC या पानावरून पुनर्निर्देशित)

हॉटकॅट हे विकिपिडियावरील पानांचे वर्गीकरण करण्यासाठी वापरले जाणारे एक कळयंत्र (Gadget) आहे. याचा वापर वर्ग आणि तत्संबधी संपादने करण्यासाठी होतो. ही संपादने करण्यासाठी विकिपीडियातील पाने संपादन खिडकीत उघडावी लागत नाहीत. तर पानावरील वर्गपट्टीतच संपादन करून पानाचे वर्गीकरण करता येते. याच्या वापराने वर्ग टाकता येतात, वर्ग वाढवता येतात, असलेले वर्ग बदलता येतात. ज्या सदस्यांना पानांचे वर्गीकरण करण्यात रस आहे त्यांचा वेळ वाचवणारे हे कळयंत्र आहे.

तुमच्या सदस्य नावाची वर जी पट्टी आहे त्यातील "माझ्या पसंती" निवडा त्यामध्ये "उपकरण(गॅजेट)" हा टॅब सिलेक्ट करा तेथे खाली तुम्हाला <gadget-HotCat> च्या पूर्वी असलेला चौकोनात टिचकी देऊन बरोबर चिन्ह येईल त्यानंतर खाली जतन करा. झाले.

त्यानंतर विकिपीडियावरील कोणतेही पान उघडल्यावर त्या पानाची वर्गपट्टी उदाहरणार्थ खालीलप्रमाणे दिसेल.

 

वापर कसा करावा

संपादन

वर्गपट्टीत काहीच वर्ग नसतील तर "(+)" चिन्ह दिसेल. लेखाचे वर्गीकरण केलेले असेल आणि वर्गपट्टीत काही वर्ग असतील तर प्रत्येक वर्गापुढे "(-)" "(±)" "(↓)" "(↑)" अशी चार चिन्हे दिसतील.

  • "(-)" हे अत्यंत काळजीपूर्वक वापरायचे चिन्ह आहे. याचा वापर वर्ग काढून (delete) टाकण्यासाठी केला जातो. यावर तुम्ही फक्त टिचकी दिली तर तुम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता तो वर्ग काढून टाकला जातो. त्यामुळे याचा अगदी विचारपुर्वक वापर करावा.
  • "(±)" याचा वापर असलेला वर्ग बदलण्यासाठी केला जातो.
  • "(↓)" याचा वापर बदल करण्यासह उपवर्ग दाखवण्यासाठी होतो.

 

  • "(↑)" याचा वापर बदल करण्यासह मुख्य वर्ग दाखवण्यासाठी होतो.

 

  • "(+)" याच्या वापराने नवीन वर्ग जोडता येतो.

अधिक माहिती

संपादन

हॉटकॅटचा वापर कसा करावा याविषयी अधिक माहितीसाठी इंग्लिश विकिपीडियावरील पानावर पहा.


सदस्य चौकट

संपादन
 
ही व्यक्ती वर्गीकरणासाठी हॉटकॅट वापरते