"साम्राज्यवाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १९१:
===राजकीय वर्चस्वाची महत्त्वकांक्षा===
 
वसाहती जिंकून घेणे आणि त्या दीर्घकाळ आपल्या ताब्यात ठेवणे यासाठी त्या वसाहतींचे संरक्षण करण्याची आवश्यकता होती. त्यासाठी [[सागर]]ातील व [[जमिन]]ीवरील लष्करी ठाणी जिंकून घेण्याची स्पर्धा युरोपीय राष्ट्रांमध्ये सुरू झाली. आपल्या राष्ट्राची प्रतिष्ठा वाढावी यासाठी युरोपीय राष्ट्रे साम्राज्यविस्तार करू लागली. एखाद्या देशाचे मोठेपण त्याच्या ताब्यात असलेल्या वसाहतींवरून ठरू लागले. या साम्राज्यवादाच्या विकासातून युरोपीय राष्ट्रांमध्ये परस्परांविषयी संशयाचे वातावरण निर्माण झाले. प्रत्येक राष्ट्र आपल्या रक्षणाची जय्यत तयारी करू लागले. त्यातून राष्ट्रांमध्ये वसाहती मिळवण्यासाठी स्पर्धा वाढतच गेली.
 
===धर्मप्रसार===
 
[[ख्रिस्ती]] [[धर्म]]ाचा प्रसार जगभर व्हावा अशी युरोपियांची इच्छा होती. त्यांचा [[धर्म]] व [[संस्कृती]] जगात सर्वात श्रेष्ठ आहे अशी त्यांची समजूत होती. इंग्रजांनी भारतात पाऊल ठेवले ते हाती '[[तराजू]] व [[बायबल]]' घेउन. यातील तराजू हे व्यापाराचे व बायबल हे धर्म प्रसाराचे प्रतीक होते. वसाहती स्थापन केल्यानंतर अनेक धर्मप्रसारक तेथे पोहोचले. ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी अनेक मिशनरी स्थापन झाल्या. त्यातून साम्राज्यवाद वाढीस लागला.