"अग्निबाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५:
 
== इतिहास ==
अग्नीबाणाचा शोध प्राचीन [[चीन]]मध्ये लागल्याचे कळते. परंतु कालौघात ही [[कला]] लुप्त पावली. मध्ययुगीन इस्लामी राज्ये व युरोपीय लोकांनी दारुगोळा वापरायचे तंत्र मोठ्या प्रमाणावर अवगत केले व आपापली साम्राज्ये पसरली. अग्निबाणाचा चीननंतर पहिला वापर [[भारत|भारतात]] झाल्याचे ब्रिटीश मान्य करतात.{{संदर्भ हवा}} [[टिपू सुलतान|टिपू सुलतानला]] आजच्या आधुनिक अग्निबाणाचा जनक मानले जाते. १७९३ च्या अँग्लो-म्हैसूर युद्धात [[टिपू सुलतान|टिपूच्या]] सैन्याला कमी लेखणाऱ्या ब्रिटीश सैन्याला टिपूच्या आश्चर्यकारक अग्निबाणाच्या हल्याला तोंड द्यावे लागले. टिपूचे हे अग्नीबाण तांत्रिक दृष्ट्या कमकूवत असल्याने त्या व नंतरच्या युद्धात फारसा फरक पाडू शकले नाहीत. परंतु शस्त्रतंत्रज्ञांनी हे नवीन शस्त्र [[तोफ|तोफां]]पेक्षाही लांबवर याची संहारक्षमता असल्याने भविष्यात प्रभावी ठरेल हे ओळखले व त्यात शास्त्रीय सुधारणा करून पुढील युद्धांमध्ये वापर केला.
 
== रचना ==
अग्निबाणाची वात पेटवल्या नंतर वातीमधून ती आग इंधनाच्या मिश्रणापर्यंत जाते आणि त्याचे अत्यंत वेगाने [[ज्वलन]] होऊन त्यातून खूप मोठे [[आकारमान]] असलेला वायु तयार होतो. हा वायू अग्निबाणाच्या भक्कम नळकांडीमध्ये असल्याने त्याचा दाब वाढत जातो. हा वायू बाहेर पडण्यासाठी खालील बाजूला मार्गिका असते. या वाटेने [[वायू]]चा झोत वेगाने बाहेर पडतो. या दाबाची प्रतिक्रिया अग्निबाणाला विरुध्द दिशेने फेकते. ज्वलनातून उत्पन्न झालेल्या ऊष्ण वायूंच्या झोतानेच अग्निबाण पुढे जातो. अग्निबाणाला असलेल्या खास पंखांमुळे त्याची [[दिशा नियंत्रण|दिशा नियंत्रित]] केली जाते.
"https://mr.wikipedia.org/wiki/अग्निबाण" पासून हुडकले