विक्रमशिला विद्यापीठ

विक्रमशिला विद्यापीठ हे प्राचीन भारतातील पाल साम्राज्यात असलेले एक बौद्ध शिक्षणकेंद्र होते. नालंदा विद्यापीठाप्रमाणेच येथेही अनेक देशांतून विद्यार्थी अध्ययनासाठी येत असत. विक्रमशिला विद्यापीठ हे रसायनशास्त्र, रसशास्त्र आणि आयुर्वेद याचे फार मोठे केंद्र होते विक्रमशिला विद्यापीठ हे आजच्या बिहारमधील भागलपूरजवळ येथे होते धर्मपालन नावाच्या राजाने या विद्यापीठाची स्थापना इसवी सनाच्या आठव्या शतकामध्ये केली या ठिकाणी सहा विहार होते प्रत्येक विहाराचे प्रवेशद्वार स्वतंत्र होते.[]

विक्रमशिला विद्यापीठाचे भग्नावशेष
विक्रमशिला विद्यापीठ is located in बिहार
विक्रमशिला विद्यापीठ
विक्रमशिला विद्यापीठ
विक्रमशिला विद्यापीठाचे बिहारच्या नकाशावरील स्थान

पार्श्वभूमी

संपादन

विक्रमशिला विद्यापीठ हे सध्याच्या बिहार राज्याच्या भागलपूर जिल्ह्यात भागलपूरपासून पूर्वेला ५० कि.मी. अंतरावर असणाऱ्या अंतीचक येथे होते. पाल घराण्यातील राजा धर्मपाल याने नवव्या शतकाच्या सुरुवातीला विक्रमशिला विहाराची स्थापना केली. हाच विहार पुढे ‘विक्रमशिला विद्यापीठ’ या नावाने प्रसिद्ध झाला. धर्मपालाचे दुसरे नाव विक्रमशील असल्यामुळे या विद्यापीठाचे नाव विक्रमशीला ठेवण्यात आले. रत्नाकरशांती, वागीश्वरकीर्ती, भट्टारक नरोत्पल, प्रज्ञाकरमती, रत्नवज्र, ज्ञानश्रीमित्र हे विद्वान पंडित या विद्यापीठात अध्यापनकार्य करीत होते. विक्रमशिला विद्यापीठाच्या मध्यभागी महाबोधीची कलाकृती असलेले देवालयहोते. येथे एक विशाल सभाभवन होते. त्यात एका वेळी आठ हजार व्यक्तींची बसण्याची सोय होती. प्रवेशद्वारात उजव्या बाजूस नालंदा विद्यापीठाचे प्रमुख आचार्य नागार्जुनाचे चित्र होते, तर डाव्या बाजूस याच विद्यापीठाचे प्रमुख अतीश दीपंकराचे चित्र होते. विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार बंद झाल्यावर येणाऱ्यांसाठी या प्रवेशद्वाराबाहेर एक धर्मशाळा होती. विद्यार्थ्यांची येथे विनामूल्य निवासभोजनाची व्यवस्था असे.

इ.स. ११९३ साली बख्तियार खिलजी या तुर्की आक्रमकाने विक्रमशिला विद्यापीठ पूर्णपणे उध्वस्त केले.[].

उत्खनन

संपादन

विक्रमशिला विद्यापीठ ज्या ठिकाणी होते तिथे सर्वप्रथम पाटणा विद्यापीठातर्फे इ.स. १९६० ते इ.स. १९६९पर्यंत आणि त्यानंतर भारतीय पुरातत्त्व खात्याच्या वतीने इ.स. १९७२ ते इ.स. १९८२पर्यंत उत्खनन केले गेल्यामुळे विक्रमशिला विद्यापीठाबाबतच्या अनेक गोष्टी उजेडात आल्या. या विद्यापीठाभोवती नऊ फूट उंचीची भिंत होती.

चित्रदालन

संपादन

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ रमेश भिडे. "प्राचीन भारतीय विद्यापीठे". ३० ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ स्कॉट, डेव्हिड. बुद्धिझम अँड इस्लाम:पास्ट टु प्रेझेंट एनकाउंटर्स अँड इंटरफेथ लेसन्स (इंग्रजी भाषेत). १७ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)