विकिपीडिया:मासिक सदर/फेब्रुवारी २००९

मुखपृष्ठ सदर लेख
बराक ओबामा
बराक ओबामा

बराक हुसेन ओबामा (जन्म: ऑगस्ट ४, १९६१) हे अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष आहेत. अमेरिकेचे ४४ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी जानेवारी २०, २००९ रोजी पदग्रहण केले. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेल्या ओबामांनी नोव्हेंबर ४, २००८ रोजी झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार सेनेटर जॉन मॅककेन ह्यांचा ३६५ विरुद्ध १६५ मतांनी पराभव केला. ओबामा हे अमेरिकेचे पहिले आफ्रिकन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी ते इलिनॉय ह्या राज्यामधून अमेरिकेचे सेनेटर होते. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदासाठी त्यांनी सेनेटर जोसेफ बायडेन ह्यांची निवड केली आहे. ओबामा हे अमेरिकेच्या शिकागो ह्या शहराचे निवासी आहेत.

बराक ओबामांचा जन्म अमेरिकेच्या हवाई राज्यातील होनोलुलु ह्या शहरात झाला. त्यांचे वडील बराक ओबामा सिनियर हे केन्या ह्या देशाचे नागरीक होते आणि त्यांची आई ऍन डनहम ही अमेरिकेच्या कॅन्सस ह्या राज्यातली होती. ओबामांचे प्राथमिक शिक्षण इंडोनेशिया ह्या देशातील जकार्तामध्ये झाले. ते १० वर्षाचे असताना हवाईला परतले आणि त्यानंतर त्यांच्या आजी-आजोबांनी त्यांना वाढवले.

पुढे वाचा...