विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ३१
जिमी वेल्स भारतात
संपादनमी जुलैमध्ये जिमी वेल्सशी भेटलो असताना त्यांनी ऑक्टोबरअखेर ते भारतात जाणार असल्याचे सांगितले होते. ते लक्षात ठेवून अनेक सदस्यांनी येथे तसेच माझ्या इमेलवर याबद्दल विचारणा केली होती.
श्री वेल्सना याची आठवण केल्यावर त्यांनी मला संदेश पाठविला आहे की ते ऑक्टोबर ३१च्या सुमारास मुंबईत असणार आहेत. सध्यातरी इतर शहरांत जाण्याचा त्यांचा बेत नाही. भारतातील विकिपीडियाच्या निदेशक बिशाखा दत्त यांनी या भेटीबद्दल अधिक माहिती देण्याचे कबूल केले आहे तसेच जमल्यास मराठी विकिपीडियन्सची श्री वेल्स यांच्याशी गाठ घालून देण्याचा प्रयत्नही त्या करतील. मी या सुमारास भारतात नसेन पण बिशाखा माहितगार व इतर काही विकिपीडियन्सच्या मार्फत या भेटीबद्दलचा अधिक तपशील कळवतील. अर्थात मला जिमीकडून काही कळल्यास मी येथे संदेश टाकेनच.
आशा आहे संधी मिळाल्यास खूप मराठी विकिपीडियन जिमीशी भेटून त्यांना आपला उत्साह दाखवून देतील.
अभय नातू ०५:१३, १९ ऑक्टोबर २०१० (UTC)
मुंबई भेट व खुले चर्चासत्र
संपादनबिशाखा दत्त यांजकडून --
Wikipedia is a vital, free resource used by millions of people all over the world, including in India. This ubiquitous information repository includes hundreds of thousands of articles in various Indian languages, covering myriad of topics about India and its culture. Although Wikipedia is an indispensable resource to millions, little is known about how this online encyclopedia is written and who it is written by. This Sunday, October 31 at 6:30pm, anyone who is interested in learning more about this global public resource is invited to “Meet the Movement:” a talk with Jimmy Wales and members of the Wikimedia community in India. This talk is an opportunity to learn more about how Wikipedia works and why participation from the people of India is integral to Wikimedia’s global free-knowledge movement.
The iconic leader, who founded Wikipedia in 2001, will give a public talk about the history of Wikipedia and what the free knowledge movement means to India. For instance, 75 percent of all schools in India have either online or offline access to Wikipedia and Wiktionary, a sister project. Additionally, 94 percent of page views from India are for the English Wikipedia, rather than Indian languages. What does that mean about the importance of Wikipedia in India and the needs of Indian users? Wales will discuss this during his talk and members of Wikimedia India, as well as Wikimedia Foundation Board member, Bishakha Datta, will join Wales for a 30 minute open question and answer session with the audience.
तारीख: रविवार, ऑक्टोबर ३१, २०१० वेळ: संध्याकाळी ६.३० स्थळ: सोफिया भाभा हॉल, सोफिया कॉलेज, भुलाभाई देसाई रोड, ब्रीच कँडी, मुंबई, ४०० ०२६
This talk is open to the public on a first-come-first-seated basis.
For more information, please visit http://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:Meetup/Mumbai/Mumbai3
तपशील
संपादनया चर्चासत्राला आपल्यापैकी कोणी गेले होते का? गेले असल्यास कृपया त्याचा तपशील येथे द्यावा.
अभय नातू १७:३२, ६ नोव्हेंबर २०१० (UTC)
गव्हर्नर, राज्यपाल
संपादनअमेरिकेतील राज्यांच्या मुख्याधिकार्याला गव्हर्नर हे पद असते. भारतातील राज्यपालांनाही इंग्लिशमध्ये गव्हर्नर म्हणतात. असे असले तरीही दोन्ही पदांचे काम व अधिकार अगदी वेगवेगळे आहेत.
भारतातील राज्यपालांना सहसा नाममात्र अधिकार असतात. जेव्हा विधानसभा बरखास्त होते किंवा सरकार संकटात आले तरच त्यांचे अधिकार चलनात येतात. हे राज्याच्या दैनंदिन कारभारात दखल देत नाहीत.
अमेरिकन गव्हर्नर हा भारतातील मुख्यमंत्र्यासमान किंवा एखाद्या कंपनीच्या मुख्याधिर्यासमान (सी.ई.ओ.) असतो व राज्याचा दैनंदिन कारभार बघतो.
तरी या दोन्हींमध्ये गोंधळ होऊ नये म्हणून अमेरिकेतील गव्हर्नरांचा गव्हर्नर (किंवा अधिक चपखल शब्दाने) असाच उल्लेख करावा.
अभय नातू १६:४४, ३ नोव्हेंबर २०१० (UTC)
अब्यूझफिल्टर (Extension:AbuseFilter)
संपादननमस्कार!
बर्याच विकिपीडियांवर उत्पात/तत्सम सदोष संपादनांवर तोडगा म्हणून Extension:AbuseFilter या मीडियाविकी पुरवणीचा वापर केला जातो. त्याला मराठी विकिपीडियावर कसे बसवावे, याबद्दल कुणाला तांत्रिक माहिती/अनुभव आहे का?
मराठी विकिपीडियावरही आपण ही पुरवणी बसवून सक्षम करायला हवी, असे माझे मत आहे. हिंदी विकिपीडियावर त्यांनी या सुविधेचा उपयोग केला व त्याचा त्यांना समाधानकारक अनुभव आला आहे असे हिंदी विकिपीडिया चावडीवरील चर्चेतून दिसते. त्यांच्याकडे या पुरवणीअंतर्गत सध्या ६४ हालचालींसाठी फिल्टर लावले आहेत. त्यांपैकी बरेचसे आपल्यालाही उपयोगी पडतील, असे वाटते.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:०५, ५ नोव्हेंबर २०१० (UTC)
नव्या एक्स्टेन्शनांच्या स्थापनांसाठी कौल
संपादनमराठी विकिपीडियाच्या प्रगतीसाठी आणि विस्तार-सिद्धतेसाठी काही नव्या मीडियाविकी एक्स्टेन्शनांची स्थापना (इन्स्टॉलेशन) करण्याचा प्रस्ताव मी विकिपीडिया:कौल#नव्या एक्स्टेन्शनांची स्थापना येथे मांडला आहे. सर्व मराठी विकिपीडिया सदस्यांनी आपला प्रस्तावागणिक कौल त्याच पानावर द्यावा, अशी सादर विनंती!
धन्यवाद.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १०:३४, ६ नोव्हेंबर २०१० (UTC)
नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये मराठी विकिपीडिया बैठक?
संपादननमस्कार,
मी नोव्हेंबर १५-डिसेंबर १२ दरम्यान भारतास भेट देणार आहे. त्या सुमारास मराठी विकिपीडियाची एखादी बैठकीचा बेत आहे काय? असल्यास मला तुम्हा सर्वांस भेटण्यास अत्यंत आवडेल. मी मुख्यत्वे पुण्यात असणार आहे व कदाचित एक दिवस मुंबईत बिशाखा दत्तना भेटण्यास जाईन.
जर भेटीचा बेत असला किंवा करता आला तर कळवावे.
अभय नातू १७:३५, ६ नोव्हेंबर २०१० (UTC)
- नमस्कार मी २७ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर या काळादरम्यान पुण्यात असेन. २-३ दिवसांचा अपवाद वगळता मी पुण्यातच असल्याने, मलाही अशी एखादी बैठक (किंवा अधिक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम - एखादे विकि-सेशन/ विकिअकादमी) ठरल्यास उपस्थित राहणे आवडेल.
- अन्य मंडळींचे काय मत ?
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १८:११, ६ नोव्हेंबर २०१० (UTC)
नमस्कार,
रविवार, नोव्हेंबर २८ रोजी नवी मुंबईत होणार्या इंग्लिश विकिपीडिया बैठकीस मी उपस्थित राहणार आहे. तेथे भेटीची तसेच पुढील बैठकीची संधी साधता आली तर आनंद होईल.
अभय नातू १०:३९, २२ नोव्हेंबर २०१० (UTC)
- मी हा संदेश या बैठकीतून लिहीत आहे.
- अभय नातू १२:०५, २८ नोव्हेंबर २०१० (UTC)
११/११/१०
संपादननमस्कार मंडळी,
आज तारीख ११/११/१० होती. काही महिन्या/वर्षांपूर्वी आपण एक संकल्प सोडला होता की ११/११/११ या तारखेला मराठी विकिपीडियाची लेखसंख्या १,११,१११ इतकी व्हावी. आजतगायत त्यातील ३१,५२१ लेख तयार आहेत म्हणजेच एका वर्षात अजून ७९,५९० लेख लिहायचे आहेत.
तरी या कामाला नवीन जोमाने लागूया!!!!
अभय नातू ०५:०५, १२ नोव्हेंबर २०१० (UTC)
- लक्ष्य सोपे नाही,तरीपणे गरजेचे आहे अर्थात लक्ष्य गाठण्याकरिता निव्वळ रिकाम्या पानांची निर्मिती करू नये, प्रत्येक लेखात किमान एक परिच्छेद लेखन हवेच हे लक्षात घ्यावे शुभेच्छा
लघुपथ
संपादन- प्रकल्प आणि सहाय्य पानांकरिता वापरले जाणारे विकिपीडिया: नामविश्वास आता विपी: हे लघुरूप उपलब्ध झाले आहे यामुळे प्रकल्प आणि सहाय्य पानांकरिता लघुपथ नावांची निर्मिती सोपी होईल. या दॄष्टीने अधिक माहिती देणारे विकिपीडिया:लघुपथ सहाय्य पानाचे भाषांतरात सहाय्य हवे आहे.माहितगार ११:०६, १४ नोव्हेंबर २०१० (UTC)
अॅ की ऍ
संपादनविकिपीडियावरील बर्याच लेखांमध्ये अॅ ऐवजी ऍ हे अक्षर आढळते. यापैकी नकी कोणते बरोबर व कोणते चूक आहे?
वि. आदित्य (चर्चा) १३:१६, २८ नोव्हेंबर २०१० (UTC)
- अॅ च बरोबर आहे अगदी अलिकडे पर्यंत अॅ टंकीत करण्याची सुविधा मराठी विकिपीडियावर उपलब्ध केलेल्या टंकनात उपलब्ध नव्हती.काही लोक इतरही टंकन प्रणाली वापरतात त्यातील काहीत अजूनही अॅ उपलब्ध नाही . या पुढे अॅ च वापरावयाचे आहे , पण एका अक्षरा करिता लोक वापरत असलेल्या प्रणाली त्यांना वापरू नका सांगणे अन्यायकारक ठरेल बॉट सारख्या स्वयमेव चालणार्या सुविधा वापरून ऍ चे अॅ करून हवे आहे.माहितगार १५:०३, २८ नोव्हेंबर २०१० (UTC)
- जर दोन-तीन आठवड्यात (मी परत कॉलोराडो स्प्रिंग्जला गेल्यावर) मी हे काम माझ्या सांगकाम्याकरवे करवून घेईन. तत्पूर्वी कोणी केल्यास आनंदच आहे.
- अभय नातू ०७:२४, २९ नोव्हेंबर २०१० (UTC)
माझे मत शंका सूचना सहाय्य विनंती
संपादन- मि रविन्द्र पाटिल माजे वडील लेखक आहे तरि आथिक कारना ने विकसित होऊ शकले नाहि
तरि त्यानि लिहलेले नाटक व लेख प्रकाशित करन्यास योग्य ते मारग दर्शन करावे हि विनति.
आपला आभारी रविन्द्र विलासराव पाटिल औरगाबाद मो.९९२२९३७१५५ नमस्कार , रविंद्र पाटील प्रथमतः आपण हे लक्षात घ्याकी पुस्तकस्वरूपात प्रकाशन संदर्भात मार्गदर्शन मिळण्याचे हे योग्य ठिकाण नाही, आपण आपल्या वडीलांचे लेखन प्रताशिकार (कॉपीराईट सुरक्षीत ठेऊन इंटरनेटच्या माध्यमातून प्रकाशित करू इच्छित असाल तर इतर मराठी संकेतस्थळे पाहून यथा योग्य निर्णय घ्यावा.
आपण वडिलांच्या लेखी पूर्वपरवानगीने वडिलांचे साहित्य प्रताधिकार मुक्त कॉपी राईट फ्री स्वरूपात मराठी विकिपीडियावर जरी नाही तरी विकिस्रोत या सहप्रकल्पात प्रसिद्ध करू शकता माहितगार २०:४६, ४ डिसेंबर २०१० (UTC)
विकिपीडियावर व्याख्यान - १०.१२.२०१०
संपादनआज अचानकपणे मला कम्प्युटर अँड मिडीया डीलर्स असोसियेशनच्या चर्चासत्रात विकिपीडियावर व्याख्यान देण्याची संधी मिळाली आहे. यास आपणास उपस्थित राहता आले तर अतिआनंद होईल.
स्थळ - मॅरियट होटेल, सेनापती बापट रस्ता, पुणे
वेळ - १० डिसेंबर, २०१०, संध्याकाळी ५.०० ते ६.००
विषय - विकिपीडिया (इंग्लिश व मराठी)
अभय नातू ०७:३२, १० डिसेंबर २०१० (UTC)
अर्थ सांगा
संपादनविकिपीडियाच्या 'दिवाळी अंक' या पानावर खाली दिलेला मजकूर आहे. त्याचा अर्थ कुणी सांगू शकेल का? ज्याने मजकूर टाकला आहे त्यानेही प्रयत्न करायला हरकत नाही. मजकूर असा आहे : "जीथे शब्दाचे दोन अर्थ संभवतात अशा दिवाळी अंकाचा स्वतंत्र लेख बनवायचा असेल तर नियमीत प्रकाशनांच्या कंसात नियतकालीक वार्षीक दिवाळी अंक किंवा विशेषांक ऑनलाईन असे स्पष्ट नमुद करावे कंसात द्यावे." कुठल्याही भाषेतील जवळजवळ प्रत्येक शब्दाला एकाहून अधिक अर्थ असतात; अशा परिस्थितीत जिथे दोन अर्थ संभवतात या विधानाचा काय मतलब? आणि त्या दुहेरी अर्थाच्या शब्दाचा दिवाळी अंकाशी काय संबंध येतो? जो दिवाळी अंक ठरावीक काळाने प्रसिद्ध होत नाही किंवा फक्त एकदा निघून परत कधीही निघत नाही तो सोडून बाकी सर्व दिवाळी अंक नियतकालिकेच असतात. मग कुणाच्या कंसात नियतकालिक लिहायचे? -- J १८:३८, ११ डिसेंबर २०१० (UTC)
- चूक नजरेस आणल्या बद्दल धन्यवाद, काही बदल केला आहे आणि अजून काही सुधारणा असतील तर स्वागतच आहे.माहितगार १९:४७, ११ डिसेंबर २०१० (UTC)
कालगणना
संपादनविकिपीडियाच्या काही पानांवर काललेखनात हिंदू पचांगांचे शक आढळले. त्यावरून विकिपीडियाचे कॅलेंडर वापरण्याबाबत काय धोरण आहे असा प्रश्न पडला. कुणी माहिती देऊ शकल्यास, निर्देशित करू शकल्यास उत्तम.मस्त ०५:२३, १४ डिसेंबर २०१० (UTC)
अपेक्षित वापर
संपादनअधिक प्रचलित असलेल्या ग्रेगोरियन कालगणनेखेरीज (म्हणजे १४ डिसेंबर इ.स. २०१० वगैरे दिनांकांप्रमाणे) अन्य कालगणनांची पाने विकिपीडियावर बनवता येतात. उदा., शालिवाहन शकपद्धतीनुसार शा.श. १९०० वगैरे पाने बनवता येऊ शकतात. मासांतर्गत तिथीची पाने अगोदरच विकिपीडियावर बनवलेली आहेत. त्यात त्या-त्या तिथीला एखाद्या शालिवाहन शकात कुणा उल्लेखनीय व्यक्तीचा जन्म/मृत्यू झाला असल्यास अथवा अन्य काही उल्लेखनीय घटना झाली असल्यास तो नोंदवणे अपेक्षित आहे (१४ डिसेंबर या पानाच्या धर्तीवर).
शालिवाहन शक कालगणनेशिवाय अन्य कालगणनांची पानेदेखील विकिपीडियावर बनवता येतील - उदाहरणार्थ बुद्ध शक, हिजरी सन. त्या-त्या कालगणनेतील पानांची मांडणी व स्वरूप ग्रेगोरियन कालगणनेतील पानांनुसार करावे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०५:४३, १४ डिसेंबर २०१० (UTC)
ग्रेगोरियन कालगणना व इतर शकांशी त्याचे link-up कशा प्रकारे आहे त्याचेपण वर्णन करणारा लेखपण असल्यास उत्तम.त्यायोगे एखाद्या तिथी वा तारखेवरुन त्या शकातील कालगणनेवर पोचण्यास मदत होईल(and vice-versa) असा यामागचा माझा विचार आहे. वि. नरसीकर (चर्चा) ०५:५१, १४ डिसेंबर २०१० (UTC)
सांख्यिकी : मराठीकरण
संपादनविकिपीडियातील सांख्यिकीमधील इंग्रजीचे मराठीत भाषअंतर करता येईल का? वि. आदित्य (चर्चा | योगदान) १५:१४, १७ डिसेंबर २०१० (UTC)
होय.
वि. आदित्य (चर्चा | योगदान) ०६:४४, २४ डिसेंबर २०१० (UTC)
मिडीयाविकि सॉफ्टवेअरच्या इतर भाषात भाषांतरणाचे काम ट्रांस्लेट विकित होते आपण स्वतःही या भाषांतरात सहभाग घेतलात तर स्वागतच आहे माहितगार १७:४५, ३ जानेवारी २०११ (UTC)
भाषांतर
संपादनमराठी विकिपीडियावर अंदाजे ३७८ लेख (मुख्यत्वे) हिंदी व इंग्लिशमधून भाषांतराची वाट पहात आहेत. आपण आपल्यालाच एक मानक दिला आहे की दोन टक्क्यांपेक्षा जास्त लेख इतर भाषांतून असू नयेत. त्यासंदर्भत आत्ता जवळपास १.२ टक्के लेख असे आहेत.
असे लेख भाषांतर व त्याच्या उपवर्गांत सापडतील.
अभय नातू १३:४६, १९ डिसेंबर २०१० (UTC)