वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग
पश्चिम रेल्वेच्या वसई रोड ते मध्य रेल्वेच्या रोहा दरम्यान रोहा-पनवेल-दिवा-वसई मार्ग जातो. या मार्गावर एकूण २३ स्थानके असून भिवंडी रोड, पेण, पनवेल आणि दिवा जंक्शन यांसारखी महत्त्वाची स्थानके या मार्गावर आहेत. या मार्गावर दिवा-वसई, पनवेल-डहाणू, दिवा-रोहा, वसई-पनवेल, पेण-दिवा, बोईसर-दिवा अशा डेमू अथवा मेमू धावतात.