वर्ग चर्चा:ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ मूळ कार्यक्रम

मूळ कार्यक्रम

संपादन

@संतोष गोरे आणि Dharmadhyaksha:,

Original programming साठी मूळ कार्यक्रम पेक्षा अधिक चपखल शब्द (आणि शिवाय सोपा) काय असू शकेल -- स्वतःचे? अभिजात?

अभय नातू (चर्चा) ०२:१४, २७ ऑगस्ट २०२४ (IST)Reply

इथे अभिजात हा शब्द अधिक चपखल बसतो.- संतोष गोरे ( 💬 ) ०८:२२, २७ ऑगस्ट २०२४ (IST)Reply
माझ्या मते मूळच ठीक आहे. "अभिजात" (जसे की अभिजात भाषा) हे ह्या कार्यक्रमांसाठी जरा उच्च स्तराचे विशेषण झाले. वेगळे उदाहरण घेतले तर आपण en:Academy Award for Best Original Screenplay साठी काय वापरणार? फारतर "स्वतःचे" चालेल. धर्माध्यक्ष (चर्चा) ०८:५९, २७ ऑगस्ट २०२४ (IST)Reply
मूळचा अर्थ एकमेव किंवा स्रोत असाही होतो, ते येथे बरोबर नाही. स्वतःचे किंवा इतर स्रोत नसलेले यासाठी शब्द पाहिजे. --अभय नातू (चर्चा) ११:०४, २७ ऑगस्ट २०२४ (IST)Reply
खरतर फक्त वर्ग:ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ कार्यक्रम एवढे पण नाव चालेल. ॲमेझॉन मध्ये परत काही वेगळे "रुपांतरीत" कार्यक्रमाच्या वर्गाची गरज नाही. (अगदी वर्ग:झी मराठी दूरचित्रवाहिनी मालिका सारखे). पण ऑस्कर मध्ये मात्र वर्ग:ऑस्कर पुरस्कार विजेते स्वतःची पटकथा आणि वर्ग:ऑस्कर पुरस्कार विजेते रुपांतरित पटकथा असे करता येईल. धर्माध्यक्ष (चर्चा) १६:१५, २७ ऑगस्ट २०२४ (IST)Reply
खरतर फक्त वर्ग:ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ कार्यक्रम एवढे पण नाव चालेल.
हे पटते. @संतोष गोरे:?
अभय नातू (चर्चा) २२:१३, २७ ऑगस्ट २०२४ (IST)Reply
@Dharmadhyaksha आणि @अभय नातू नाही चालणार, कारण या वाहिनीवर इतरत्र कोठेही पूर्वी प्रसारित न झालेले कार्यक्रम दाखवले जातात. सबब orignal program या शब्दाला वगळणे योग्य होणार नाही. याला पर्यायी मराठी शब्द देणे भाग आहे.
हे पहा - संतोष गोरे ( 💬 ) ००:११, २८ ऑगस्ट २०२४ (IST)Reply
वर्ग:ॲमेझॉन प्राइम व्हिडीओचे कार्यक्रम आणि वर्ग:ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवरील कार्यक्रम ? -- अभय नातू (चर्चा) ०१:१४, २८ ऑगस्ट २०२४ (IST)Reply
@संतोष गोरे: ॲमेझॉनवर इतर पण चित्रपट किंवा सिरीज आहेत ज्या मुळतः ॲमेझॉनने बनवल्या नाही. (जसे en:Sherlock (TV series) जे आधी बीबीसीवर प्रसारीत झाले आहे किंवा en:Notting Hill (film) जो चित्रपटगृहांमध्ये किंवा सीडी/डीव्हीडी वर आधी आला आहे. हे आता आपण प्राइमवर बघू शकतो. पण ह्यांचे वर्गीकरण ॲमेझॉन प्राइमच्या संबंधीत कसेच होणार नाही. म्हणून "मूळ", "स्वतःचे", "अभिजात" अशी माहिती वर्गाच्या नावात टाकायची गरज नाही. धर्माध्यक्ष (चर्चा) ०९:२८, २८ ऑगस्ट २०२४ (IST)Reply
माफ करा इथे आपल्या दोघांची देखील थोडीशी गफलत झालीय. दुरुस्ती करून असे वाचावे नाही चालणार, कारण या वाहिनीवर इतरत्र कोठेही पूर्वी प्रसारित न झालेले कार्यक्रम दाखवले जातात, अशा कार्यक्रमांचा हा वर्ग आहे. सबब orignal program या शब्दाला वगळणे योग्य होणार नाही. याला पर्यायी मराठी शब्द देणे भाग आहे. en:Category:Amazon Prime Video original programming या इंग्रजी वर्गात सुरुवातीला तशी नोंद देखील आहे. तुम्ही जो en:Sherlock (TV series) लेखाचा दाखला दिलाय, तो लेख Category:Amazon Prime Video original programming मध्ये मोडत नाही. आपण तपासून पहावे. असो. मराठी विपी वर वर्ग:ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ असा वर्ग करून त्याला Category:Amazon (company) चा आंतरविकी दुवा जोडावा आणि यात इंग्रजी विपी प्रमाणे उपवर्ग सध्या तरी करू नये असे मला वाटते. - संतोष गोरे ( 💬 ) १९:४२, २८ ऑगस्ट २०२४ (IST)Reply
मला वाटते दोन वर्ग हवेत हे आपण तिघेही म्हणत आहोत -- १. प्राइमने निर्माण केलेले/करवलेले, २. प्राइमवर प्रसारित झालेले.
यांतील (१) साठी योग्य शब्द पाहिजे.
(१)चे ही अधिक उपवर्ग होऊ शकतात -- १.१ प्राइमने स्वतः निर्माण केलेले १.२ प्राइमसाठी तिऱ्हाइत कंपनीने निर्माण केलेले १.३ तिऱ्हाइत कंपनीच्या निर्माणाचे हक्क प्राइमने विकत घेतलेले. पण सध्या (१) आणि (२) कडे लक्ष देउयात.
अभय नातू (चर्चा) २१:४८, २८ ऑगस्ट २०२४ (IST)Reply

──────────────────────────────────────────────────────────────────────────────────────────────────── अभयने लिहीलेल्या वर्गांमधील मला वाटते की २ क्र. च्या वर्गाची गरज नाही. फक्त प्रसारण करणे हे उल्लेखनीय काम नाही. (सोनी टीव्ही वर प्रसारीत चित्रपटांचे आपण वर्ग करत नाही, पण मालिकांचे करतो कारण त्या सोनीने किंवा सोनीसाठीच बनवल्या असतात). म्हणुनच मी वर उदाहरण दिलेल्या दोन्ही चित्रपट/मालिका ह्या प्राइमच्या वर्गात येत नाही. आपण फक्त १ क्र. च्या वर्गावर चर्चा करावी.
१ चे अनेक उप-वर्ग होऊ शकतात. पण मला असे वाटते की आपण पालक-वर्गाचे नाव "वर्ग:ॲमेझॉन प्राइम व्हिडीओचे कार्यक्रम" किंवा "वर्ग:ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवरील कार्यक्रम" यात स्थानांतरीत करावे. धर्माध्यक्ष (चर्चा) १६:१९, ३० ऑगस्ट २०२४ (IST)Reply

"ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ मूळ कार्यक्रम" पानाकडे परत चला.