अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालिलप्रमाणे ठरवलेले आहेत.[१]

  • भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे
  • भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे
  • भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावेत
  • प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा

हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या-त्या राज्याला भरीव अनुदान मिळते.

अभिजात भाषांची यादी संपादन

भारत सरकारने आतापर्यंत तमिळ, संस्कृत, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि ओडिआ या सहा भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.[२]

मराठी भाषेसाठी प्रयत्न संपादन

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी महाराष्ट्र सरकारने रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमून ५०० पानांचा अहवाल भारतीय केंद्र सरकारकडे सादर केला होता.[३]

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "अभिजात दर्जा म्हणजे काय रे भाऊ ?". News18 Lokmat. Archived from the original on 2018-02-16. 2018-05-08 रोजी पाहिले.
  2. ^ "उडिया भाषेला अभिजात भाषेचा दर्जा". Loksatta. 2014-02-21. 2018-05-08 रोजी पाहिले.
  3. ^ saamana.com. "मराठी भाषा आणि अभिजात दर्जा | Saamana (सामना)". www.saamana.com (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2018-04-30. 2018-05-08 रोजी पाहिले.