राजभाषा ही एखाद्या राज्य किंवा देशाची घोषित भाषा (अधिकृत भाषा) असते, जी सर्व राजकीय प्रायोजनात वापरली जाते.

भारतीय राज्यघटनेच्या कलम ३४३ नुसार देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी तसेच इंग्रजी या संघराज्याच्या कामकाजाच्या भाषा आहेत, तसेच भारतीय संविधानात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या २१ भाषांना 'राजभाषा' म्हणून मान्यता मिळाली आहे. संविधानाच्या आठव्या अनुसुचीमध्ये एकूण २२ भारतीय भाषांना हे स्थान प्राप्त झाले आहे. राज्यांच्या विधानसभा बहुमताच्या आधारावर कोणत्याही एका भाषेला किंवा हरकत नसेल तर एकापेक्षा अधिक भाषांना आपल्या राज्याची राज्यभाषा म्हणून घोषित करू शकतात.

राजभाषा ही शासकीय वापरासाठी घोषित केली जाते. जगातील १७८ देशांनी राजभाषा घोषित केल्या आहेत, त्यांतील १०१ देशांच्या एकापेक्षा जास्त राजभाषा आहेत. काही देशांनी राजभाषा घोषित केल्या नाहीत. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांना कोणतीही राजभाषा नाही, तरीही इंग्रजी भाषा ही कामकाजासाठी वापरली जाते.

हे सुद्धा पहा

संपादन