वर्ग चर्चा:इंग्रजी-मराठी भाषांतर हवे

ह्या वर्गातील लेखांबाबत धोरण संपादन

@V.narsikar, आर्या जोशी, सुबोध कुलकर्णी, अभय नातू, ज्ञानदा गद्रे-फडके, Pushkar ekbote, आणि Pooja jadhav:

  • ह्या वर्गातील अनेक लेख इंग्रजी मजकूर (बहुतांशवेळा इंग्रजी विकिवरून येथे आणलेला आहे) असे आहेत, त्याचे भाषांतर केले गेलेले नाही किंवा अर्धवट आहे.
  • माझ्यामते संपूर्ण इंग्रजी मजकूर दीर्घकाळ असलेले सर्व लेख वगळण्यात यावेत. आपले यावर काय मत आहे.
  • आणि काही लेखात भाषांतर अर्धवट आहे, ते सुधारण्याचे काम देण्यास काही वेळ देऊन त्यानंतर ते न झाल्यास वगळण्यात यावेत.
  • आपल्या सर्वांचे मत घेऊन त्यावर काम करता येईल. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! ०२:२९, ३० ऑगस्ट २०१८ (IST)Reply
सरसकट मजकूर वगळू नये. भाषांतर करणाऱ्यांना हाताशी मजकूर असल्यास अधिक उपयोगी ठरेल. भाषांतर कधी होईल याची काळजी न करता होईल हा विश्वास बाळगावा. मराठी विकिपीडिया या तत्त्वावरच वाढलेला आहे.
अपवाद वगळता असा इंग्लिश मजकूर दिसू नये. त्याला <!--- --> वापरुन कॉमेंटमध्ये झाकावा.
अभय नातू (चर्चा) १८:४९, ३० ऑगस्ट २०१८ (IST)Reply
@अभय नातू:
धन्यवाद, ही मजकूर लपविण्याची कल्पना भन्नाट आवडली, अर्थात हे इंग्रजीवरूनच इकडे आणले आहे त्यामुळे भाषांतर करणारे इंग्रजीचा स्त्रोत कधीही वापरू शकतात.
तरीही अशा प्रकारे मजकूर लपवून मी काही लेखांवर काम करीनच, इतरांनाही आवाहन करीन. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १९:२६, ३० ऑगस्ट २०१८ (IST)Reply
अभय नातूंनी उत्तर दिलेच आहे. मी हे अनेक दिवसांपासून करीत आहे. लगेच बघायचे तर पुस्तक हा लेख बघावा.मात्र त्या अशा लेखांतील {{भाषांतर}} साचा काढू नये, म्हणजे यात अभाषांतरीत मजकूर आहे हे लगेच कळते. धन्यवाद.असो.--वि. नरसीकर , (चर्चा) २०:३४, ३० ऑगस्ट २०१८ (IST)Reply
भाषांतर होईल कधीतरी असे आशावादी असणे मान्य आहे. पण असे अनेक अर्धवट लेख किती तरी काळ तसेच आहेत हेही वास्तव आहे. मला वाटते त्या त्या संपादकाने भाषांतर धूळपाटी तयार करून काम करावे. पूर्ण झाल्यावर मग तो मजकूर इथे आणावा. या पद्धतीबद्दल आपले काय मत आहे? -सुबोध कुलकर्णी (चर्चा) १६:५०, ३ सप्टेंबर २०१८ (IST)Reply
"इंग्रजी-मराठी भाषांतर हवे" पानाकडे परत चला.