वडियार घराणे
वडियार घराणे किंवा मैसूरचे वाडियार (लेखनभेद:वोडेयर किंवा ओडेयर कन्नड: ಒಡೆಯರು, ज्यांना असेही संबोधले जाते), हे भारताच्या सध्याच्या कर्नाटक राज्यातील मैसुरु संस्थानावर राज्य करणारे घराणे होते. हे घराणे या भागातील अर्स घराण्याला आपले पूर्वज मानतात.[१]
वडियार वोडेयर, ओडयार | |
---|---|
सध्याचे कुटुंबप्रमुख यदुवीर कृष्णदत्त चामराज वडियार | |
देश | भारत |
वांशिकता | भारतीय |
मूळ स्थान | मैसुरु |
स्थापना | 1399 |
स्थापक | यदुराय वडियार |
सध्याचे कुटुंबप्रमुख | यदुवीर कृष्णदत्त चामराज वडियार |
जयचामराज वडियार | |
खिताब | मैसुरुचे महाराज |
धर्म | हिंदू |
मैसूरचे महाराज म्हणून, वडियारांनी १३९९पासून १९५० पर्यंत म्हैसूर राज्यावर राज्य केले. या राजांनी आपल्या भाऊबंदांना आणि अर्स घराण्यातील व्यक्तींनाच आपले कारभारी, दिवाण, सल्लागार तसेच सैन्याधिकारीही केले होते.[१]
जहागिरदारी
संपादन१३९९ च्या सुमारास विजयनगरचा सम्राट दुसऱ्या हरिहरने यदुराय अर्सला मैसुरु आणि आसपासच्या प्रदेशाची जहागीर बहाल केली. त्यावेळी यदुरायाने राजा हे पद घेतले आणि वडियार (सरदार, मालक) असे आडनाव घेतले. त्याने आणि त्याच्या वारसांनी १५५३ पर्यंत विजयनगर साम्राज्याच्या अधिपत्याखाली या प्रदेशावर राज्य केले राज्य केले.
स्वतंत्र राज्य
संपादन१५६५मध्ये मध्ये दख्खनी सल्तनतींनी विजयनगर साम्राज्याचा पराभव करून राजधानी हंपी आणि इतर प्रदेशाचा नाश केला. त्यावेळी यदुरायाचा पणतू दुसरा तिम्मराजा वडियारने मैसुरुला स्वतंत्र राज्य असल्याचे जाहीर केले. तिम्मराजाचा पुतण्या राज वोडेयार पहिला याने राज्याच्या सीमांचा विस्तार केला. १६१०मध्ये त्याने आपली राजधानी मैसुरु पासूनन कावेरी नदीवरील श्रीरंगपट्टण बेटावर हलवली. याचा चुलत भाऊ आणि उत्तराधिकारी कांतिरव नरसराज पहिला याने राज्याच्या सीमांचा विस्तार थेट सध्याच्या तमिळनाडूमधील त्रिचीपर्यंत केला. कांतिरवाचा पुतण्या चिक्कदेवराज तथा देवराजा वोडेयार दुसरा याच्या सत्ताकालात मैसुरुच्या राज्याच्या सीमा सर्वाधिक विस्तारलेल्या होत्या. याने आपल्या राज्याला १८ प्रशासकीय विभागांमध्ये (चावडी) विभाजित करून कर आकारणीची सुसंगत प्रणाली सुरू केली.
सल्तनत
संपादनकालांतराने दख्खनी सुलतानांनी वडियारांचा पराभव करून हे राज्य आपल्या आधीन करून घेतले. १७६० ते १७९९ दरम्यान वडियार घराण्याचे राजे नावापुरते असून वास्तविक सत्ता सेनापती आणि नंतर स्वयंघोषित सुलतान, हैदरअली आणि त्याचा मुलगा आणि उत्तराधिकारी टिपू यांच्या हातात होती. या दोघांनी, श्रीरंगपट्टणातून आक्रमकपणे राज्याचा विस्तार केला.
इंग्रजांचे सामंत
संपादन१७९९ मध्ये चौथ्या इंग्रज-मैसूर युद्धातील श्रीरंगपट्टणाच्या लढाईत इंग्रजांनी टिपू सुलतानला हरविले व नंतर फाशी दिले. त्यानंतर त्यांनी वाडियारांना आपले सामंत म्हणून पुन्हा सत्तेवर बसविले. सत्ता व करवसुली इंग्रजांनी स्वतःकडेच ठेवली आणि राजाला इंग्लंडच्या सम्राटाचे पगारी नोकर केले. याचबरोबर संस्थानाची राजधानी मैसुरुला परत नेण्यात आली. यावेळी शेवटचा वडियार राजा नववा चामराज वडियार याचा चार वर्षांचा मुलगा तिसरा कृष्णराज वडियार याला राजेपदी बसविण्यात आले.
राज्याचे विघटन
संपादनभारताला स्वातंत्र्य मिळून प्रजासत्ताकची स्थापना झाल्यावर १९५०-५६ दरम्यान जयचामराजेंद्र वडियार हे राजप्रमुख होते. १९५६मध्ये भाषिक आधारावर भारतीय राज्यांची पुनर्रचना झाल्यानंतर त्यांना एकत्रित मैसूर राज्याचे (सध्याचे कर्नाटक राज्य) राज्यपाल केले गेले. हे या पदावर १९६४ पर्यंत होते. त्यानंतर दोन वर्षे ते मद्रासचे (आताचे तमिळनाडू) राज्यपाल होते.
वंशावळ
संपादनयदुराय आणि त्याचे थेट वंशज
संपादन- यदुराय वडियार
- पहिला चामराज वडियार
- पहिला तिम्मराज वडियार
- दुसरा चामराज वडियार
- तिसरा चामराज वडियार
- दुसरा तिम्मराज वडियार
- चौथा चामराज वडियार
- पाचवा चामराज वडियार
- पहिला राज वडियार
- सहावा चामराज वडियार
- दुसरा राज वडियार
- पहिला नरसराज वडियार
- पहिला देवराज वडियार
- दुसरा देवराज वडियार
- दुसरा नरसराज वडियार
- पहिला कृष्णराज वडियार
बेट्टादा कोटे पाती
संपादन१९. नंजराज वडियार
२३. दहावा चामराज वडियार (चामराजेंद्र, मद्दुर पाती)
२६. श्रीकांतदत्त नरसिंहराज वडियार
२७. यदुवीर कृष्णदत्त वडियार (सद्य)
संदर्भ
संपादन- ^ a b S, Rajaram N. (2019-01-12). The Vanished Raj A Memoir of Princely India (इंग्रजी भाषेत). Prism Books Private Limited. ISBN 978-93-88478-11-3. चुका उधृत करा: अवैध
<ref>
tag; नाव ":0" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे