म्हैसूरचे राज्य (मराठी नामभेद: म्हैसूर संस्थान ; कन्नड: ಮೈಸೂರು ಸಂಸ್ಥಾನ , मैसुरू संस्थान ; इंग्लिश: Kingdom of Mysore, किंग्डम ऑफ मायसोर) हे दक्षिण भारतातील एक राज्य होते.

म्हैसूरचे राजतंत्र/
म्हैसूर संस्थान

ಮೈಸೂರು ಸಂಸ್ಥಾನ
इ.स. १३९९इ.स. १९४७
ध्वज चिन्ह
राजधानी म्हैसूर, श्रीरंगपट्टण
शासनप्रकार राजतंत्र
राष्ट्रप्रमुख पहिला राजा: यदुराय (इ.स. १३९९-१४२३)
अंतिम राजा: जयचामराज वडियार (इ.स. १९४०-४७)
अधिकृत भाषा कन्नड
म्हैसूरचा राजवाडा
म्हैसूरचे महाराजा

इतिहास

संपादन

पारंपरिक आख्यायिकांनुसार वर्तमान म्हैसूर शहरानजीकच्या प्रदेशात इ.स. १३९९ च्या सुमारास हे राज्य स्थापले गेले. वडियार घराण्याची सत्ता असलेले हे राज्य प्रारंभिक काळात विजयनगर साम्राज्याच्या मांडलिकत्वाखाली होते. इ.स. १५६५ साली विजयनगर साम्राज्य लयास गेल्यावर हे राज्य सार्वभौम बनले. इ.स.च्या १७व्या शतकात पहिला नरसराज वडियारचिक्कदेवराज वडियार या कर्तबगार राजांच्या कारकिर्दीत म्हैसूरच्या राज्याच्या सीमा विस्तारून वर्तमान कर्नाटकाचा दक्षिण भाग व तमिळनाडूचा काही भाग, एवढा भूप्रदेश व्यापून हे राज्य दख्खनेतील एक प्रमुख राज्य बनले. पुढे हैदर अली व त्याचा पुत्र टिपू सुलतान हे वस्तुतः म्हैसूर राज्याचे दलवाई (सेनापती) प्रबळ झाल्यावर वोडेयार घराण्यातील राजांकडे नाममात्र सत्ता उरली. हैदर अली व टिपू सुलतानाच्या कारकिर्दीत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीशी म्हैसूर राज्याची चार युद्धे झाली. चौथ्या इंग्रज-म्हैसूर युद्धात टिपू मारला गेल्यावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कंपनी, हैदराबादचा निजाम व मूळचे राजे वडियार यांच्यांत राज्याची वाटणी करून एका प्रकारे म्हैसूर संस्थानाची प्रतिष्ठापना केली.

वदंता

संपादन

असे मानले जाते की मध्ये पराक्रमी विजयनगर साम्राज्याचा नाश झाल्यानंतर वाडियार राजाच्या आदेशानुसार विजयनगरची अफाट संपत्ती लुटली गेली. त्यावेळी विजयनगरची तत्कालीन राणी, अलमेलेम्मा पराभवानंतर एकांतवासात होती. पण राणीकडे सोने, चांदी आणि हिरे आणि दागिने होते. राजे वडियार यांनी राणीला एका राजदूता मार्फत निरोप पाठवला की तिचे दागिने आता वाडियार राज्याच्या राजघराण्याचा भाग आहेत, म्हणून ते सर्व परत द्या. जेव्हा अलेलामम्मा यांनी दागिने देण्यास नकार दिला, तेव्हा शाही सैन्याने जबरदस्तीने तिजोरी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावरून दुःखी होऊन अलमेलेम्मा यांनी असा आरोप केला की तुम्ही लोक माझे घर उध्वस्त केले तसेच तुमचा वंश निर्वंश होईल आणि या वंशातील राजघराण्याला वारस लाभलेला नाही. असे म्हणतात की यानंतर आलेलामम्माने कावेरी नदीत उडी मारून आत्महत्या केली.