मैसुरु

भारताच्या कर्नाटक राज्यातील शहर

मैसुरू तथा म्हैसूर हे कर्नाटक राज्यातील तिसरे सर्वात जास्त लोकवस्ती असलेले शहर आहे आणि म्हैसूर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय/मुख्य प्रशासकीय केंद्र आहे. ९,२०,५५० लोकसंख्या असलेले म्हैसूर शहर बेंगळुरूच्या १४६ किमी दक्षिणेस चामुंडी टेकड्याच्या पायथ्याशी आहे. म्हैसूर महानगरपालिका हे शहराच्या नागरी प्रशासनासाठी जबाबदारी साभांळ्ते. १३९५ ते १९५६ साला पर्यंत ते सुमारे सहा शतकांपर्यंत हे शहर म्हैसूर संस्थानची राजधानी शहर म्हणून विकसीत झाले. १७६० व १७७० च्या दशकातील हैदर अलीटीपू सुलतानची सत्ता असताना थोड्या काळादरम्यान, वडियार राजवटीचे म्हैसूरवर राज्य होते. वाडीयार हे कला आणि संस्कृतीचे आश्रयदाते होते आणि त्यांनी शहराच्या व राज्याच्या सांस्कृतिक जडणघडणीत लक्षणीय योगदान दिले व म्हैसूरला सांस्कृतिक राजधानीचाही दर्जा प्राप्त झाला.

म्हैसूर येथील राजवाडा

म्हैसूर हे येथील वडियार राजघराण्याच्या आणि इतरही काही सुंदर आणि भव्य राजवाड्यांसाठी प्रसिद्ध आहे. म्हैसूर राजघराण्यात साजरा होणारा दसरा उत्सव पहाण्यासाठी देशातून व जगभरातून हजारो पर्यटक येतात. म्हैसूरची ओळ्ख ही इतर अनेक रूपाने प्रसिद्ध आहे जसे की म्हैसूर चित्रकला, म्हैसूर पाक, म्हैसूर मसाला डोसा, म्हैसूरचा चंदनाचा साबण, म्हैसूर शाई इ. म्हैसूरी फेटा (पारंपरिक रेशीम पगडी) आणि म्हैसूरला पारंपारिक रेशमी साडी उद्योगांच्या बरोबरीने पर्यटन हे प्रमुख उद्योग आहेत.

म्हैसूर शहरात भारतातील पहिले खाजगी रेडिओ केंद्राची स्थापना झाली. म्हैसूर विद्यापीठात आजवर अनेक लक्षवेधक शास्त्रज्ञ, लेखक, राजकारणी, कलाकार, गायक आणि खेळाडू तयार झालेत. क्रिकेट आणि लॉन टेनिस हे शहरातील सर्वात लोकप्रिय खेळ आहेत.