ल्येव तल्स्तोय
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
लिओ टॉल्स्टॉय (रशियन उच्चारातील पूर्ण नाव काउंट ल्येव निकोलायविच तल्स्तोय - Лев Николаевич Толстой) (जन्म : सप्टेंबर ९, १८२८ - नोव्हेंबर २०, १९१०) हा रशियन लेखक, कादंबरीकार, नाटककार, तत्त्वज्ञ, शांततावादी ख्रिश्चन अराजकवादी आणि शिक्षणसुधारक होता. रशियन इतिहासातील तल्स्तोय उमराव घराण्यातील व्यक्तींमध्ये तो सर्वात प्रभावशाली असावा.
ल्येव तल्स्तोय | |
---|---|
इल्या रेपिन याने रंगविलेले टॉल्स्टॉयचे व्यक्तिचित्र (१८८७) | |
जन्म नाव | ल्येव्ह निकोलायविच तल्स्तोय |
जन्म |
ऑगस्ट २८, १८२८ यास्नाया पोल्याना, रशिया |
मृत्यू |
नोव्हेंबर २०, १९१० अस्तापोव्हो, रशिया |
राष्ट्रीयत्व | रशियन |
कार्यक्षेत्र | कादंबरीकार, नाटककार |
साहित्य प्रकार | कादंबरी, नाटक |
प्रसिद्ध साहित्यकृती | वॉर अँड पीस, आना कारेनिना |
प्रभावित | महात्मा गांधी, मार्टिन ल्यूथर किंग, ज्युनियर |
स्वाक्षरी |
दर्जेदार कादंबरीलेखनामुळे, विशेषकरून वॉर अँड पीस आणि आना कारेनिना या दोन अप्रतिम साहित्यकृतींमुळे तल्स्तोय महान साहित्यिक मानला जातो. या दोन्ही कादंबऱ्या आजतागायत सर्वोत्तम व वास्तववादी ललित साहित्याचा उच्च बिंदू मानल्या जातात. तल्स्तोय हा त्याच्या गुंतागुंतीच्या व विरोधाभासी सभावासाठीही तितकाच परिचित आहे. १९७० नंतर त्याची मते आदर्शवादी व निराकारी बनली आणि तो समाज प्रवर्तक गणला जाऊ लागला. त्याची किंग्डम ऑफ गॉड इज विदिन यू या लिखाणातून मांडलेल्या अहिंसक लढ्याबद्दलच्या संकल्पनेचा २०व्या शतकातील मोहनदास गांधी व मार्टीन लुथर किंग या थोर व्यक्तींवर प्रचंड प्रभाव पडला.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- प्रोजेक्ट गुटेनबर्ग - ल्येव तल्स्तोय याचे साहित्य (इंग्लिश मजकूर)
- रशियन शासनाच्या संग्रहातील तल्स्तोयाच्या जीवनाच्या अखेरच्या वर्षातील दुर्मिळ चित्रफीत (इंग्लिश मजकूर)
- लिओ टॉल्स्टॉय इन अवर टाईम कार्यक्रमात बीबीसी रेडिओ ४ वरील चर्चा. (प्रत्यक्षात ऐका) (इंग्रजी भाषा)