लिओपोल्ड पहिला, बेल्जियम

लिओपोल्ड पहिला (फ्रेंच: Léopold Ier, जर्मनडच: Leopold I; १६ डिसेंबर १७९० - १० डिसेंबर १८६५) हा स्वतंत्र बेल्जियम देशाचा पहिला राजा होता.

लिओपोल्ड पहिला
Leopold I

कार्यकाळ
२१ जुलै १८३१ – १० डिसेंबर १८६५
पुढील लिओपोल्ड दुसरा

जन्म १६ डिसेंबर १७९० (1790-12-16)
कोबुर्ग, साक्से-कोबुर्ग-सालफेल्ड (आजचा जर्मनी)
मृत्यू १० डिसेंबर, १८६५ (वय ७४)
ब्रसेल्स, बेल्जियम
धर्म प्रोटेस्टंट

जर्मनीमधील एका लहान राजघराण्यामध्ये जन्मलेला लिओपोल्ड रशियन सैन्यात भरती झाला व त्याने नेपोलियोनिक युद्धांमध्ये नेपोलियनच्या फ्रेंच सेनेविरुद्ध लढा दिला. नेपोलियन पराभूत झाल्यानंतर लिओपोल्ड ब्रिटनला पोचला व तेथे त्याने १८१६ मध्ये सम्राट चौथा जॉर्जची मुलगी राजपुत्री शार्लटसोबत विवाह केला. १८१७ मधील शार्लटच्या मृत्यूनंतर लिओपोल्ड ब्रिटनमध्येच राहिला. १८३१ साली ग्रीसच्या स्वातंत्र्यानंतर त्याला ग्रीसचा राजा बनवण्याचा प्रस्ताव आला होता परंतु त्याने ही संधी धुडकावून लावली. त्याऐवजी त्याने स्वतंत्र बेल्जियमचे राज्यपद स्वीकारले व २१ जुलै १८३१ रोजी त्याचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. आजतागायत २१ जुलै हा बेल्जियमचा राष्ट्रदिवस मानला जातो.

बाह्य दुवे संपादन