रेने कार्ल विल्हेल्म जोहान जोसेफ मारिया रिल्के हा रायनर मारिया रिल्के (जर्मन : [ˈʁaɪnɐ maˈʁiːa ˈʁɪlkə]; डिसेंबर ४, इ.स. १८७५ - डिसेंबर २९, इ.स. १९२६) या नावाने अधिक प्रसिद्ध असणारा बोहेमियाई-ऑस्ट्रियाई कवी होता. जर्मन भाषेतील सर्वात महत्त्वपूर्ण कवींपैकी तो एक मानला जातो. पारंपरिक आणि आधुनिक काव्याच्या संक्रमणाशी नाते सांगणाऱ्या कविता रिल्केने लिहिल्या. इंग्रजी जगतात त्याची ड्युईनो एलिजिज ही काव्यकृती व लेटर्स टू अ यंग पोएट व निम्न-आत्मचरित्रात्मक नोटबुक्स ऑफ माल्टे लॉरिड्स ब्रिग ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.

रायनर मारिया रिल्के
इ.स. १९०० च्या सुमारास रायनर मारिया रिल्के
जन्म नाव रायनर मारिया रिल्के
जन्म डिसेंबर ४, इ.स. १८७५
प्राग, बोहेमिया, ऑस्ट्रिया-हंगेरी
मृत्यू डिसेंबर २९, इ.स. १९२६
मॉन्ट्रो, स्वित्झर्लंड
राष्ट्रीयत्व ऑस्ट्रियाई
कार्यक्षेत्र साहित्य
साहित्य प्रकार काव्य, कादंबरी
कार्यकाळ १८९४-१९२५
स्वाक्षरी रायनर मारिया रिल्के ह्यांची स्वाक्षरी